Author: Saimat

शिवसेना शिंदे गटात असंख्य महिलांचा प्रवेश साईमत/पाचोरा /प्रतिनिधी :  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट महिला आघाडीचा भव्य निर्धार मेळावा व प्रवेश सोहळा भडगाव रस्त्यावरील प्रसाद हॉलमध्ये शनिवारी, ३० ऑगस्ट रोजी जल्लोषात पार पडला. यावेळी जिल्हा प्रमुख मनोहर (रावसाहेब) पाटील, नगराध्यक्षा सुनिता पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, युवा नेते सुमित पाटील उपस्थित होते. मेळाव्यात अनेक महिलांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पक्षाचा झेंडा हाती घेताच घोषणाबाजीसह टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रवेशामुळे महिला आघाडीला नवे बळ मिळाले आहे. आगामी निवडणुकीसाठी संघटनेत नवा उत्साह निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांचा सहभाग वाढणे हे काळाचे मोठे…

Read More

महिलांचा धडकला निषेध मोर्चा साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :  माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर गेल्या २६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता झालेल्या भ्याड हल्ल्याला तिसरा दिवस उलटूनही पोलिसांना आरोपींचा माग काढण्यात अपयश आले आहे. चौधरी सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. नाशिक येथील अशोका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अद्याप आरोपींना अटक न झाल्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे. त्याच्या निषेधार्थ प्रभागातील नागरिकांसह महिलांनी शनिवारी, ३० ऑगस्ट रोजी दुपारी हॉटेल सदानंदपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा काढून शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना निवेदन सादर केले. गुन्ह्यातील सर्व आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार उघडकीस यावा, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात…

Read More

मोर्चात महिलांसह विद्यार्थी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : पिंपळगाव हरेश्वर परिसरातील अल्पवयीन हिंदू मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात पाचोरा शहरात सकल हिंदू समाज व विविध संघटनांच्यावतीने शुक्रवारी भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. मोर्चाची सुरुवात कृष्णापूर येथील हनुमान मंदिरापासून होऊन आठवडे बाजार, गांधी चौक, जामनेर रोड मार्गे निघून मोर्चाची छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता झाली. संपूर्ण मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मोर्चाच्या शेवटी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात अल्पवयीन…

Read More

गावात ८० च्यावर दारुचे अड्डे ; घरपोच मिळतेय सेवा साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :  शहरापासून अवघ्या काही अंतरावरील तालुक्यातील साकेगाव जलजीवन मिशन योजनेसह अवैध धंदेच्या बाबतीतही नेहमीच चर्चेत असतो. गावात तब्बल ८० पेक्षा अधिक दारूचे अड्डे आहेत. सट्टा, पत्ता खुले काम चालतो. आता तर अवैध धंदेवाल्यांची इतकी हिम्मत वाढली की, अगदी एका फोन कॉलवर पाहिजे तिथे ‘तळीरामांसाठी’ दारू उपलब्ध करून दिली जाते. अगदी घरपोच सेवा. गावात उघड्यावर दारू पार्टीची फॅशन झाल्याचे दिसून येत आहे. ज्या शाळेत चिमुकले ज्ञानदानाचे धडे गिरवतात, त्याच अंगणवाडीच्या पायऱ्यावर दारूच्या बाटल्या फोडल्या जातात. दारू पार्टी केली जाते. तेही मुख्य रस्त्यावर हे विशेष. गावातील बस स्थानक मार्गाकडे प्रवेश करताच दारूच्या…

Read More

मागणीचे निवेदन महावितरणचे सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी :   कोणतीही पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनीतर्फे पहूर गावासह शेतीचा विद्युत पुरवठा वारंवार बंद करण्यात येत असल्यामुळे नागरिकांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने या गंभीर बाबींकडे तातडीने लक्ष देऊन पहूरकरांना सुरक्षित आणि नियमित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन महावितरणचे सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पहूर आणि आसपासच्या परिसरात पावसाळा सुरू झाल्यामुळे वीजपुरवठा वारंवार बंद होत आहे. ज्यामुळे विद्यार्थी, लहान मुले आणि वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वीज व्होल्टेज कमी जास्त होत असल्यामुळे घरातील उपकरणे…

Read More

पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल  साईमत/ पारोळा/प्रतिनिधी :   तालुक्यातील बहादरपूर शिवारात अवैध बनावट देशी दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत सुमारे ४० लाख ३३ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह साहित्य जप्त करून कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बहादरपूर येथील बोरी नदीच्या किनारी पत्र्याच्या शेडमध्ये अवैध बनावट ‘टॅंगो पंच’ देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना मिळाली होती. त्यानुसार कारखान्यात पारोळा पोलिसांनी छापा टाकला असता राकेश छगनलाल जैन, टिन्या डोंगऱ्या पावरा, कतारसिंग गण्यासिंग पावरा या तिघांना अटक करून पोलिसांनी बनावट कारखान्यातून ३१०० नग दारूच्या बाटल्या, ८०० लीटर कच्चा माल, दोन लाख…

Read More

संत गजानन महाराज मंदिरात अभिषेक करण्यात आले.  साईमत/मुक्तईनगर /प्रतिनिधी :   शहरातील संत गजानन महाराज संस्थान व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गजानन महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त सकाळी भुसावळ रोड वरील संत गजानन महाराज मंदिरात अभिषेक करण्यात आले. दुपारी मंदिराचे सेवक दीपक पाटील यांनी फकिरा बोरे यांच्याहस्ते सपत्नीक आरती केली व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच संध्याकाळी रामरोटी आश्रम ते संत गजानन महाराज मंदिर पर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक आर.व्ही.राजपूत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर.टी.जोगी, संगिता बोरे, सुशिला निळे, राजकन्या जोगी, मिनाबाई पाचपांडे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित…

Read More

जामनेरच्या चव्हाण दाम्पत्याने रामदेव बाबा समाधीस्थळी राबविला उपक्रम साईमत/जामनेर/प्रतिनिधी : शहरातील आनंद नगर येथील रहिवासी देविदास चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती गिरीजा चव्हाण या दाम्पत्यांनी आपल्या वडिलांच्या म्हणजेच स्व.त्र्यंबक झामसिंग चव्हाण यांच्या स्मरणार्थ राजस्थानातील रामपूर ते रामदेवरा जैसलमेर देवदर्शन यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांना ट्रकभर पिण्याच्या पाण्याच्या बॉटलचे निःशुल्क वाटप करून भाविकांची तहान भागवली. जामनेर तालुक्यातून व महाराष्ट्रातून दरवर्षी हजारोच्या संख्येने रामदेव बाबांचे भक्त राजस्थान येथील रामदेवरा जैसलमेर येथे बाबांच्या समाधीस्थळी जात असतात. तेथे उपलब्ध असलेले पिण्याचे पाणी चवीने खारट लागत असल्याने जामनेरच्या उभयतांनी भाविकांची तहान भागवण्यासाठी महाराष्ट्रातूनच ट्रकभर पिण्याचे पाणी बॉटल आपल्या सोबत घेऊन त्याठिकाणी उपस्थित असलेल्या भाविकांना आपल्या परिवारासह निःशुल्क वाटप…

Read More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :  शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून नागरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये भिती व दहशतीचे वातावरण आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात रात्रीच्या वेळी दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अनेक कुटुंबे, लहान मुले व महिला रात्रीच्या वेळेस गणपती बघण्यासाठी बाहेर पडतात. मात्र, अशा वेळी गल्लीबोळात तसेच मुख्य रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचे टोळके आढळून येत आहेत. काही वेळा या कुत्र्यांनी नागरिकांना चावा देखील घेतला असून अनेक लहान मुले जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. मुख्य परिवर्तन चौकासारख्या गजबजलेल्या भागातही या…

Read More

कर्मचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :   मुक्ताईनगर तहसील कार्यालयातील शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शौचालयात दारूच्या बाटल्यांचे तुकडे पडलेले आहे. तसेच यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयात रोज हजारो नागरिकांची ये-जा सुरू असते. अशा महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कार्यालयातील शौचालयात घाणीचे साम्राज्यासह दारुच्या बाटल्यांचे तुकडे याठिकाणी पाहावयास मिळत आहे. याठिकाणी पाण्याची देखील व्यवस्था नाही. त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे येथील शौचालयात अधिकच घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे दुर्गंधीही पसरली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. अशा या शहरातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या शासकीय कार्यालयातील शौचालयात कोणाचे लक्ष नसते का? असा प्रश्न…

Read More