लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा

0
2

साईमत, नंदुरबार: प्रतिनिधी
जिल्ह्यातील विविध ठिकाणी पशुधनामध्ये लंपी स्किन डिसीज या साथरोगाची लक्षणे आढळून येत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, परिवहन आणि गृह विभागाने त्वरीत उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
लंपी स्किन डिसीज या साथरोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सर्व संबंधित विभागांची आढावा बैठक जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली रंगावली सभागृहात नुकतीच संपन्न झाली, त्याव्ोळी त्या बोलत होत्या. या बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उमेश पाटील, उपविभागीय अधिकारी (शहादा) सुभाष दळवी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिनकर बोर्डे, सहाय्यक आयुक्त डॉ. मनोज पावरा, जिल्हा उपनिबंधक भारती ठाकूर, तसेच जिल्ह्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. योवळी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या लंपी स्किन डिसीज या रोगाचा प्रसार इतर ठिकाणी होऊ नये यासाठी जनावरांमध्ये रोगसदृश्‍य लक्षणे आढळणाऱ्या केंद्रबिंदुपासून ५ कि. मी. परिसरात लसीकरणाचे नियोजन पशुसंवर्धन विभागाने कराव्ो व येत्या सप्ताहात लसीकरण १०० टक्के पुर्ण कराव्ो. लंपी स्किन डिसीज रोगनियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन बाधित क्षेत्रातील गोवर्गीय जनावरे यांना क्षेत्राबाहेर अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करुन, यासाठी पोलीस विभागाची मदत घेऊन एकाही जनावराची वाहतुक होणार नाही याची दक्षता घ्यावी. बाधित पशु निदर्शनास आल्यास त्याची माहिती संबंधित ग्रामपंचायत व नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास द्यावी. पशुबाजारामध्ये यापुढे टॅगींग व लम्पी रोग प्रतिबंधक लसीकरणाची खात्री झाल्याशिवाय जनावरांची खरेदी, विक्री करु नये व याबाबत बाजार समित्यांनी काटेकोर कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी याव्ोळी संबधितांना दिल्यात.
लंपी स्किन डिसीज रोग हा अंत्यत संसर्गजन्य असल्याने आणि त्याचा प्रसार गोचिड-गोमाशा व डास यांच्यामार्फत होत असल्याने गावातील सर्व गोठ्यांचे शक्यतो एकाच दिवशी औषधाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात याव्ो. याबाबत सर्व ग्रामसेवक यांनी निर्जंतुकीकरण मोहीम राबवावी, असे सांगून त्या म्हणाल्या, नंदुरबार जिल्ह्याच्या आंतरराज्य सिमेवर पशुसंवर्धन, परिवहन व गृह विभागाने संयुक्तरित्या गस्त ठेवून जिल्ह्यात येणाऱ्या जनावरांचे नियंत्रण कराव्ो. २८ दिवसांपुर्वी लंपी स्किन डिसीज लसीकरण झालेल्या जनावरांनाच जिल्ह्यात प्रव्ोश द्यावा. तसेच नगरपालिका क्षेत्रात मोकाट जनावरांना बंदिस्त करून त्यांचे लसीकरण व टॅगींग संबंधितांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून करुन घ्याव्ो. याव्ोळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उमेश पाटील जिल्ह्यातील लंपी स्किन डिसीजची सद्यस्थितीची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here