साईमत, प्रतिनिधी, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील एकाची दुचाकी लांबवणाऱ्या चौघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी व शाळेतून चोरी केलेले साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शिरसोली येथील भरत गंगाराम बारी (वय 43) यांची दुचाकी क्रमांक (एमएच 19 सीएल 3032) ही घरासमोरून चोरट्यांनी 21 मे रोजी रात्री 11 वाजता चोरून नेल्याचे उघडकीला आले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना ही दुचाकी चार जणांनी चोरून नेल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने…
Author: Saimat
साईमत, प्रतिनिधी, जळगाव जळगाव-स्वातंत्र्यदिनानिमित्त बागबान विकास फाउंडेशन व एल्गार संघटनेतर्फे विराट कुस्ती स्पर्धेचे आयोजन मंगळवारी क्षत्रिय मराठा मंगल कार्यालय शिवाजीनगर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. शरीफ बागवान तर दंगल उद्घाटन डॉ. शांताराम सोनवणे यांनी केले. पहिली कुस्ती नायब तहसीलदार पंकज लोखंडे व नायब तहसीलदार देवेंद्र चंदनकर यांच्या हस्ते लावण्यात आली. तर मोठी कुस्ती शहर निरीक्षक अनिल पवार यांच्या हस्ते मानाची कुस्ती लावण्यात आली. तर मुलींची कुस्ती डॉ. शांताराम सोनवणे यांच्या हस्ते लावण्यात आली होती. महाराष्ट्रातील नामाकिंत पहिलवानांनी या स्पर्धेत नाव नोंदणी केली होती. सर्व सहभागींना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले तर विजेत्यांना ढाल चषक व रोख रक्कम…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जळगाव व राव्ोर लोकसभा मतदारसंघातील पक्षसंघटना मजबूत करण्याचे निर्देश दिले. या ठिकाणीही त्यांनी लोकसभेच्या दोन्ही जागांसह ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये तयारी सुरु करण्याच्या सूचना केल्या. सद्यस्थितीत जळगावातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. राव्ोर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे, तर जळगावमध्ये उन्मेश पाटील खासदार आहेत. जळगावातून शिवसेनेचे ४ आमदार निवडून आले होते. गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील व लता सोनावणे यांचा यात समाव्ोश होता. पण सध्या हे चौघेही िंशदे गटात गेलेत. त्यामुळे आता या जागांवर नव्ो उमेदवार देऊन त्यांना निवडून आणण्याचे आव्हान ठाकरे गटापुढे आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने आगामी लोकसभा…
साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था ओणम आणि गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्रातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना व्ोळेपूर्वी पगार आणि पेन्शन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट महिना संपण्यापूर्वीच हा पगार आणि निवृत्ती व्ोतन कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. वित्त मंत्रालयाने कार्यालयीन निव्ोदनात म्हटले की केरळमधील केंद्र सरकारी कर्मचारी २५ ऑगस्ट रोजी त्यांचे ऑगस्टचे व्ोतन काढू शकतात. तर महाराष्ट्रात केंद्र सरकारी कर्मचारी सप्टेंबरचे व्ोतन २७ सप्टेंबरपर्यंत काढू शकतात.ओणम हा केरळ येथील लोकप्रिय सण आहे, तर महाराष्ट्रात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तसेच सरकारने बँका,पीएओना राज्यांमधील सर्व केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांचे पेन्शन त्याच दिवशी वितरित करण्यास सांगितले आहे.
साईमत, मुंबई : प्रतिनिधी राज्यातील प्रत्येक लोकसभा,विधानसभा मतदारसंघासाठी भाजपच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आता महिनाभरात सर्व ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघात निवडणूक ‘वॉर रुम’ सुरू करण्यात येणार आहे. भाजपकडून जे मतदारसंघ शिवसेना (िंशदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवारांसाठी सोडल्या जातील, तेथेही भाजपचे निवडणूक प्रमुख राहतील आणि या ‘वॉर रुम’चा त्यांनाही उपयोग होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना सांगितले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्तेतील सहकारी पक्षांच्या उमेदवारांनाही निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे. त्यामुळे ज्या जागा सहकारी पक्षांकडे जातील,तेथे त्यांना भाजपच्या निवडणूक यंत्रणेचा उपयोगच होईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. भाजपने पुढील…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी क्रीडा युवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि अमळनेर क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेरमध्ये पहिल्यांदाच कॅरम स्पर्धेचे आयोजन ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये केले होते. त्यात विजयनाना पाटील आर्मी स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. १४ वर्षाखालील गटात कृष्णा धीरज बडगुजर, १७ वर्षाखालील गटात प्रशांत ईश्वर वानखेडे, लतिष्क भाऊलाल धनगर, १९ वर्षातील गटात तुषार विजय राठोड, चेतन विलास पाटील या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे. त्यांना अमळनेर क्रीडा समिती संयोजक ए.पी.वाघ, क्रीडा समिती सदस्य प्रा. ए.के.अग्रवाल, सदस्य व्ही.जी. बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष…
साईमत, पुणेः प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या तब्बल १२ आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर फोन केला. पण ठाकरेंनी त्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला, असा खळबळजनक दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असून, िंशदे गटाने हे वृत्त साफ धुडकावून लावले आहे. एकनाथ िंशदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी गतवर्षी उद्धव ठाकरेंना आव्हान देत बंडखोरी केली होती. कालांतराने िंशदेंच्या गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे पक्षचिन्हही मिळाले. पण आता िंशदे गटातील राजकीय केमेस्ट्री बिघडण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे. यातूनच या गटातील जवळपास १२ आमदारांनी ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती…
साईमत, वरणगाव ः प्रतिनिधी वरणगावातील एका ३० वर्षीय युवकाने आपल्या दुकानातच गळफास घेवून जिवन यात्रा संपवली. हि घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. तर आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असुन शहरात चर्चेला उधाण आले आहे. शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या मिर्जा स्टिल फर्निचरचे मालक अल्ताफ बेग मिर्जा ( रा. खिडकी वाडा, वरणगाव) यांचा ३० वर्षीय मुलगा शाहीद हा दुकानातील कामे सांभाळत होता. शाहीदचे वडील बाहेर गावी गेले असल्याने सोमवारी रात्री शाहीद हा उशिरा पर्यंत दुकानातील काम करीत होता. मात्र, मंगळवारीही शाहीद घरी न आला नाही यामुळे त्याचा शोध घेतला असता दुकानाचे पुढील शटर बंद असल्याने दुकानाच्या मागील दरवाज्याने शोध घेतला असता…
साईमत, पुणे ः प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘माझी माती माझा देश- मातीला नमन, वीरांना वंदन’ या उपक्रमांतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र कारागृह विभागातील एकूण १७ अधिकारी व कर्मचारी यांना पदके जाहीर झाली आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पदके महाराष्ट्र कारागृह विभागास जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये ५ अधिकारी कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक तसेच १२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक घोषित करण्यात…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी यंदाच्या पावसाळ्याचे अडीच महिने उलटूनही जळगावसह नंदुरबार, अहमदनगर, धुळे, नाशिक, अहमदमनगर जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याचे चित्रं आहे. राज्यातील काही भागातच पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने धरणे भरली. मात्र आजही राज्यातील बहुतांश भाग हा कोरडाच असल्याची स्थिती आहे. जळगाव- जिल्ह्यातील धरणातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये एकूण ५०.४०६ टीएमसी एवढा साठा आहे. आजच्या स्थितीत १९.४५ टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला ३२.७८ टीएमसी पाणीसाठा होता. मागील वर्षी या तारखेपर्यंत ६१७४.०० मिलीमीटर पाऊस झाला होता. आज या तारखेपर्यंत ३९१०.१० मिलीमीटर पाऊस झाला आहे. आजच्या तारखेला सुमारे ६० टक्के कमी पाऊस झाला आहे, असे दिसून येत…