प्रलंबित आरक्षणाच्या मुद्द्यावर त्वरित निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्या

0
1

मलकापूर : प्रतिनिधी

विशेष अधिवेशन बोलाविण्यास आदेशित करून मराठा समाजाच्या वर्षानुवर्ष प्रलंबित आरक्षणाच्या मुद्द्यावर त्वरित निर्णय घेऊन मराठा समाजास न्याय देण्यात यावा, अशी मागणी आ.राजेश एकडे यांनी थेट राज्याचे महामहीम राज्यपाल यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे. यासंदर्भात आ.एकडे यांनी मलकापुरातील साखळी आंदोलनकर्ते समाज बांधवांना अवगत केले. आ.एकडे यांनी मलकापुरातील साखळी उपोषण सुरू केलेल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेत संवाद साधला.

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्यात मराठा समाज इतर मागासवर्ग प्रवर्ग तसेच स्वतंत्र आरक्षणाच्या मागणी करता सतत उपोषण आणि आंदोलने शांततेच्या मार्गाने करीत आहेत. परंतु राज्य शासनाच्या वेळ काढू धोरणामुळे मराठा समाजाला अद्यापपर्यंत आरक्षण रूपी हक्क मिळालेला नाही. सद्यस्थितीत मराठा समाजाच्या रास्त मागणीसाठी आ.राजेश एकडे यांनी मराठा आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. गेल्या सहा ते सात दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय खालावली आहे. त्यामुळे राज्यभरात त्याचे तीव्र प्रतिसाद उमटत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here