पीडित तरुणीचा मृतदेह तब्बल 40 दिवसांनंतर बाहेर

0
2

साईमत,अक्कलकुवा: प्रतिनिधी
मोलगीचा चनवाईपाडा (ता. अक्कलकुवा) येथील पीडित तरुणीचा मिठात पुरलेला मृतदेह तब्बल 40 दिवसांनंतर न्यायालयाच्या आदेशाने बाहेर काढण्यात आला. मृतदेह पुन्हा विच्छेदनासाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आल्याची कार्यवाही मंगळवारी (ता. 22) दिवसभर सुरू होती.
मोलगीचा चणवाईपाडा येथील मृत पीडित मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. तिने फाशी घेतल्याचा बनाव केला गेला होता.या प्रकरणी पोलिसांनी केवळ पीडित तरुणीला त्रास देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा संबंधितांविरुद्ध नोंदविला होता. यासंदर्भात पीडित तरुणीच्या पालकांची तक्रार मोलगी पोलिसांनी ऐकून न घेतल्याने पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.13 जुलै 2023 ला येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या विच्छेदनाबाबतही संशय व्यक्त करीत पीडित तरुणीचा मृतदेह घरासमोर मिठात पुरून न्यायासाठी पालकांनी न्यायालयात दाद मागितली होती. शहादा येथील अतिरिक्त जिल्हा, तसेच सत्र न्यायाधीश सी. ए. दातीर यांनी 21 ऑगस्टला पीडित तरुणीचा पुरलेला मृतदेह काढून त्याचे पुन्हा मुंबई येथील जे. जे. रुग्णालयातील विशेष वैद्यकीय पथकामार्फत विच्छेदन करण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार मंगळवारी सकाळी दहाला घटनास्थळी अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर सोपस्कार पार पाडत दुपारी बाराला मृतदेह काढण्यासाठी खोदकाम सुरू झाले.तीनच्या सुमारास मृतदेह बाहेर काढून तहसीलदार रामजी राठोड यांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुन्हा प्लास्टिक पिशवीच्या आवरणात सीलबंद करून सायंकाळी सहाच्या सुमारास शववाहिनीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाला.

या व्ोळी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, सहाय्यक निरीक्षक राजेश गावित यांच्यासह वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. या कार्यवाहीदरम्यान पथकाव्यतिरिक्त कोणालाही प्रव्ोश देण्यात आला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here