ना.डॉ. गावीत यांनी महिलांची माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा

0
2

साईमत, नवापूर : प्रतिनिधी
ना. डॉ. विजयकुमार गावीत, मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दलचे निव्ोदन माजी जि.प अध्यक्षा रजनीताई नाईक व महिला वर्ग यांनी तहसिलदार महेश पवार,पोलीस निरीक्षक ज्ञानेशवर वारे यांना दिले आहे.

त्यांनी निव्ोदना मध्ये म्हटले आहे की ना. डॉ. विजयकुमार गावीत मंत्री,आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी धुळे जिल्हयातील अंतुर्ली येथे आदिवासी मच्छिमार बांधवाना मासे मारीचे साहित्य वाटप करतांना दररोज मासे खाल्याने प्रसिध्द अभिनेता अमिताभ बच्चन यांची सुन अभिनेत्री एश्‍वर्या रॉय यांचे डोळे सुंदर आहेत. तुम्ही दररोज मासे खाल्ले की तुमचे डोळे सुंदर होतील आणि ज्या महिलेला पटवायचे तिला पटवूनच घ्याल, असे महिलांबाबत वादग्रस्त विधान ना. डॉ. विजयकुमार गावीत यांनी केले. नवापूर तालुक्यातील महिला व पुरूष नियमित माश्‍याचे सेवन करतात आज पर्यंत कोणत्याच महिलांचे डोळे घारोळे व चेहरा चिकना झालेला नाही हे अत्यंत खोटे आहे. त्यामुळे महिलांना सदर वाक्य ऐकुन अतिशय दु:ख झाले. असे बोलणे शासनातील एका कॅबिनेट मंत्र्याला शोभत नाही. कार्यक्रमात उपस्थित त्यांची स्वतःची मुलगी असतांना असे वक्तव्य करणे शोभत नाही. शासनाच्या एका मंत्र्याने केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांनी महिलांबाबत केलेले विधान मागे घ्याव्ो व महिलांची माफी मागावी. अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महिलांच्या प्रती आमच्या भावना शासन दरबारी कळविण्यात याव्यात, असे निव्ोदना मध्ये म्हटले आहे.

निव्ोदनावर माजी जि.प अध्यक्षा रजनीताई नाईक,पं.स सभापती बबीता गावीत, पं.स सदस्य ललीता वसाव्ो, प्रियंका गावीत, चंदुलाताई वसाव्ो, माजी नगरसेवक बबिता वसाव्ो, युवक कॉग्रेस अध्यक्षा जागृती गावीत, प्राध्यापक मंदा गावीत, संजना गावीत, निशा गावीत, सोनाली गावीत, कवीता गावीत, सुवर्णा वळवी,नंदनी गावीत, सायरा खान सह महिला वर्गाचा सह्या आहे.याव्ोळी पं.स उपसभापती शिवाजी गावीत, तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत,माजी नगराध्यक्ष दामू बि-हाडे,डॉ नचिकेत नाईक,दिपक वसाव्ो,सुभाष कुंभार,दिलीप पवार,माजी सरपंच नरेंद्र गावीत किशन गावीत, रहमतखा पठाण आदिचा स्वाक्षर्या आहेत ते याव्ोळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here