आयडियल स्कूलला इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

0
1
आयडियल स्कूलला इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन-www.saimatlive.com

साईमत जळगाव प्रतिनिधी

शहरातील दादावाडीतील आयडियल इंग्लिश मीडिअम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतरत्न इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या जयंतीनिमित्त (राष्ट्रीय एकता दिवस)अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थाध्यक्ष आबासाहेब शिवाजीराव पाटील, सचिव डॉ. चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापक उमाकांत बुंदेले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.

मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना “इंदिरा गांधीचे प्रथम महिला पंतप्रधान म्हणून भारतीय राजकारणातील योगदान आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारतीय राज्यातील ऐक्य प्रस्थापित करण्यासाठीचे योगदान” या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here