साईमत, सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. मात्र या रस्त्यावर संगमनेर नाका ते बस स्थानक दरम्यान पडलेले खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदाराकडून डांबर फवारण्यात आले होते. बुधवारी कडकडीत उन्हामुळे हे डांबर वितळून रस्ता निसरडा झाला व अनेक दुचाकी स्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या. सिन्नर शहरातून जाणाऱ्या या मार्गाच्या दुरुस्तीसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय रस्ते निधीतून सुमारे 13 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. साडेआठ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी कामाची गुणवत्ता खराब असल्याचे नागरिकांच्या तक्रारीतून वारंवार सांगण्यात आले. मात्र या दुरुस्ती कामाची देखरेख करणाऱ्या यंत्रणेकडून…
Author: Saimat
साईमत, नाशिक : प्रतिनिधी राज्यात गेल्या सात महिन्यांत सर्वाधिक 578 अपघाती मृत्यू नाशिकमध्ये झाले. महाराष्ट्रात रस्ता अपघातांत 15 हजार 224 मृत्यू झाले असून, देशात राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. शहरांप्रमाणेच खेड्यापाड्यांपर्यंत रस्त्यांचे जाळे पोहोचल्याने वाहनांची संख्याही वाढली. चकाचक रस्त्यांमुळे व्ोगही वाढला. परंतु, वाहन चालविताना वाहतूक नियमांचा जाणीवपूर्वक विसर पडल्याने अपघातांची संख्या व्ोगाने वाढत आहे. परिणामी, विशेषत: दुचाकी अपघाती मृत्युंमध्ये हेल्मेट न घातल्याने सर्वाधिक मृत्यू झाले. तर, समृद्धी महामार्गावरील अपघातातील 101 बळी हे मनुष्य चुकीमुळेच गेले आहेत. रस्ता अपघातांत बळी जाण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले आहे. जगभरातील रस्ता अपघातांत वर्षाला 13 लाख मृत्युमुखी पडतात, तर भारतात एक लाख 53 हजार…
साईमत, नाशिक : प्रतिनिधी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय अशोक नगर सातपूर, या शाळेत रक्षाबंधन निमित्त पर्यावरण पूरक राखी ’माननीय मुख्याध्यापक डॉ. अनिल माळी व कलाशिक्षक चंदर मिरके यांच्या संकल्पनेतून वापरलेल्या विविध रंगांच्या साड्यानं पासून भव्य राखी तयार करण्यात आली.यासाठी विद्यार्थ्यांनी साड्यांचे संकलन केले. राखीचा व्यास 32 फूट एकूण लांबी 120 फूट तसेच जवळजवळ 80 साड्यांचा वापर करून भव्य अशी पर्यावरणपूरकराखी तयार करण्यात आली. इयत्ता आठवीतील विद्यार्थी संकेत गोपाळ, रणवीर पाटील, हर्षद बोरसे, प्रणव पाटील, अश्विनी वाघ, शिवानी बेडसे, करण निकम, आर्यन सूर्यवंशी, व्ोदांत सांगळे, प्रणव वानखेडे, ज्ञानेश बोरसे, सौरभ कदम, पार्थ अहिरराव व शाळेतील शिक्षक योगेश ओहोळ, संदीप…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी शहर व जिल्हा सेपक टकारॉ असोसिएशनतर्फे जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल याठिकाणी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांची सुरुवात करण्यात आली. या वेळी हॉकीचे राष्ट्रीय खेळाडू इक्बाल मिर्झा यांनी ‘मेजर ध्यानचंदच्या हॉकीमध्ये योगदान’ याविषयी सर्व उपस्थित खेळाडूंना माहिती दिली. स्पर्धा 17 वर्ष आतील व 19 वर्षा आतील अश्ाा दोन गटात घेण्यात आली. सदर स्पर्धेत आठ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत अँग्लो उर्दू हायस्कूलच्या दोन्ही संघ विजयी राहिले. विजयी व उपविजयी तसेच उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिक देण्यात आले.पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, इकबाल मिर्झा, प्रविण पाटील, प्रा. वसीम…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी जिल्हा कारागृहातील बंदी बांधवांना नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरी केली. न्यायबंदी हे वेगवेगळ्या ठिकाणचे असून छोट्या- मोठ्या गुन्ह्याबद्दल जिल्हा कारागृहात बंदी असून ते आपल्या घरापासून दूर आहेत. त्यांचे अशा सामाजिक उपक्रमाने मनपरिवर्तन होण्यास मोठे सहकार्य होईल, या भावनेतून अध्यक्षा मनिषा पाटील यांच्यासोबत संस्थेच्या सचिव श्रीमती ज्योती राणे व कार्याध्यक्ष नूतन तासखेडकर यांनी न्यायबंदी बांधवांना राख्या बांधल्या. याप्रसंगी अहोरात्र कर्तव्यावर असणारे अधीक्षक वाढेकर साहेब, तुरुंगाधिकारी कंवर साहेब, अनिल पाटील, गजानन पाटील, जेल सुभेदार , नेवाडे हवालदार आदी पोलीस बांधव व पोलीस कर्मचाऱ्यांना देखील राख्या बांधण्यात आल्या.
साईमत, जळगाव , प्रतिनिधी नाट्याशास्त्राचे शिक्षण घेण्याचे खान्देशातील तरूणांचे स्वप्न आता पूर्ण होणार असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए. (नाट्यशास्त्र) हा दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम या वर्षापासून सुरू होत आहे. नाटक, सिनेमा, दूरचित्रवाणी या क्षेत्रात कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासाठी वाढत असलेली संधी लक्षात घेवून विद्यापीठात नाट्यशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असावा, अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. शहरातील नाट्यसंस्था व रंगकर्मींनी तशी मागणीदेखील यापूर्वी विद्यापीठाकडे निवेदनाव्दारे केली होती. रंगकर्मीच्या या भावना लक्षात घेवून कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या कला व मानव्यविद्या प्रशाळातंर्गत असलेल्या डिपार्टमेंट ऑफ परर्फामिंग आर्टस् मध्ये एम. ए. नाट्यशास्त्र हा दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी शहरातील आसोदा रोडवरील वाल्मीक नगरात असलेल्या घरकुल चौकात शिवीगाळ करणाऱ्यास जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणासह त्यांच्या आईला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजेंद्र भगवान सोनवणे (वय-३२) रा. वाल्मिक नगर, जळगाव हा श्याम तुकाराम सूर्यवंशी रा. घरकुल चौक, वाल्मिक नगर याला शिवीगाळ केल्याबद्दल जाब विचारण्यासाठी गेला होता. यावेळी श्याम सूर्यवंशी याने राजेंद्र सोनवणे आणि त्याच्या आईला शिवीगाळ केली. त्यानंतर राजेंद्रला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लोखंडी आसारी मारून दुखापत केली. या घटनेनंतर राजेंद्र सोनवणे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात…
साईमत,जळगाव, प्रतिनिधी कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थीनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या झाडांना बांधून प्रेम व्यक्त केले. जवळजवळ ८० विद्यार्थीनींनी शालेय परिसरातील वेगवेगळ्या झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरित सेना प्रमुख संजय बाविस्कर, अनिल शेलकर यांनी केले होते. तसेच कार्यक्रमासाठी जे.एस.चौधरी, नरेश फेगडे, हर्षदा जगताप, वैशाली कोठावदे, पल्लवी पाटील, नीता पाटील, अर्चना कोठावदे यांचे योगदान लाभले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर, उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक निकम, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख संजय बाविस्कर आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम ज्येष्ठ शिक्षक एस.डी.भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
साईमत, जळगाव, प्रतिनिधी साळी समाजाचे आद्यदैवत आणि सृष्टीचे मूळ वस्त्र निर्माता भगवान जिव्हेश्वर यांची जयंती मंगळवारी राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला सकाळी 6 वाजता भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते रामदास डहाके यांनी पोथी वाचन केले. सत्यनारायणाची पूजा सौरभ-दिव्या वाव्हळ आणि अभिषेक-कल्याणी आदमने या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाज बांधव सुधाकर वाव्हळ होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष अरुण डहाके, विद्यमान अध्यक्ष राजु खेडकर, जिल्हाध्यक्ष अशोक दिवटे, कोषाध्यक्ष नाना भोगरे, सहसचिव पद्माकर आखडकर, नाना भागरे आदी उपस्थित होते. स्वागतगीत दीपाली खंडारे, नेहा खंडारे यांनी म्हटले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा हा जलजीवन मिशनमध्ये राज्यात पहिला तर देशात ६१ वा आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशभरात जलजीवन मिशन ही योजना अंमलात आली आहे. याच्या अंतर्गत २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरापर्यंत नवीन निकषानुसार पिण्याचे शुध्द पाणी पोहचवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात ही योजना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपदाची धुरा असणारे ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. या योजनेतून अगदी वाडी-वस्त्या आणि दुर्गम भागापर्यंत शुध्द पेयजल पोहचवण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. या प्रयत्नांना आता फळ लाभल्याचे दिसून येत आहे. जलजीवन सर्वेक्षण-२०२३ अंतर्गत जलजीवन मिशनच्या…