Author: saimat

 अमळनेरमध्ये धक्कादायक घटना साईमत/अमळनेर /प्रतिनिधी वाहन चालवताना साईड न दिल्याच्या सामान्य वादातून एक व्यापारी गंभीर तोडफोडीचा बळी ठरला. गुरूवारी, १९ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे ४ वाजता, अमळनेर तालुक्यातील डांगर गावातील बसस्थानकासमोर ही धक्कादायक घटना घडली. चार संशयितांनी मिळून तुषार लालचंद पवार (वय २४, रा. शारदा कॉलनी, अमळनेर) यांच्या कारला अडवून तिची तोडफोड केली. या घटनेत संशयित आरोपी शुभम सुनील पाटील, मुकेश प्रकाश सोनवणे, सुनील धुडकू पाटील आणि धिरज सुनील पाटील (सर्व रा. डोंगर, ता. अमळनेर) यांनी ट्रॅक्टर ट्रॉलीसह तुषारची कार रस्त्यात आडवी लावली. साईड का दिली नाही या कारणावरून त्यांनी तुषारला अश्लील शब्दांनी त्रास दिला, कारच्या बोनेटवर दगड फेकून आणि ट्रॅक्टरने…

Read More

लग्नमंडपात रक्तरंजित संघर्ष व्हॉट्सअ‍ॅप वादातून तिघांचा मृत्यू, धुळे जिल्हा हादरला साईमत/धुळे/प्रतिनिधी आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरणाने भरलेला लग्नसोहळा क्षणात शोकसभेत परिवर्तित झाल्याची हृदयद्रावक घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील नीलकंठ नगर परिसरात गोसावी समाजाच्या लग्नकार्यादरम्यान झालेल्या भीषण हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नीलकंठ नगर येथे विजय गोसावी यांच्या मुलीचा विवाह सोहळा सुरू होता. हळदीच्या कार्यक्रमाची लगबग सुरू असताना साखरपुड्याची तयारीही सुरू होती. साक्री व सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये अचानक वादाची ठिणगी पडली.…

Read More

महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ; सागर पार्कमध्ये सहावा खान्देश महोत्सव साईमत/जळगाव/प्रतिनिधी स्थानिक महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगाव शहरात ‘खान्देश महोत्सव २०२६’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. येत्या २६ फेब्रुवारीपासून सागर पार्क येथे हा महोत्सव रंगणार असून ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून स्थानिक उत्पादनांना नवे व्यासपीठ मिळणार आहे. नागरिकांना खान्देशच्या समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरेचा अनोखा अनुभव या निमित्ताने घेता येणार आहे. जळगाव महानगरपालिका आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा सहावा महोत्सव २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. महापौर…

Read More

तलवार आणि दुचाकी जप्त व ११,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत साईमत/पाचोरा/प्रतिनिधी पाचोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला पोलीसांनी बुधवारी सायंकाळी रंगेहात पकडले. भडगाव रोडवरील अंतुर्ली फाट्याजवळ झालेल्या कारवाईत आरोपीकडून एक धारदार तलवार आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ११,५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव रोडवरील अंतुर्ली फाटा परिसरात सायंकाळी सुमारे ५ वाजता एक तरुण संशयास्पदरीत्या वावरत असल्याची माहिती पाचोरा पोलीसांना मिळाली. या तक्रारीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल संदीप बजरंग राजपूत आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. पोलिसांच्या झडतीत संशयित आरोपी ललीत गोपाळ चौधरी (वय २८, रा. न्हावी गल्ली, पारोळा) यांच्या ताब्यातून एक…

Read More

आरोग्य, पाणी व पथदिव्यांवरून प्रशासनाला धारेवर; अधिकाऱ्यांची झाडाझडती साईमत/जळगाव/प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दालनात बुधवारी (दि. १८) प्रभाग क्रमांक १३ मधील प्रलंबित प्रश्न आणि तक्रारींवर विशेष बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेवकांनी आरोग्य, पाणीपुरवठा आणि पथदिवे या मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाला जाब विचारत समस्यांचा पाढाच वाचला. नागरिकांच्या तक्रारींना गांभीर्याने घेत महापौर दीपमाला काळे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत पुढील आठ दिवसांत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले. “यापुढे तक्रारी येता कामा नयेत; अन्यथा कारवाईचा विचार केला जाईल,” असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. बैठकीच्या सुरुवातीलाच आरोग्य विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नगरसेविका सुरेखा तायडे यांनी घंटागाडीच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित करत “घंटागाडीचे…

Read More

कोर्ट चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; घोषणांनी दुमदुमला परिसर साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरात कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कोर्ट चौक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण करत उपस्थितांनी स्वराज्य स्थापनेच्या त्यांच्या अद्वितीय कार्याला सलाम केला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी लवकर करण्यात आली. कंजरभाट समाजातील युवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने कोर्ट चौकात एकत्र आले होते. महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताच परिसर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी दुमदुमून गेला. वातावरणात उत्साह, अभिमान आणि राष्ट्रप्रेमाची भावना स्पष्ट जाणवत होती. या प्रसंगी संस्थेचे मुख्य सल्लागार…

Read More

 शिवजन्मोत्सवी रॅली, नृत्य आणि  सजीव देखाव्यांनी रंगला सोहळा साईमत/जळगाव/प्रतिनिधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहर आज अक्षरशः भगवेमय झाले. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आणि जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याने संपूर्ण शहरात उत्साह, अभिमान आणि ऐक्याची ऊर्जा निर्माण केली. सकाळच्या पहिल्या प्रहरीपासूनच शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी उसळली होती. शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि इमारती भगव्या ध्वजांनी सजल्या होत्या. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. प्रत्येकाच्या मुखी शिवनाम आणि मनात शिवभक्तीचा जाज्वल्य भाव दिसून येत होता.रॅलीची भव्य सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून करण्यात…

Read More

महापौरांची आक्रमक कारवाई गेंदालाल मिल परिसरातील अस्वच्छतेसाठी पाच दिवसांचा अल्टिमेटम साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील वाढत्या अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर गेंदालाल मिल परिसरातील गंभीर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून महापौर दीपमाला काळे यांनी प्रशासनाला पाच दिवसांत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचा कठोर अल्टिमेटम दिला आहे. वारंवार तक्रारी येत असतानाही सुधारणा न झाल्याने महापौरांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्थानिक नगरसेवकांकडून मिळालेल्या तक्रारीनंतर १७ फेब्रुवारी रोजी महापौरांनी पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह परिसराचा दौरा केला. गल्लीबोळांत साचलेला कचरा, नाल्यांमधील घाण आणि परिसरात पसरलेली दुर्गंधी पाहून त्यांनी तिळबद्ध नाराजी व्यक्त केली. स्वच्छता निरीक्षक अजय चांगरे यांना कामातील हलगर्जीपणाबद्दल जाब विचारला आणि ठराविक मुदतीत काम पूर्ण न झाल्यास कठोर…

Read More

ट्रॅक्टर चालकाने पथकाला पाहताच वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेऊन पळ काढला साईमत/जळगाव/ वाकडी /प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील वाकडी गावातून अवैध वाळूची वाहतूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल पथक कारवाईसाठी गेले असता चालक पसार झाला. ही घटना सोमवारी, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे-दहा वाजेच्या सुमारास घडली. जळगाव तालुका महसूल पथकाला वाकडी गावातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील विठ्ठल काशीनाथ पाटील आणि महसूल सेवक रामदास मंगा भंगाळे हे पथक कारवाईसाठी रवाना झाले होते. पथकाने जप्ती करण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रॅक्टर चालकाने पथकाला पाहताच वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेऊन त्वरित पळ काढला. याबाबत रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस पाटील विठ्ठल…

Read More

महावितरणचे १३२ केव्ही क्षमतेचे सबस्टेशन धोका टळला  साईमत/धरणगाव/प्रतिनिधी धरणगाव-चोपडा रोडवरील औद्योगिक वसाहतीत आज दुपारच्या सुमारास एका भंगार गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीने परिसरात एकच खळबळ उडवून दिली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणावरील भंगार साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्यानंतर काही क्षणांतच ज्वाळांनी रौद्ररूप धारण केले. आकाशात उसळणारे काळ्या धुराचे लोट आणि आगीचे प्रचंड लोळ दूरवरून दिसत होते. त्यामुळे औद्योगिक वसाहतीसह आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांमध्ये घबराट पसरली असून अनेकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसर रिकामा केला. या घटनेतील…

Read More