साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रात कृषी विभागातील महत्वपूर्ण बदलाच्या निर्णयाने हितचिंतक आणि राजकीय वर्तुळांमध्ये धक्कादायक चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्र्यांचे अधिकार कमी करून, विशेषत: कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरील अधिकार स्वतःकडे घेतल्याची माहिती गुरुवारी शासनाने अधिकृतपणे जाहीर केली. यामुळे कृषिक्षेत्रातील धोरणात्मक आणि प्रशासकीय कामकाजात मोठ्या प्रमाणावर बदल होण्याची शक्यता वाढली आहे. माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बदल्यांविषयी निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून हा अधिकार मंजूर केला असून, या प्रक्रियेत कृषिक्षेत्रातील निर्णयक्षमता आणि जबाबदारी अधिक प्रभावीपणे हाताळण्याचा मानस असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कृषी विभागातील बदल्यांचे अधिकार आता कृषिमंत्र्यांकडे न राहता थेट मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली येणार आहेत. या निर्णयामागील कारणे आणि उद्दिष्टे अशी आहेत की -…
Author: Saimat
साईमत यावल प्रतिनिधी यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात दोन वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने उचलून नेऊन ठार केल्यानंतर अखेर वनविभागाच्या तातडीच्या कारवाईत बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. दि. १७ एप्रिल २०२५ रोजी रात्री १२.३० ते १.०० वाजेच्या सुमारास प्रभाकर चौधरी यांच्या मा.ग.क्र. ७४१ मधील शेतात झोपलेल्या रत्ना सतीश ठेलारी (वय २ वर्षे) हिला बिबट्याने झडप घालून केळीच्या बागेत ओढत नेऊन ठार केले होते. ही मागील महिन्यातील दुसरी घटना असल्यामुळे परिसरात शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. उपवनसंरक्षक श्री. जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) श्री. समाधान पाटील यांच्या नेतृत्वात, वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम श्री. सुनील भिलावे, यावल पूर्वचे…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगावातील पोलीस अधीक्षक कार्यालयातील एक प्रमुख घडामोड घडली आहे. येथे लोकल क्राइम ब्रँच (LCB) च्या पीएसआय दत्तात्रय पोटे यांनी एका ड्रग्ज तस्करीसाठी (drug trafficking) आरोपी असलेल्या व्यक्तीशी 352 वेळा फोनवर संवाद केल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर आल्याने पोलीस दलात आणि विशेषतः LCB या खात्यावर खळबळ निर्माण झाली आहे. आरोपी व्यक्ती प्रकरण सोडून पळून गेल्याने त्याच्या सहयोगी व्यक्तींबरोबरची माहिती समोर आणण्याच्या प्रयत्नांमध्ये पोटे यांनी हे फोन केले असल्याचा अंदाज आहे. आमच्या संवादात जळगाव पोलीस अधीक्षकाने सांगितले की हा प्रकार फक्त एक व्यक्तीसाठी नव्हे, तर संपूर्ण खात्यावर योग्य प्रकारे तपासणी करण्याची गरज आहे. आम्ही पूर्ण प्रकरणाची…
साईमत वृत्तसेवा गेल्या दोन दिवसांत भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) बेंगळुरू येथील नेताजी सुभाष दक्षिणी केंद्राला भेट देण्याचा अनमोल अनुभव मला लाभला. या केंद्रातील अत्याधुनिक सुविधा, प्रशिक्षण उपकरणे आणि स्पोर्ट्स सायन्स सेंटरसारख्या जागतिक दर्जाच्या क्रीडा परिसंस्थेची पाहणी करताना मनात एक नवा उत्साह निर्माण झाला. नवीन इनडोर कबड्डी कोर्टपासून या केंद्राच्या विविध क्रीडा सुविधा पर्यंत पाहून, भारताच्या क्रीडा क्षेत्राचा भव्य विकास आणि भविष्यातील यशाची खात्री अधिक दृढ झाली आहे, असे सांगण्यात आले आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण, ज्याला सध्या ‘स्पोर्ट्स इंडिया’ नावाने ओळखले जाते, ही भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत 1982 मध्ये स्थापन झालेली सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा संस्था आहे. याचा मुख्य…
साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२४ मधील राज्यसेवा मुख्य परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे, मात्र या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (एसईबीसी) आरक्षणाचा तिढा अजूनही कायम आहे. यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे. २०२४ साली एमपीएससीने नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात केली होती, पण त्या वेळी मराठा आरक्षण लागू नव्हते. नंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्यात मराठा आरक्षण लागू झाल्यामुळे उमेदवारांच्या प्रवर्गांमध्ये मोठी गडबड निर्माण झाली. विशेषतः वर उल्लेखलेले ‘नॉन क्रिमिनल’ प्रमाणपत्र न दिल्यामुळे काही उमेदवारांचे एसईबीसी प्रवर्गातील अर्ज अमान्य झाले आणि ते पूर्वी अर्ज केलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातच…
साईमत वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MAHATRANSCO) यांनी अलिकडे असिस्टंट इंजिनीअर (सिव्हील) या पदासाठी एकूण 134 जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती महापारणमध्ये सरळसेवा भरतीद्वारे करण्यात येणार असून, उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत. पात्रता आणि वेतन: या पदासाठी उमेदवारांना सिव्हील अभियांत्रिकीमध्ये बी.ई./बी.टेक. ची पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे आहे. वेतन श्रेणी रु. 58,560 ते रु. 1,42,050 असून, अंदाजे दरमहा वेतन रु. 1,07,596 एवढे असेल. चोकटी माहिती: पदाचे नाव: असिस्टंट इंजिनीअर (सिव्हील) एकूण जागा: 134 आरक्षण: ओपन – 36, EWS – 14, SC – 20, ST – 7, VJ – A – 2,…
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी स्वर्गीय के. आर. पाटील यांच्या निधनामुळे मानव सेवा प्रतिष्ठान, वालझिरी (ता. चाळीसगांव, जि. जळगाव) येथे या संस्थेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते.त्यामुळे संस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीसाठी दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी संस्थेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. ही बैठक संस्थेचे उपाध्यक्ष संजय अहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली. सभेत एकमताने संस्थेच्या विविध पदांसाठी निवड करण्यात आली.या बैठकीत अध्यक्ष रविंद्र पुंडलिक पाटील,उपाध्यक्ष संजय विश्वासराव अहिरराव,सचिव नरेश कणककुमार दोशी,खजिनदार महेंद्र सिताराम पाटील,कायदेशीर सल्लागार अॅड संग्रामसिंग सुमेरसिंग शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडणुकीच्या प्रसंगी कांती पटेल, हरीष पल्लन, के. डी. पाटील, आर्किटेक्ट धनंजय यशवंतराव चव्हाण, कुलकर्णी साहेब यांच्या वतीन नवनिर्वाचित…
साईमत अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईला सामोरं जाण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्री. नितीनकुमार मुंडावरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत टँकरफेड गावांमध्ये सार्वजनिक उद्भवांची नोंद, जलतारा योजनांच्या अंमलबजावणीत वेग, पूर्णत्वास आलेल्या पाणी योजनांच्या इलेक्ट्रिक कनेक्शन अडचणी यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीचे प्रमुख मुद्दे: टँकरफेड गावांमध्ये तात्पुरते उपाय: सार्वजनिक उद्भव (जलस्रोत) चिन्हांकित करून तेथे जलतारा प्रकल्पांना प्राधान्य. मनरेगा योजनेतर्गत कामे: जलसंधारण कामांच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना तांत्रिक सहाय्य देण्याचा निर्णय. इलेक्ट्रिक अडचणी सोडवणे: पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांना तातडीने विजेचे कनेक्शन मिळण्यासाठी महावितरण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांत समन्वय साधण्याचे आदेश. समन्वयात्मक नियोजन: तालुक्यातील सर्व विभागांनी 15-दिवसीय पाणीटंचाई आराखडा जिल्हास्तरावर सादर करण्याची मागणी श्री. मुंडावरे यांनी…
साईमत धुळे प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने विजय प्राप्त केला. या मध्ये धुळे ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राघवेंद्र (राम) भदाणे यांनी प्रचंड मतांनी ऐतिहासिक विजयचा गुलाल उधळला. धुळे ग्रामीणच्या ग्रामस्थांमध्ये उत्सहाचे वातारवण झाले आहे. आ.राम भदाणे यांचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. नुकताच अंचाडे येथे नवनिर्वाचित आमदारांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार भदाणे व विधान परिषदचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान अंचाडे गावाचे सरपंच तथा मुख्याध्यापक चुनीलाल पाटील यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला. आ. राम भदाणे यांनी अंचाडे गावातील ग्रामस्थांचे आभार मानताना मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थांना विश्वास दिला कि, धुळे ग्रामीणच्या मतदारांनी ज्या कार्यासाठी…
साईमत यावल प्रतिनिधी सातपुडा (Satpuda) पर्वतापासून ६० ते ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या जळगाव जिल्ह्यातील यावल वनविभाग उपवन संरक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील यावल वनपरिक्षेत्र पश्चिम भागात गेल्या महिना दीड महिन्याच्या कालावधीत बिबट्याने (Leopard) एका बालकावर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज रात्री एक वाजेच्या सुमारास डांभुर्णी शिवारात मेंढपाळ कुटुंबातील आईच्या कुशित झोपलेल्या बालिकेला बिबट्याने उचलून नेऊन ठार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्र पश्चिम आणि पूर्व भागासह संपूर्ण यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. वन विभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील शेत शिवारात गट क्र. ७४१ मध्ये…