साईमत नाशिक नाशिकमधील गुन्हेगारी टोळ्यांमधील वैमनस्य पुन्हा एकदा उघडकीस आले असून, पंचवटी परिसरातील पेठरोडवरील राहुलवाडी येथे मध्यरात्री झालेल्या गोळीबाराने शहर हादरले. या घटनेत सागर विठ्ठल जाधव हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेचा सविस्तर तपशील माहितीनुसार, सागर जाधव हा उघडे गँगचा कट्टर समर्थक असून काही महिन्यांपूर्वीच्या खंडणीप्रकरणात त्याचे नाव संशयित म्हणून पुढे आले होते. शनिवारी मध्यरात्री तो आपल्या काही सहकाऱ्यांसोबत परिसरातील ओट्यावर बसलेला असताना त्याचे शत्रू ठरलेले विकी उत्तम वाघ व विकी विनोद वाघ हे अचानक तिथे दाखल झाले. दोघांनी कोणताही वाद न घालता सरळ पिस्तुलातून सलग गोळ्या झाडल्या. या गोळीबारात जाधवच्या गालातून एक गोळी…
Author: Saimat
साईमत प्रतिनिधी १५ व १६ सप्टेंबर रोजी झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिके वाहून गेली, घरांमध्ये पाणी शिरले, जनावरांचा मृत्यू झाला, तर अनेक गावांचा संपर्क तुटला. जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेत असून शेकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. जामनेर तालुक्यात गावोगाव पूरस्थिती जामनेर तालुक्यातील नेरी, जामनेर, वाकडी, शेंदुर्णी, तोंडापूर या गावांमध्ये पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. नेरी बु. येथे तब्बल २१ ते ४० घरांमध्ये पाणी शिरले असून पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. नेरी दिगर येथे १५–२० घरे आणि ५ दुकाने पाण्याखाली गेली असून काही कुटुंबांना शाळांमध्ये…
साईमत प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने मोठा हाहाकार माजवला आहे. नेरी, चिंचखेडा यांसह परिसरातील अनेक गावांमध्ये पाण्याचा पूर ओसंडून वाहत असल्याने शेतजमिनी तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीसह जनजीवन ठप्प झाले असून, ग्रामस्थांना असहाय्यतेची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली, माती वाहून गेली पुरामुळे शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, मका, भुईमूग यांसारखी हंगामी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. काही ठिकाणी वाहून गेलेल्या गाळामुळे शेतीची सुपीकता नष्ट झाली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, या हंगामात अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे शेतकरी बांधव व्यक्त करत आहेत. घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे हाल पूरग्रस्त भागातील…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील गजबजलेल्या इच्छादेवी चौकात मंगळवारी पहाटेच भीषण अपघात घडला. चुकीच्या दिशेने येणाऱ्या ओमनी कारच्या जोरदार धडकेत ७० वर्षीय सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सकाळच्या शांततेत घडली दुर्घटना खंडेराव नगर परिसरात राहणारे वसंत प्रताप पाटील (वय ७०) हे रोजप्रमाणे सायकलवरून जात असताना सकाळी सव्वा सहा वाजता इच्छादेवी चौकात पोहोचले. तेवढ्यात समोरून नियम धाब्यावर बसवत चुकीच्या दिशेने धावणाऱ्या ओमनी कारने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की पाटील रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र…
३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका न झाल्यास आयोग जबाबदार साईमत प्रतिनिधी राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण व्हायलाच हव्यात, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले. निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या विलंबाबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत कडवे शब्द वापरले. आयोगावर न्यायालयाचे ताशेरे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान राज्य निवडणूक आयोगावर कठोर शब्दांत टीका केली. “आजवरच्या कारभारावरून असे वाटते की आयोग निवडणुका पुढे ढकलतच राहणार आहे. अशा प्रकारच्या कारणांवर अवलंबून राहिले, तर निवडणुका २०२६ पर्यंतही होणार नाहीत,” अशी टिप्पणी न्यायालयाने केली. मशिन्सचा मुद्दा आणि वेळकाढूपणा सुनावणीदरम्यान आयोगाने, निवडणुका घेण्यासाठी ६५ हजार…
साईमत प्रतिनिधी धार्मिक संस्कार, नीतिमूल्ये आणि भारतीय परंपरेचे बीज लहान मुलांच्या मनामध्ये रोवण्यासाठी श्री स्वामिनारायण मंदिर, जळगाव येथे गेली अडीच वर्षांपासून बाल संस्कार केंद्र यशस्वीरित्या चालवले जात आहे. या केंद्राचा उद्देश म्हणजे बालकांमध्ये सद्गुणांची जडणघडण करून त्यांना उत्तम नागरिक आणि संस्कारित व्यक्तिमत्त्व म्हणून घडवणे. केंद्रात 8 ते 25 वयोगटातील मुला–मुलींचा उत्स्फूर्त सहभाग आहे. प्रत्येक रविवारी सकाळी घेण्यात येणाऱ्या या वर्गांमध्ये श्लोक पठण, भजन, स्तोत्र, नैतिक गोष्टी, नाटिका, प्रश्नोत्तरे, योग व प्रार्थना अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मुलांना श्रद्धा, प्रामाणिकपणा, सेवा, अनुशासन आणि देशप्रेम यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी साधू–संत तसेच सेवाभावी कार्यकर्ते मार्गदर्शन करतात. गेल्या अडीच वर्षांत या उपक्रमामुळे शेकडो…
साईमत प्रतिनिधी दुपारी उसळला वाद, हिंसक हाणामारीत रुपांतर जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी गावात रविवारी दुपारी जुन्या वैरातून दोन कुटुंबांमध्ये भीषण हाणामारी झाली. यात एकनाथ निंबा गोपाळ (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला असून एकूण ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून सर्वांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दशकभर जुना वाद पुन्हा पेटला गोपाळ आणि पाटील कुटुंबांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून वाद सुरू आहे. शनिवारी रात्री गोपाळ कुटुंबातील एका व्यक्तीची दुचाकी पाटील कुटुंबातील तरुणांनी अडवल्याने शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळी वातावरण तापले असले तरी ग्रामस्थांच्या हस्तक्षेपाने वाद थांबला. परंतु दुसऱ्या दिवशी हा वाद पुन्हा पेटला आणि…
साईमत प्रतिनिधी आशिया चषक २०२५ अंतर्गत दुबई येथे होत असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही आपलं स्पष्ट मत नोंदवलं आहे. “खेळू नये. माझ्या लोकांचं रक्त सांडलं आहे, मग आपण त्यांच्याशी का खेळावं?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. पुण्यात नाम फाऊंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी भारत-पाक सामन्यावरील वादाबाबत विचारणा केली. यावर नाना म्हणाले, “फक्त बोलून काही होत नाही. मत व्यक्त करून प्रश्न सुटत नाही. शेवटी सरकारचं धोरण आणि नियम यावरच निर्णय ठरतो.” त्यांच्या या विधानाने समाजमनातील नाराजी अधिक अधोरेखित झाली. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा बळी…
सर्व पतंजली योग शिक्षिकांचा सन्मान साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : येथील पतंजली महिला समिती यांच्या वतीने सर्व पतंजली योग शिक्षिकांचा सन्मान करुन शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्यकारिणी सदस्या महानंदा पाटील होत्या.दीपप्रज्वलन प्रा.दिनेश राठी, स्वाभिमानचे प्रजापती भवरलाल यांच्याहस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक दंगल पाटील यांनी शिक्षक दिन व योगा विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात योग शिक्षिका सेवा देत आहेत. त्यांच्यासह सर्वांना शिक्षक दिना निमित्त भेटवस्तू देऊन सत्कार केला. तसेच यावेळी महानंदा पाटील, अंजली वाघमारे, वर्षा लोखंडे, मंदाकिनी केदारे, राजश्री बादशाह, मिना राजपूत, वंदना जंगले, पुनम संकला, माला चौधरी, सुरेखा पाटील, निलीमा पाटील, हेमा पाटील, ललिता चौधरी, प्रभाकर झांबरे, टी.एस. बाविस्कर या…
‘अंतर्नाद प्रतिष्ठान’तर्फे आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक अमितकुमार पाटील यांचे प्रतिपादन साईमत/यावल /प्रतिनिधी : सण-उत्सवांना केवळ पूजा-अर्चा आणि उत्सवापुरते मर्यादित न ठेवता त्याला सामाजिकतेची जोड दिली पाहिजे. समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याची भावना यातून जपली गेली पाहिजे. अंतर्नाद प्रतिष्ठानचा ‘एक दुर्वा समर्पण’ हा उपक्रम त्यादृष्टीने प्रेरणादायी आहे. दात्यांच्या सहकार्याने गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागविण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे. ही छोटीशी मदत विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवते आणि उद्या यांच्यातीलच कुणी समाजाला दिशा देणारा अधिकारी होईल, असे प्रतिपादन ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख तथा वाघळूद जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अमितकुमार पाटील यांनी केले. सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे…