नवी दिल्ली : जय श्रीराम चे नारे दिल्याने अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षकांनी मारहाण केली. ही घटना ग्रेटर नोएडा या ठिकाणी एका शाळेत घडली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी या प्रकरणी मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार केली आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी हा आरोप केला आहे की पीटी शिक्षकांनी आमच्या मुलाला जय श्रीरामचे नारे दिल्याने मारहाण केली. एवढंच नाही तर आम्ही जेव्हा संचालकांकडे दाद मागायला गेलो तेव्हा त्यांनी तुमच्या मुलाचं नाव महाविद्यालयातून काढून टाकू अशी धमकीही आम्हाला दिली असाही आरोप सदर मुलाच्या पालकांनी केला. याबाबत मिळालेली माहिती अशी की शाळेत स्वातंत्र्य दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ११ वीत शिकणाऱ्या मुलाने…
Author: saimat
श्रीनगर : मुस्लीम आधी हिंदूच होते, धर्मांतरानंतर ते मुस्लीम झाले, असे वादग्रस्त वक्तव्य डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी केलं आहे. डोडा जिल्ह्यात एका मेळाव्यात संबोधित करताना ते बोलत होते. डोडा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यात गुलाम नबी आझाद म्हणाले की, “आमच्याकडे काश्मीरचे उदाहरण आहे, ६०० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये एकही मुस्लिम नव्हता, काश्मिरी पंडितांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले होते. केवळ भारतातच नाही तर जगभर मुस्लिम धर्म स्वीकारला गेला. इस्लाम १५०० वर्षे जुना आहे, पण हिंदू धर्म त्याहून जुना आहे.” गुलाम नबी आझाद म्हणाले, “आम्ही हे राज्य हिंदू, मुस्लिम, दलित, काश्मिरींसाठी बनवले आहे. ही आमची भूमी आहे, इथे बाहेरून…
मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसह विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ‘इंडिया’ आणि ‘एनडीए’ आघाडीकडून विविध ठिकाणी बैठका घेतल्या जात आहे. संबंधित बैठकीतून लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. यापूर्वी बिहारमधील पाटणा आणि कर्नाटकमधील बंगळुरू येथे विरोधी पक्षाच्या दोन बैठका पार पडल्या आहेत. या दोन्ही बैठकांमध्ये विरोधी पक्षाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. बंगळुरू येथील बैठकीतून विरोधी पक्षाच्या आघाडीचं नामकरण ‘इंडिया’ असं करण्यात आलं. यानंतर एनडीएकडूनही बैठका घेण्यात आल्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभा…
शिर्डी : काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडेंनी महात्मा गांधींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. याचे पडसाद थेट विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पडले. विरोधी पक्षांनी संभाजी भिडेंच्या अटकेचीही मागणी केली. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच महामानवांबद्दलच्या बेताल वक्तव्यांचा समाचार घेतला. ते गुरुवारी (१७ ऑगस्ट) अहमदनगरमधील शिर्डी येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात बोलत होते. अजित पवार म्हणाले, “आपल्या सर्वांचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्यजननी जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीजोती सावित्रीबाई फुले राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही सगळी महामानवं…
बारामती : घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची, वडील अशिक्षित असल्याने गवंडी कामगार. मात्र, शिक्षणाची आवड, मनात जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवल्याने बारामतीतील शंकर रामचंद्र चव्हाण हा युवक आता थेट अमेरिकेत उच्च शिक्षण घेणार आहे. शंकर हा आयआयटी गुवाहाटीमधून पदवी घेऊन एम.एस. या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना होत आहे. अनेक मुलांमध्ये आदर्श निर्माण करेल अशीच शंकरची कहाणी आहे. तेलंगणा राज्यातून उपजीविकेसाठी रामचंद्र चव्हाण हे बारामतीत कामानिमित्त स्थायिक झाले. बारामतीमध्ये ते गवंडी काम करू लागले. गवंडीकाम करता करता त्यांनी मुलगा शंकर याला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. आपण स्वतः अशिक्षित आहोत परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे…
कल्याण : कल्याण पूर्वेकडील तिसगाव परिसरात राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीची बुधवारी संध्याकाळी आपल्या आईसोबत घरी येत होती. तेवढ्यात सोसायटीच्या आवारातच आदित्य कांबळे या माथेफिरू तरुणाने तिच्यावर चाकूने सात-आठ वार करत तिच्या आईसमोर तिची हत्या केली. हत्येनंतर त्याने त्याच्याजवळची फिनाइलची पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. या गोंधळात आरोपीने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. पण, तो पूर्ण फिनेल घेणार त्यापूर्वी नागरिकांनी त्याला थांबवलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. कल्याण पूर्वेकडील तिसगाव परिसरातील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा आदित्य कांबळे हा काही दिवसांपासून पाठलाग करीत होता. याबाबत मुलीने आईला माहिती दिली. त्यानंतर ही मुलगी बाहेर पडताना…
संभाजीनगर : प्रतिनिधी शहरातील महाआरोग्य शिबिरात सर्व प्रकारचे डॉक्टर उपलब्ध झाले आहेच शिवाय मानसोपचारतज्ज्ञही उपलब्ध झाले आहेत. खरे म्हणजे टीव्ही किंवा इतर माध्यमातून महाराष्ट्रात विचारांचे प्रदूषण करणाऱ्यांवरही या ठिकाणी उपचार होण्याची गरज आहे आणि जर ‘ते’ मानसोपचार करण्याच्या पलिकडे गेले असतील तर त्यांना पागलखान्यात टाकले पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनानिमित्त विरोधकांवर निशाणा साधला. शहरात रविवारी अयोध्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री अतुल सावे,आमदार हरिभाऊ बागडे,आमदार संजय शिरसाठ,आमदार नारायण कुचे, विजया रहाटकर, आयोजक राजेंद्र…
पुणे ः खास प्रतिनिधी भारत सरकारने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिना निमित्त “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव “ साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त करावयाच्या समारोहाचा भाग म्हणून विशिष्ट प्रवर्गाच्या कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या व निकषानुसार पात्र बंद्यांना विशेष माफी देणे बाबत केंद्रीय गृह मंत्रालया मार्फत निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या समारोहातंर्गत स्वातंत्र्यदिनी राज्यातील कारागृहातून सुटका होणाऱ्या १८६ बंद्यांना गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. देशाचा ७६ वा स्वातंत्र्यदिन मंगळवारी (ता. १५) साजरा करण्यात येणार…
पुणे : खास प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पालकमंत्री श्री.पाटील यांनी स्वतः उपक्रमाचा शुभारंभ कोथरुडमधील आपल्या निवासस्थानी राष्ट्रध्वज उभारुन केला आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सांगता ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमाने होत असून त्याचाच एक भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम गतवर्षीप्रमाणे राबविण्यात येत आहे. गतवर्षी या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रत्येक देशवासीयांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन आपला…
रायपूर : वृत्तसंस्था प्रेमी युगुलात वाद होताच प्रेयसी हायटेन्शन टॉवरवर चढल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. प्रेयसी टॉवरवर चढताच तिची समजूत काढण्यासाठी प्रियकरही तिच्या पाठोपाठ टॉवरवर चढला. छत्तीसगडच्या गौरेला-पेण्ड्रा-मरवाही जिल्ह्यातील या घटनेची सर्वत्र चर्चा झाली. आता या घटनेमागची गोष्ट उघडकीस आली आहे. जिल्ह्याच्या नेवरी गावात राहणाऱ्या अनिताचा विवाह ६ वर्षांपूर्वी झाला. लग्नानंतर ४ वर्ष सगळे व्यवस्थित सुरू होते. अनिताला एक मूल झाले मात्र त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाले. त्यानंतर अनिता मुलाला पतीजवळ ठेवून गौरेलातील तिच्या माहेरी परतली. अनिता एका दुकानात काम करू लागली. तिथे तिची ओळख एका तरुणाशी झाली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांना लग्न करायचे होते. अनिताच्या…