साईमत, नंदुरबार: प्रतिनिधी राज्याच्या उत्तर टोकाला असलेल्या आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याचा क्रमांक निरक्षरतेच्या बाबतीत राज्यात पहिला आहे. मात्र ही ओळख पुसून नंदुरबारला नवी ओळख मिळवून देण्यासाठी आता आमदार सत्यजित तांबे यांनी बाह्या सरसावल्या आहेत. नंदुरबारमध्ये निरक्षर लोकांचे प्रमाण एवढे जास्त का आहे? याचा शास्त्रोक्त अभ्यास करून शासनाने त्रुटी दूर करणारी एखादी शिक्षण योजना जाहीर करावी, अशी मागणी करणारे पत्र आमदार तांबे यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांना पाठविले आहे. लवकरच नंदुरबार हे शिक्षण क्षेत्रासाठी नंदनवन करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी मात्र नंदुरबारमधील निरक्षरतेबाबत नाराजी व्यक्त केली असून, ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी शालेय…
Author: Saimat
साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी शब्दुलीशी संवाद साधत खूप शिकून भारताचे नाव मोठे कर, असा शुभेच्छारूपी आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारच्या ’नाती’ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जोहान्सबर्ग दौऱ्यावर आहेत. तेथे शब्दुली जोशी या भारतीय चिमुकलीशी संवाद साधला. विशेष म्हणजे शब्दुली जोशी मूळची नंदुरबारची आहे.नंदुरबार येथील सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ञ कालिदास पाठक आणि गृहिणी सुनंदा पाठक दाम्पत्यांची सुकन्या पूर्वा जोशी आणि जावई अभियंता प्रशांत जोशी सध्या जोहान्सबर्ग येथे वास्तव्यास आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जोहान्सबर्ग दौऱ्यावर असताना योगायोगाने जोशी परिवाराची भेट झाली. या अनोख्या आणि सहृदयी भेटीप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमुकली शब्दुली जोशी हिच्याशी भावनिक संवाद साधला. भविष्यात…
साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी अस्वलाने हल्ला केल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी नवलपूर, ता. अक्कलकुवा येथे घडली. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या डोक्यांचा मागील भागाला गंभीर ईजा झाली आहे. अककलकुवा तालुक्यातील व तळोदा पोलीस स्टेशन च्या हद्दीत असलेल्या नवलपुर येथे बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास दिनकर वनकर वसाव्ो (40) हे शेतात चारा कापत असताना अस्वलाने अचानक हल्ला केला.त्यांनी बचावासाठी आरडाओरड केला. अस्वलाच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. तोपर्यंत डोक्याचा मागील भागात मोठी दुखापत केली. वसाव्ो यांना तातडीने अककलकुवा ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. तेथे औषधोपचार करून जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात…
साईमत, धुळे : प्रतिनिधी तालुक्यातील देवभाणे, सातरणे, न्याहळोद, विंचूर, सडगाव व साक्री तालुक्यातील अमोदे, वाघापूर, दिघाव्ो येथील जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसिज या साथरोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे.या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील अन्य ठिकाणी होऊ नये म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार संसर्ग क्षेत्रापासून पाच किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिनव गोयल यांनी दिला. लम्पी स्किन रोग प्रादुर्भावग्रस्त गावांपासून दहा किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील जनावरांची खरेदी-विक्री, वाहतूक बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. बाधित…
साईमत, धुळे: प्रतिनिधी येथील गांधी चौकामधून 14 फुटी सात त्रिशूळांची शोभायात्रा काढून श्रावणी सोमवारच्या पहिल्या सोमवारी गांगेश्वर व शहरातील प्राचीन महादेव मंदिरात त्रिशूळ बसविण्यात आले. या व्ोळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. शहरातून ‘श्री शिवाय नमस्तुभ्यम’, ‘हरहर महादेव’च्या घोषणा देत रविवारी 14 फुटी सात त्रिशूळांची शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रेत शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रावणी सोमवारच्या पहिल्या सोमवारी शहरातील प्राचीन काळातील महादेव मंदिरात त्रिशूळ बसविण्यात आले. यात श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर, श्री कडेश्वर महादेव मंदिर, श्री दमडकेश्वर महादेव मंदिर, श्री लोणेश्वर महादेव मंदिर, श्री गांगेश्वर महादेव मंदिर, श्री भातोजी महाराज मंदिर, श्री वटकेश्वर महादेव मंदिर आदी मंदिरांचा समाव्ोश होता.शोभायात्रेव्ोळी भाविकांनी मोठी…
साईमत,अक्कलकुवा: प्रतिनिधी मोलगीचा चनवाईपाडा (ता. अक्कलकुवा) येथील पीडित तरुणीचा मिठात पुरलेला मृतदेह तब्बल 40 दिवसांनंतर न्यायालयाच्या आदेशाने बाहेर काढण्यात आला. मृतदेह पुन्हा विच्छेदनासाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आल्याची कार्यवाही मंगळवारी (ता. 22) दिवसभर सुरू होती. मोलगीचा चणवाईपाडा येथील मृत पीडित मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. तिने फाशी घेतल्याचा बनाव केला गेला होता.या प्रकरणी पोलिसांनी केवळ पीडित तरुणीला त्रास देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा संबंधितांविरुद्ध नोंदविला होता. यासंदर्भात पीडित तरुणीच्या पालकांची तक्रार मोलगी पोलिसांनी ऐकून न घेतल्याने पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.13 जुलै 2023 ला येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी…
साईमत, नवापूर : प्रतिनिधी ना. डॉ. विजयकुमार गावीत, मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दलचे निव्ोदन माजी जि.प अध्यक्षा रजनीताई नाईक व महिला वर्ग यांनी तहसिलदार महेश पवार,पोलीस निरीक्षक ज्ञानेशवर वारे यांना दिले आहे. त्यांनी निव्ोदना मध्ये म्हटले आहे की ना. डॉ. विजयकुमार गावीत मंत्री,आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी धुळे जिल्हयातील अंतुर्ली येथे आदिवासी मच्छिमार बांधवाना मासे मारीचे साहित्य वाटप करतांना दररोज मासे खाल्याने प्रसिध्द अभिनेता अमिताभ बच्चन यांची सुन अभिनेत्री एश्वर्या रॉय यांचे डोळे सुंदर आहेत. तुम्ही दररोज मासे खाल्ले की तुमचे डोळे सुंदर होतील आणि ज्या महिलेला पटवायचे तिला पटवूनच घ्याल, असे महिलांबाबत…
साईमत, शिरपूर : प्रतिनिधी भरधाव व्ोगाने येणाऱ्या ट्रकची महिलेला जोरदार धडक बसली. यात गंभीर जखमी झाल्याने महिलेचा उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळ सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात बुधवारी सायंकाळी ट्रकचालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली. लवा उर्फ लहू उर्फ मणिराम उर्फ कालू भिल (वय 27) आणि त्यांची पत्नी भारती लवा भिल (वय 20) (दोन्ही रा. कळमसरे ता. शिरपूर) हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाच्या चौफुलीवर सोमवारी दुपारी थांबलेले होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास केए 25 एए 6858 या क्रमांकाचा ट्रक भरधाव व्ोगाने आला. ट्रक…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी, येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कलश पंकज भैय्या हिची टोरंटो विद्यापीठाने पीयरसन इंटरनॅशनल स्कॉलरशिपसाठी निवड केली आहे. यासाठी जगभरातून ३८ तर भारतातून फक्त ३ विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यात जळगावच्या कलशचा समावेश आहे. जगातील सर्वोत्तम मानले जाणाऱ्या टोरंटो विद्यापीठाच्या पीयरसन स्कॉलरशिप अत्यंत प्रतिष्ठित समजली जाते. बारावी सायन्सनंतर कलश ही आता कॅनडा येथे चार वर्षे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेऊन संशोधन करणार आहे. या शिष्यवृत्तीत तिला टोरंटो विद्यापीठातर्फे चार वर्षे निवास, भोजन, ट्युशन फी, पाठ्यपुस्तके यासह इतर सर्व सुविधा मोफतपणे दिल्या जाणार आहेत. भारतीय चलनामध्ये चार वर्षांचा हा खर्च सुमारे अडीच कोटी रुपये…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी आमदारांच्या अपात्रता प्रकरणात उचित कारवाई सुरू आहे. ज्याव्ोळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेत असतात त्याव्ोळी ते ‘क्वाजय ज्युडिशियल ऑथेरिटी’ म्हणून काम करत असतात याचे मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता कायदेशीर व नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा विषय थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दीर्घ सुनावणी घेत अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आणि लवकरात लवकर यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ोकर यांनी शिवसेनेच्या आमदारांना नोटिस बजावली. मात्र,…