वृद्धाला चिरडून ट्रकचालक ट्रकसह झाला होता पसार

0
12

साईमत,शिरपूर : प्रतिनिधी
चाळीसगाव येथे एकला चिरडून महामार्गवरून पसार झालेल्या भरधाव ट्रॅकला मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर टोलनाक्यावर ट्रकसह चालक व सहचालक दोघांना ताब्यात घेतल्याची कामगिरी शिरपूर महामार्ग पोलीसांनी केली आहे. संशयीत चालक जाव्ोद राजू खान (वय 24), सहचालक अरमान निसार खान (वय 18) रा देवानगरी हरियाणा यांच्यासह आरजे 11 जिसी 0513 क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेत चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.सदर संशयीत भरधाव ट्रक बेंगलोरहून दिल्ली येथे चाळीसगावमार्गे नारळ भरुन जात असतांना 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास चाळीसगाव येथील खडकी बायपासवर अशोक मगर या 65 वर्षीय व्यक्तीला चिरडून पसार झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या संशयीत ट्रकचा शोधकामी चाळीसगाव शहर पोलिसांकडून महामार्ग पोलीस यंत्रणेला सतर्क करण्यात आले होते.त्यानुसार शिरपूर महामार्गावर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने शिरपूर टोलनाका येथे सापळा रचला होता. दरम्यान सदर संशयीत ट्रकसह दोघांना ताब्यात घेत 24 ऑगस्ट रोजी पहाटे 1 वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलीसांच्या ताब्यात दिले. सदरची कारवाई धुळे महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवद येथील मदत पोलिस केंद्राचे पीएसआय नरेंद्र पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुजराती, पोना पाटील, पोलीस कोन्स्टेबल रोकळे, भागवत, खैरनार शहा, सोनवणे,वाघ आदींनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here