साईमत यावल प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानाला दि .९ ऑगस्ट सुरुवात झाली त्यानिमित्ताने यावल नगरपरिषद कर्मचारी यांनी संपूर्ण यावल शहरात ठीक ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती केल्याने संपूर्ण यावल शहरात ‘माझी माती माझा देश’ घोषवाक्य मोठ्या आधाराने म्हटले जात आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार शुक्रवार दि.११ ऑगस्ट रोजी सकाळी सकाळी ११ वाजता यावल नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी पंचप्रण शपथ तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात शहरात ठीक ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. यावल नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी हेमंत निकम, प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग् यांचे मार्गदर्शनाखाली नगरपरिषद स्थापत्य अभियंता योगेश मदने, विद्युत अभियंता पांडे,…
Author: Saimat
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी शहरातील गणेश कॉलॉनी परिसरात बांधकामाच्या कामावर काम करणाऱ्या मजुराचा दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ११ ऑगस्ट रोजी घडली. तालुक्यातील ममुराबाद येथे रहिम कासम पिंजारी (वय-५२) हे वास्तव्याला होते. ते सेंट्रींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करत. गणेश कॉलॉनी परिसरात ते सेंट्रींग काम करत होते. शुक्रवारी ११ ऑगस्ट रोजी काम करत असतांना त्यांचा तोल गेल्याने ते दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी रुखसाना आणि जुबेर व…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेमध्ये आपल्या शाहिरीने नवचैतन्य निर्माण करणारे पद्मश्री शाहीर कृष्णाराव साबळे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईतर्फे जळगावच्या मूलजी जेठा महाविद्यालय व कान्ह ललीत कला केद्र यांच्या सहकार्याने क्रांती दिनानिमित्त पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त शाहिरी पोवाडा व शाहीर साबळे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या शाहिरी परिसंवादाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचा प्रारंभ जेष्ठ रंगकर्मी शंभु पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ.संजय भारंबे तर प्रमुख पाहुणे सामाजिक न्याय विभागाचे अधिक्षक राजेश कांबळे आदी उपस्थित मान्यवरांचे स्वागत कान्ह ललीत कला केन्द्राचे समन्वयक शशीकांत वडोदकर यांनी केले. कार्यक्रमाच्या…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “मेरी मिट्टी मेरा देश ” या अभियाना अंतर्गत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. ११ रोजी सकाळी ८ वाजता” प्रभात फेरी व वृक्षिंदडी काढण्यात आली. महापालिका प्रशासकीय इमारती पासून पंडित जवाहरलाल नेहरू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते चित्रा टॉकीज चौक ते लालबहादूर शास्त्री टावर चौक ते मनपा प्रशासकीय इमारत या मार्गाने रॅली आयोजित करण्यात आली होती. याव्ोळी महापौर जयश्रीताई महाजन यांनी प्रभात फेरी व वृक्षिंदडी रॅलीला आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचे उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान बुधवार, दिनांक ०९ ऑगस्ट, २०२३ पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता या अभियानाची सुरुवात झाली. त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, प्रा.दीपक झांबरे (सन्मन्वयक, तंत्रनिकेतन), प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ.अनिल कुमार विश्वकर्मा (समन्वयक), प्रा. अतुल बऱ्हाटे (अधिष्ठाता, तंत्रनिकेतन) सर्व विभाग प्रमुख तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधन करताना या अभियानाबद्दल सविस्तर माहिती सांगितली.…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी येथील आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थाध्यक्ष आबासाहेब शिवाजीराव पाटील, सचिव डॉ. चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापक उमाकांत बुंदेले, दीपक पाटील यांच्या हस्ते दीप्रज्वलन तसेच देवी सरस्वती आणि आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना “स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व वीर बिरसा मुंडा यांचे जीवनचरित्र” यावर मार्गदर्शन केले. इ. २ री ते १२ वीच्या मीरा पावरा, वैष्णवी चौरे, गायत्री राऊत, गंगा बागुल, मनीषा ठाकरे, अजय पावरा, रोशन पावरा, प्रगती पावरा, भाग्यश्री, विनायक चौधरी, नाजिया, रेशली इत्यादी अनेक विद्यार्थ्यानी वीर बिरसा मुंडा यांना…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी जागतिक आदिवासी दिनानिमित्त कांचन नगर वार्ड क्र. २ (अ)आदिवासी वार्डच्या नगरसेविका कांचनताई सोनवणे यांनी नारळ फोडून,पूजा करुन,पेढे वाटप करून उत्साहमय वातावरणात त्यांच्या हस्ते वार्डातील विविध विकास कामांचा प्रारंभ केला.या परिसरात कॉक्रिटीकरण, गटारी, कॉक्रिटीकरण रोडांचे पेव्हर ब्लॉक बसविण्याचे तसेच वार्डातील १० ते १२ ठिकाणी पाणी गाड्या इत्यादी विकास कामांची प्रत्यक्ष सुरुवात झाली. सदरची कामे शिव शंकरनगर व हरिओम, कांचन नगर, घरकुल परिसर,आसोदा रोड,प्रशांत चौक, उज्ज्वल चौक, बिंदुबाई हॉल या परिसरात करण्यात येत आहे. सदरहू कामे जिल्हा नियोजन,मनपा निधी,ठक्कर बाप्पा आदिवासी योजना निधी, ना. देवेंद्र फडणीस नगर परिसरात नागरी निधी अंतर्गत करण्यात येत आहेत. या कामांसाठी पाच कोटी…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी ९ ऑगस्ट क्रांती दिन तसेच जागतिक आदिवासी दिनाचे स्मरण म्हणून जळगाव शहर व ग्रामीण कॉंग्रेसकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रथम कॉंग्रेस भवन येथे राष्टपिता महात्मा गांधीजीच्या प्रतिमेला शहरजिल्हाध्यक्ष श्याम तायडे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.नंतर भाऊंचे उद्यान येथे भारतीय स्वतंत्रतासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तेजस्वी क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच आदिवासी बाधवाना भेटून त्यांच्याशी हितगुज साधून त्यांचा सन्मान करण्यात आला. सदर प्रसंगी ग्रामीणचे सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, शहर सरचिटणीस प्रदीप सोनवणे,जगदीश गाढे,श्रीधर बापू चौधरी, जाकीर बागवान, मीराताई सोनवणे, देवाभाऊ ठाकरे, सेल अध्यक्ष सखाराम मोरे,बबलू शेख, राजु पाटील,प्रवीण पाटील सर आदी उपस्थित होते.
साईमत, नाशिक ः प्रतिनिधी अजित पवार गटाने शिंदे फडणवीस सरकारमध्ये एंट्री केल्यानंतर पुन्हा एकदा नाशिकच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री म्हणून नाशिकची जबाबदारी दादा भुसे यांच्याकडे असताना स्वातंत्र्य दिनाच्या पाश्वर्भूमीवर ना भुस,े ना भुजबळ थेट मंत्री गिरीश महाजन यांना ध्वजारोहनाचा मान मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चेला उधाण आले आहे. देशाचा स्वातंत्र्य दिन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या कार्यक्रमासाठी राज्य सरकारकडून कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार, त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पुन्हा एकदा गत वर्षीप्रमाणेच यंदा देखील नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना तर नाशिकचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे…
साईमत, नवीदिल्ली ः वृत्तसंस्था मणिपूर हिंसाचारावरून विरोधी पक्षाने सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवर कोणतंही ठोस भाष्य न करता हसत हसत मणिपूरची चेष्टा केली. मणिपूरमध्ये लोक मरताहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत आणि आपले पंतप्रधान संसदेत हसून भाषण करतात, भारताच्या पंतप्रधानांना हे वागणं शोभत नाही. खरंतर पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या पदाचं गांभीर्यच राहिलेलं नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदी यांच्या लोकसभेतील भाषणाचा चांगलाच समाचार घेतला. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने आणलेल्या ‘अविश्वास प्रस्तावा’ला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २ तास १३ मिनिटांचं लांबलचक भाषण केलं. ज्या मुद्द्यांवरून विरोधकांनी अविश्वास ठराव आणला, त्या…