Author: Saimat

साईमत, शिंदखेडा: प्रतिनिधी स्वराज्य प्रतिष्ठान आणि एन. डी. मराठे शैक्षणिक संकुल यांच्या वतीने सैनिकांना 2160 राख्या पाठविण्यात आल्या. घरोघरी विविध सण, उत्सव साजरे होत असताना देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना मात्र, कुठलाही सण नाही की उत्सव नाही, देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असल्यामुळे रक्षाबंधन असो, भाऊबीज असो, अशा उत्सवाची ते आतुरतेने वाट पाहात असतात.. रक्षाबंधनानिमित्त स्वराज्य प्रतिष्ठान, शिंदखेडा संचालित अण्णासाहेब एन. डी. मराठे शैक्षणिक संकुलातर्फे सीमेवरील सैनिकांना राखी पाठवून ‘सैनिको हो तुमच्यासाठी..’ अशी भावना व्यक्त करीत आम्ही तुमच्या सोबत आहोत, हे दाखवून दिले.विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी रेशीम धाग्याच्या अतिशय आकर्षक, सुबक राख्या स्वतः तयार केल्या आणि सोबतच…

Read More

साईमत, धुळे : प्रतिनिधी जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या गोराणे या एका छोट्याशा खेडेगावातील सर्वसामान्य रिक्षाचालकाच्या मुलाने आपली कल्पकता वापरून विविध प्रकारचे आकर्षक फिचर्स असणारी ’इलेक्ट्रीक बाईक’ तयार केली आहे. भूषण नंदू कदम असे या तरुणाचे नाव असून मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्याने फिजिक्स विषयातून आपली मास्टर डिग्री पूर्ण केली आहे. परदेशात नोकरीची संधी उपलब्ध असतानाही त्याने भारतातच राहून देशासाठी काहीतरी ’इनोव्हेशन’ करायचे ठरवले. इंधनाचे वाढते दर आणि दुसरीकडे इंधनाची भासणारी टंचाई या बाबी डोळ्यासमोर ठेवून विविध कंपन्यांनी वीजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बाइक बनविण्यावर भर दिला. जनतेचाही या बाईकला प्रतिसाद मिळू लागला. परिणामी आज मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक बाईक दिसू लागल्या…

Read More

साईमत, मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या एनडीए युतीविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचे काम सुरु आहे. विरोधकांनी या आघाडीचे नाव इंडिया असे ठेवले आहे. या आघाडीची बैठक मुंबईत होत असताना आता एनडीएने देखील त्याच दिवशी मुंबईत बैठकीचे आय़ोजन केले आहे. ‌‘इंडीया‌’ची बैठक १ सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. तर राज्यातील एनडीएची बैठक १ सप्टेंबरलाच आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेनेचा एकनाथ िंशदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट सहभागी होणार आहे. प्रागतिक विकास मंच इंडियात जाणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार विरोधी आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवार हे एनडीएच्या बैठकीला जाणार आहेत.…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी भुसावळ येथील भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले पाच माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली आहे. माजी मंत्री आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये प्रव्ोश झाला. यामुळे भुसावळ शहरातील राष्ट्रवादीच्या खडसे गटाला मोठे िंखडार पडले आहे. पालिकेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपण्यापूर्वी १७ डिसेंबर २०२१ रोजी भाजपच्या ९ नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात पक्षप्रव्ोश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा त्यांनी घेतला होता. यात माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक ॲड. बोधराज चौधरी, माजी नगरसेविका शैलजा नारखेडे यांचे पती पुरुषोत्तम नारखेडे, माजी नगरसेविका शोभा नेमाडे यांचे पुत्र दिनेश नेमाडे व अनिकेत पाटील यांचा…

Read More

साईमत,नंदूरबार : प्रतिनिधी तालुक्यातील आसाने गावातील रोहिदास ओंकार पाटील या शेतकऱ्याने कर्जबारी पणाला कंटाळून आत्महत्या केली आहे.नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिला असून या आव्हानाला नंदुरबार तालुक्यातील आसाने या गावातील शेतकऱ्याला पेलता आला नाही. त्यामुळे या शेतकऱ्याने कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या केली.रोहिदास ओंकार पाटील या शेतकऱ्याने शेतातच जीवन संपवलं. युनियन बँक रनाळे या बँकेचा एक लाख वीस हजाराच्या कर्ज 2020 पासून होतं. नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पावसामुळे अनेक संकट शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहणार आहे. शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणार का नाही; अशी परिस्थिती उद्भवली असून अनेक शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज घेऊन पेरणी केल्या आहेत.…

Read More

साईमत,शिरपूर : प्रतिनिधी चाळीसगाव येथे एकला चिरडून महामार्गवरून पसार झालेल्या भरधाव ट्रॅकला मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर टोलनाक्यावर ट्रकसह चालक व सहचालक दोघांना ताब्यात घेतल्याची कामगिरी शिरपूर महामार्ग पोलीसांनी केली आहे. संशयीत चालक जाव्ोद राजू खान (वय 24), सहचालक अरमान निसार खान (वय 18) रा देवानगरी हरियाणा यांच्यासह आरजे 11 जिसी 0513 क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेत चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.सदर संशयीत भरधाव ट्रक बेंगलोरहून दिल्ली येथे चाळीसगावमार्गे नारळ भरुन जात असतांना 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास चाळीसगाव येथील खडकी बायपासवर अशोक मगर या 65 वर्षीय व्यक्तीला चिरडून पसार झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या संशयीत ट्रकचा शोधकामी चाळीसगाव शहर पोलिसांकडून…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील शिवाजी महाराज नगरातील मशिदीसमोर असलेली एक तीन मजली जुनी इमारत मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. यात चार जण या इमारती खाली अडकले होते. त्यापैकी तिघांना वाचविण्यात यश आले असून एक ७५ वर्ष वयाची महिला इमारतीच्या ढीगाऱ्याखाली अडकली होती. तिला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. पण ती वाचू शकली नाही. तिचा दबून मृत्यू झाला. राजश्री सुरेश पाठक असे त्या महिलेचं नाव आहे. बंद घरात पूजा करण्यासाठी आणि पाणी भरायला पाठक कुटुंबिय आले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. जळगाव शहरातील शिवाजी नगरात सुमारे ७० वर्ष जुनी इमारत आहे. पाठक कुटूंबियांची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये…

Read More

साईमत, तळोदा : प्रतिनिधी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी धडगाव येथे जात असताना तळोदा तालुक्यातील कोठार येथील अनंत ज्ञानदीप आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची संवाद साधून चर्चा व इतर केले. प्रत्यक्षात मंत्री महोदयाशी चर्चा केल्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील भारावून गेले. शासकिय कार्यक्रमासाठी धडगाव येथे जात असताना रस्त्यालगत असणाऱ्या तळोदा तालुक्यातील कोठार येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेला भेट दिली. याव्ोळी श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, कोठार आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्‍वर पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक जयवंत मराठे, आदीसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. याव्ोळी त्यांनी विद्यार्थ्यांशी…

Read More

साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील महिलांना मोदी सरकारने राखी पोर्णिमेच्या एक दिवस आधी भेट दिली आहे. उद्यापासून म्हणजे बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, ओनम आणि राखी पोर्णिमेच्या निमित्ताने मोदी सरकारने देशभरातील महिलांना गिफ्ट दिले आहे. बुधवारपासून देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ७५ लाख भगिनींना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे.. त्यासाठी त्यांना एक रुपयाही द्यावा लागणार नाही. पाईप, स्टोव्ह आणि सिलेंडरही मोफत मिळेल. जगभरात गॅसच्या किमती वाढल्या आहेत,…

Read More

साईमत, धुळे : प्रतिनिधी तालुक्यातील धामणगांव येथे सालाबादाप्रमाणे तिथीनुसार श्रावण महिन्यात पोर्णिमेच्या एक दिवस अगोदर गोरक्षनाथ महाराजांची यात्रा भरते. या यात्रा महोत्सवानिमीत्त दि.29 ऑगस्ट रोजी विराट कुस्त्यांच्या सामान्याचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्यांच्या सामनांचे उद्घाटन धुळे ग्रामीणचे भाजपा युवानेते तथा जि.प.सदस्य राम भदाणे यांच्याहस्ते पहिली मानाची कुस्ती लावून करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.धुळे तालुक्यातील धामणगांव येथे गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रा महोत्सवानिमीत अनेक वर्षापासून कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते. ह्या कुस्त्यांसाठी व्ोल्हाणे, सावळीतांडा, बोरकुंड, शिरुडसह धुळे व जळगांव, मालेगांव जिल्ह्यातून पहेलवान (कुस्तीगीर) आलेले होते. सदर कुस्तींचा सामाना बघण्यासाठी धामणगांव पंचक्रोषीतील व धुळे तालुक्यातील कुस्तीशकिनांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती.…

Read More