साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. ब.गो.शानभाग विद्यालय, सावखेडा येथे संस्कृतदिना निमित्त इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृतसप्ताह पाळण्यात आला. त्यानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत गप्पांचा कार्यक्रम चागांलाच रंगला होता. या संस्कृतसप्ताहासाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या संस्कृत गप्पांच्या कार्यक्रमात प्राध्यापक डॉ.अखिलेश शर्मा यांच्याशी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी अस्खलित संस्कृत भाषेत संवाद साधला. यात शैक्षणिक, राजकीय, चंद्रयान, आदित्य एल., संस्कृत वाङ्मय, संस्कृत काव्य, व्याकरण अश्या वेगवेगळ्या विषयावर सरांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच संस्कृत विषयाचे ज्ञान वाढविण्यासाठी आणि गुणवत्तेसाठी कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा असतात यावर सविस्तर अशी चर्चा करण्यात आली. या चर्चेत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची सरांनी त्यांच्या दिलखुलास शैलीत समर्पक…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील योग मार्गदर्शन केंद्राच्या सहायक प्राध्यापिका डॉ. लीना चौधरी यांना मुंबई विद्यापीठाने योगशास्त्रात पीएच.डी प्रदान केली आहे. डॉ. लीना चौधरी यांनी डॉ. तबस्सुम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली “इफेक्ट ऑफ योगिक प्रॅक्टीसेस अॅड नस्य ऑन मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स अमंग अॅडालसन्स गर्ल्स : आयुर्वेद अॅण्ड सायकॉलॉजी अॅप्रोच” या विषयावर प्रबंध सादर केला. मौखिक परीक्षेनंतर त्यांना पीएच.डी प्रदान करण्यात आली. त्याबद्दल कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, योग मार्गदर्शन केंद्रप्रमुख व विद्यापीठ उपअभियंता इंजि. राजेश पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य नंदकुमार बेंडाळे तसेच विभागातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन…
साईमत जळगाव प्रतिनिधी मुंबई येथे उपचार घेतअसतांना वयाच्या 89 व्या वर्षी गुलजार आजमी यांचे देहांत झाले असून त्यांना जमियत उलमा जळगाव तर्फे श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी मुफ्ती हारून नदवी, मुफ्ती अतिकउर रहमान, करीम सालार, फारुख शेख यांनी गुलजार आजमी यांच्या कारकिर्दीची माहिती विशद केली. यावेळी मुफ्ती हारून नदवी, मुक्ती अफजल, हाफिज रहीम पटेल, कारी पटेल, कारी मुस्ताक, मौलाना अब्दुल रहमान, ईकराचे अध्यक्ष करीम सालार, मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख आदींची उपस्थिती होती.
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील रस्त्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी शिवकॉलनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले. शहरातील रस्त्यांसह इतर कामांना तात्काळ गती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेव चौक आणि अजिंठा चौकात याठिकाणी प्रस्तावित उड्डाणपुल मंजूर झालेले असतांना सुध्दा उड्डाण पुल होत नाही. यामुळे महामार्गावर निष्पाप नागरीकांचा अपघातात बळी जात आहे. याबाबत मनसेने वेळोवळी निदर्शने, आंदोलन, मोर्चा आणि उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतू प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाप्रशासन, महापालिका प्रशासन, आमदार, खासदारांसह तिन मंत्र्यांचे…
साईमत जळगाव प्रतिनिधी सारांश फाऊंडेशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्त्यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आ. राजुमामा भोळे, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकूंद सपकाळे , छावा मराठा युवा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अमोल कोल्हे, सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा निलू इंगळे , उपाध्यक्षा इंदू मोरे , संजय इंगळे आदीउपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी , राजर्षी शाहू , महात्मा फुले, सावित्रीबाई फुले , बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलू इंगळे…
स्वयंंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरच्या किंमतीत दोनशे रुपयांची कपात नुकतीच जाहीर करण्यात आली.त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सरासरी ९०५ रुपये किंवा त्याच्या आसपास झाली.उज्ज्वला योजनेत सिलिंडरमागे अनुदान असतेच त्यात वाढ झाल्याने आता या योजनेतील सिलिंडरसाठी साधारणपणे ७०३ रुपये मोजावे लागतील. ही घोषणा करण्यासाठी मोदी सरकारने मुहूर्त चतुराईने निवडला. देशातील कोट्यवधी भगिनींना आपली ही रक्षा बंधनाची भेट आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जाहीर केले. इतरांना नावे ठेवण्याबरोबरच, योजनांना नावे देणे, घोषणा करणे यात संघ व परिवार कुशल आहे. मोदी हे तर प्रचारकच आहेत. लोकसभेत मांडल्या गेलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेस दिलेले प्रदीर्घ उत्तर, नंतर स्वातंत्र्यदिनी केलेले दीर्घ…
साईमत जळगाव प्रतिनिधी सत्संग जीवनाचा आधार आहे. नामस्मरण झाल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही. जितकी तुम्ही पूजा-अर्चा कराल तितके तुमचे जीवन उजळ होईल. शिवशंभू प्रभू हा एक ब्रँडेड साबण आहे, जो आतून आणि बाहेरून सर्व घाण आणि डाग धुतो. नामस्मरणासाठी म्हातारपणाची वाट पाहू नका. तारुण्यात देवाचे स्मरण करत राहा, आयुष्य पुढे जाईल. कोणाकडे कितीही संपत्ती असली तरी शिवकथा ऐकूनच आत्मिक शांती मिळते. ईश्वरप्राप्तीसाठी जीवनात सर्व सोयी असणे आवश्यक नाही, तर सत्कर्म आणि ईश्वरसेवा हेच आवश्यक आहे. असे महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी (बापू) यांनी शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून शिवभक्तांना सांगितले. महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजींचे स्वागत दीपक साखरे यांनी केले तर शहराच्या प्रथम नागरिक तथा…
साईमत जळगाव प्रतिनिधी युवा सेना जळगाव महानगर तर्फे यावर्षी निष्ठा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडीप्रसंगी देण्यात येणाऱ्या ट्रॉफी चे अनावरण युवा सेना प्रमुख तथा राज्याचे माजी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच मुंबईत करण्यात आले. येत्या सात सप्टेंबर रोजी होणाऱ्या दहीहंडी महोत्सवाचे आयोजन यावर्षी युवा सेना जळगाव महानगर तर्फे करण्यात येत आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात असून निष्ठा दहीहंडी ही मोठ्या दिमाखात साजरा करण्याची तयारी आयोजक युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी, महानगर समन्वयक महेश ठाकूर, महानगर प्रमुख अमोल मोरे, यश सपकाळे यांनी केली आहे. निष्ठा दहीहंडीचे हे पहिले वर्ष असून यात शिवगंध…
साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, शहरात शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शाम तायडे यांच्या नेतृत्वात रविवारी ३ सप्टेंबर रोजी खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारकापासून जनसंवाद यात्रेची सुरुवात करण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारकापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, भोईटे नगर, रथ चौक, सोनार गल्ली, सुभाष चौक, घाणेकर चौक, टॉवर चौक, मार्गे जात कॉर्नर सभा घेऊन काँग्रेस भवन येथे यात्रेचा समारोप करण्यात आला. प्रसंगी भाजपा सरकारची कारकीर्द व जनतेचे होणारे हाल याचे लेखा जोखा असलेली माहिती असलेलीपत्रके वाटण्यात आले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, उपाध्यक्ष विजय वाणी,…
साईमत जळगाव प्रतिनिधी भारतीय जैन संघटना ही खुप नियोजन करून प्रश्न सोडविते. आपल्याजवळ असलेला मनुष्यबळ, संसाधने याचा विचार करून ते पुढे जातात , देशाच्या विकासात या संघटनेचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ते भारतीय जैन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात रविवारी ३ सप्टेंबर रोजी दुसरे राज्यस्तरीय सभेच्या आयोजन प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा अधिकारी पुढे म्हणाले, कोरोना काळात कोविड मुक्त गाव साठी जैन संघटनेचे योगदान मोठे आहे. १ हजार ३८५ ग्रामपंचायत होती. पैकी ३८ ग्राम पंचायतीत एक ही कोविड पेशंट मिळाला नाही. तसेच ६०० ग्रामपंचायतीत केवळ १० रूग्ण होते. त्यामुळे ऊर्जा निर्माण झाली.…