साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा युवा बुद्धिबळपटू रमेशबाबू प्रज्ञानंदला फिडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. नॉर्व्ोच्या मॅग्नस कार्लसनने टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंदला १.५-०.५ च्या फरकाने पराभूत केले होते. पहिल्या गेममध्ये पराभूत झाल्यानंतर प्रज्ञानंदला पुनरागमन करण्यात अपयश आले. दोन्ही खेळाडूंनी अंतिम फेरीत शास्त्रीय फेरीचे दोन्ही गेम अनिर्णित ठेवले होते. त्यामुळेच त्यांच्यात टायब्रेकर सामना झाला. प्रज्ञानंदने कार्लसनला हरवले असते तर २१ वर्षांनंतर भारतीयाला हे विजेतेपद मिळाले असते. पण तसे झाले नाही. यापूर्वी विश्वनाथन आनंदने २००२ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हा प्रज्ञानंदचा जन्मही झाला नव्हता. वयाच्या ७व्या वर्षी जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिप िंजकल्यानंतर प्रज्ञानंदचे नाव प्रथम प्रकाशझोतात आले. त्यानंतर त्याला…
Author: Saimat
साईमत, जळगाव : प्रतिनिधी गिरणा नदीपात्रातून अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल व पोलिस प्रशासनाकडून कारवाई सुरु आहे.बुधवारी सायंकाळनंतर तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाकडून दापोरा शिवारातून सुमारे ७० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे. प्रशिक्षणार्थी डीवायएसपी पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश वाघमारे यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. गिरणा नदीपात्रातून अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जात असल्याने, वाळू माफियांनी काही ठराविक भागांमधून वाळू उपसा बंद करून, आता दापोरा, नागझिरी या भागांतून उपसा केला जात आहे. त्यामुळे तालुका पोलिसांनी अनधिकृत वाळू उपशासह वाहतूक थांबविण्यासाठी रस्त्यांवर फिरते युनिट तयार केले आहे. बुधवारी दापोरा, धानोरा भागातील अनधिकृरीत्या वाळूचा साठा केल्याची माहिती…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे गुरूवारी वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. सीमा देव गेल्या तीन वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी सकाळी ७ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सीमा देव यांनी अनेक मराठी, िंहदी चित्रपटांमध्ये काम केले. १९५६ मध्ये प्रदर्शित झालेल्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. आनंद, जगाच्या पाठीवर,यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, हा माझा मार्ग एकला चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केले. सीमा देव यांचे पती रमेश देव हे अभिनेते होते. त्यांचे २२…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी जळगावच्या चिंचोली कुसुंबा येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यास मान्यता मिळावी यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची गुरूवारी मंत्रालयात भेट घेतली. त्यात जळगाव तालुक्यात चिंचोली – पिंपळे, कुसंबा येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभारण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून देत मंत्रालयस्तरावर प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगितले. यासाठी गुलाबराव पाटील यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या मान्यतेमुळे चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यास मान्यता दिल्याने रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच याबाबत शासन निर्णय निघणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली…
साईमत, कळवण : प्रतिनिधी कपालेश्वर येथील आरोग्य केंद्रातील अधिकारी डॉ. विरेंद्र आवारे यांनी मद्यधुंद अवस्थेत प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला दाखल करुन घेतले नाही. सदर महिलेला डांगसौंदाणे येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिली. यावरुन संतप्त ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग एकीकडे गरोदर महिला, प्रसूती, आणि कुपोषणावर कोट्यवधींचा खर्च करत असताना ग्रामीण भागात मात्र याच आरोग्य यंत्रणेचे शिलेदाराकडून या मोहिमेला हरताळ फासताना दिसत आहेत.22 ऑगस्ट रोजी रात्री अकराला खडकी (ता. कळवण) येथील कल्पना भोये यांना त्यांच्या कुटुंबियांनी प्रसुतीसाठी कपालेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. बागलाण तालुक्यातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वीरेंद्र आवारे यांनी प्रसुतीसाठी दाखल झालेल्या गर्भवतीस आरोग्य…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी विरोधकांच्या इंडिया आघाडीची मुंबईत होणाऱ्या बैठकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. या बैठकीला येणाऱ्या नेत्यांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने म्हणजे तुतारी आणि नाशिक ढोल वाजवून नेत्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. तसेच ३१ ऑगस्ट रोजी दुपारी आणि रात्रीच्या जेवनात मराठमोळ्या पदार्थांची मेजवानी असेल. यामध्ये पुरणपोळी, झुणका भाकर, वडा पाव या पदार्थांसह इतर मराठी पदार्थांची रेलचेल असणार आहेत. इंडिया आघाडीची तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू आहे. बैठकीत सर्व पक्षांशी समन्वय साधण्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे. एकूण अकरा जणांची ही समिती असणार आहे. कोणत्या विषयावर इंडिया आघाडी भूमिका मांडेल,…
साईमत, नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्याला पालकमंत्री दादा भुसे यांचेसह राष्ट्रवादीचे ना. छगन भुजबळ असे दोन मंत्रीपद मिळालेले आहे. या दोघांच्या वादात मात्र जिल्हा परिषदेची नियोजनाच्या बाबतीत कोंडी होत आहे. ती टाळण्यासाठी जि.प. कडून कामांच्या नियोजनाची चालढकल होत आहे. जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला नियतव्यय कळवून तीन महिने उलटल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या एकाही विभागाने अद्याप ताळमेळ पूर्ण करून दायित्व निश्चित करून त्याला मंजुरी घेतली नसल्यामुळे विभागांकडून नियोजन रखडले आहे. दुसरीकडे राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग झाल्याने पालकमंत्री दादा भुसे व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ अशा दोन सत्ताकेंद्रांमुळे जिल्हा परिषदेच्या नियोजनाची कोंडी झाल्याची चर्चा रंगली आहे.जिल्हा परिषदेला या वर्षी…
साईमत,नाशिक : प्रतिनिधी ग्रामीण भागात नाफेडचे खरेदी केंद्र कुठे आहे, हे विचारल्यानंतर शेतकऱ्यांनाही सांगता येत नाही. पिंपळगाव बसवंतमधील केंद्र कुठे आहे, हे स्थानिकही सांगू शकत नाही. काहींकडून नाफेडच्या कार्यालयाचा पत्ता दिला जातो. बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद झाल्याच्या पार्श्वभूमिवर नाफेडने तातडीने कार्यान्वित केलेली कांदा खरेदी केंद्रे सापडता सापडत नसल्याचे चित्र आहे. कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केल्यानंतर केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत नव्याने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे निश्चित केले. संबंधितांना तातडीने खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले.नाफेडने क्षणाचाही विलंब न करता शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या फेडरेशनच्या सहाय्याने 10 केंद्रे कार्यान्वित केली. पिंपळगाव येथील केंद्राचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती…
साईमत, नाशिक: प्रतिनिधी पाथर्डी फाटा परिसरातील शोरुममधून टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने भामट्याने सुमारे 20 लाख रूपये किमतीची इलेक्ट्रीक कार पळवून नेल्याचा प्रकार घडली.बराच व्ोळ होऊनही संशयित कारसह परत न आल्याने वितरकाने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज प्रकाश साळव्ो असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी कपील अशोक नारंग (रा. सिरीन मेडोज, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, नारंग यांचे पाथर्डी फाटा भागात कार मॉल नावाचे शोरूम आहे.इलेक्ट्रीक कार खरेदीचा बहाणा करून शोरूममध्ये आलेल्या संशयित साळव्ो याने विविध कारची व किमतींची माहिती घेतली. 19 लाख रूपये किमत असलेल्या इलेक्ट्रीक कार (जीजी 26 एबी 4848) त्याने पसंत केली.याव्ोळी त्याने…
साईमत, बागलाण: प्रतिनिधी शेतीची कामे आटोपून विश्रांती घेण्यासाठी दुपारच्या सुमारास घराकडे शेतकरी परतले. याचवेळी एक भला मोठा नाग कांदाचाळीत शिरताना घरातल्या एका लहानग्यास दिसला. त्याच्या ओरडण्याने सर्वांची धांदल उडाली. देवळाणे (ता.बागलाण) येथील शेतकरी महेंद्र काशिनाथ देवरे हे आपल्या कुटुंबासह पाटी शिवारातील (गट क्र.161) मध्ये राहतात. सकाळपासून देवरे कुटुंबिय शेतातील कामात व्यस्त होते. दरम्यान दुपारच्या सत्रात विश्रांतीसाठी शेतातील घरात बसले असता महेंद्र देवरे यांचा दुसरीत शिक्षण घेत असलेला मुलगा घराजवळील ट्रॅक्टरवर खेळत होता. अचानक त्याचे सळसळत जाणाऱ्या भल्या मोठ्या सापाकडे लक्ष गेले व लागलीच कुटुंबातील सदस्यांना आवाज देऊन माहिती दिली. कुटुंबियांनी धाव घेतली तोच नागोबाने शेजारील कांदा चाळीत शिरकाव केला. देवरे…