Author: saimat

पुलावर वाहनांची लांबलचक रांग प्रशासनावर नागरिकांचा संताप साईमत /जळगाव / प्रतिनिधी शहरातील शिवाजीनगर पुलावर सोमवारी अचानक भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. पुलावर वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहनांची लांबलचक रांग लागली होती. परिणामी, वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला असून अनेक वाहनचालकांना तासन्‌तास अडकून राहावे लागले. दुपारच्या सुमारास वाढलेल्या वाहनांच्या ओघामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली. पुलावरून दोन्ही बाजूंनी ये-जा करणाऱ्या वाहनांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कोंडी अधिक वाढली. काही ठिकाणी वाहनचालकांमध्ये किरकोळ वादावादीही झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहनसंख्या, अरुंद होत चाललेले रस्ते आणि सुरू असलेली विविध विकासकामे यामुळे वाहतुकीवर ताण वाढत…

Read More

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध जनजागृतीसह मोफत लसीकरण; तज्ज्ञांकडून विद्यार्थिनी व पालकांना मार्गदर्शन साईमत /भुसावळ/ प्रतिनिधी  येथील वरणगावमधील महात्मा गांधी विद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्र, तपत कठोरा यांच्या विद्यमाने आयोजित एचपीव्ही लसीकरण अभियानांतर्गत जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. सकाळच्या सत्रात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थिनींना आरोग्याविषयी जागरूक करण्याबरोबरच गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ८ मार्च ‘जागतिक महिला दिना’पासून १४ ते १५ वर्ष वयोगटातील विद्यार्थिनींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरणामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमात डॉ. प्रशांत जैस्वाल यांनी एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थिनींना…

Read More

दक्षिणा न दिल्याच्या कारणावरून संताप; ढाबा मालकासह कामगारांविरोधात गुन्हा दाखल साईमत / पालघर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाडा-खडकोना गावाजवळ एका ढाब्यावर टेम्पो चालकावर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चालकाला बेदम मारहाण करत त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दानिश खान (वय ३०) या टेम्पो चालकावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ढाबा मालकासह त्याच्या सहकाऱ्यांविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळच्या सुमारास दानिश खान हा त्याचा सहाय्यक…

Read More

रविवारी भव्य शोभायात्रेने गावभर उत्साहाचे वातावरण निर्माण केले साईमत /जळगाव / प्रतिनिधी  पिंप्राळ्यात हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री केसरी नंदन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित पाच दिवसीय कथा सोहळा उत्साहात पार पडला. कथाकार ह. भ. प. प्रा. मनोज महाराज कुलकर्णी यांनी आपल्या सुमधूर वाणातून भक्तांना हनुमानाच्या जीवनप्रवासाची माहिती व आनंददायी कथा ऐकवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कथेदरम्यान सजीव आरास दाखवून प्रेक्षकांना दृश्यात्मक आनंद देण्यात आला. रविवारच्या भव्य शोभायात्रेत विविध रंगीबेरंगी पुतळे, धार्मिक नाट्यदृश्ये आणि सजीव देखावे शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. संध्याकाळी भक्तांसाठी भंडाऱ्याचे आयोजन देखील करण्यात आले, ज्यामध्ये उपस्थितांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष मोहन बारी, उपाध्यक्ष रुपेश महाजन, सचिव गणेश कोळी,…

Read More

माळी मंगल कार्यालयाच्या मागील घरातून मोठा साठा जप्त दोन आरोपी अटकेत साईमत /पाचोरा / प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील माळी मंगल कार्यालयाच्या मागील घरात अवैधरीत्या साठवलेला गुटखा व देशी-विदेशी दारूचा मोठा साठा पोलिस व अन्न सुरक्षा विभागाच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून संबंधित मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिम्मतराव बाविस्कर यांना गुप्त माहितीनुसार या ठिकाणची माहिती मिळाली होती. त्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या मदतीने ४ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजता माळी मंगल कार्यालयाच्या मागील घरावर छापा टाकला. या छाप्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला ‘विमल’…

Read More

राजनाथ सिंह यांच्या निर्णायक प्रत्युत्तराच्या इशाऱ्यावर आसिफ यांचे प्रक्षोभक विधान; तज्ज्ञांनी विधानाला पोकळ धमकी ठरवले साईमत / इस्लामाबाद पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला थेट युद्धाची धमकी दिल्याचे विधान शनिवारी सियालकोटमधील पत्रकारांशी संवादात केले. त्यांनी म्हटले की, “भारताने कोणतीही लष्करी कारवाई किंवा ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केल्यास, पाकिस्तान प्रत्युत्तर म्हणून थेट कोलकात्यावर हल्ला करेल.” मात्र, भारताच्या सीमेपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या कोलकात्याचा उल्लेख केल्याने संरक्षण तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी या विधानाला उपहासाचे रूप दिले असून ते फक्त पोकळ धमकी मानली जात आहे. ख्वाजा आसिफने भारतावर गंभीर आरोप करत म्हटले की, भारत पाकिस्तानविरुद्ध एखाद्या ऑपरेशनची तयारी करत आहे आणि मृतदेह ठेवून…

Read More

मुख्यमंत्री म्हणाले – एसआयटी तपास योग्य वेळी माहिती देईल; राजकारणावर कारवाईस प्रतिबंध नाही साईमत / नाशिकभोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची चौकशी आता आर्थिक गुन्हे शाखा (ईडी)कडूनही होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मते, अशोक खरातच्या गैरकृत्यात सहभागी झालेल्या कुणालाही सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, “अशोक खरातचे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार, संपत्ती आणि महिलांवर झालेल्या गैरवर्तनाची खोलवर चौकशी करून त्याला कठोर शिक्षा दिली जाईल. याबाबत महाराष्ट्रात सर्वांचं एकमत आहे. आमच्यासाठी ही कारवाई राजकारणाच्या पलिकडे आहे. काही लोक राजकारण करत आहेत, परंतु सरकार आवश्यक ती कारवाई करेल.” मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले आहेत. रोज नवीन माहिती…

Read More

काटेरी झुडपात सोडलेल्या बाळाची दुर्दैवी मृत्यू, अज्ञातावर गुन्हा साईमत /मुक्ताईनगर  / प्रतिनिधी माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कोंन्हाळा परिसरात उघडकीस आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने आपल्या पापाची झाक किंवा अन्य कारणास्तव एका नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला शेतातील काटेरी झुडपात सोडून दिले. उघड्यावर सोडल्यामुळे झालेल्या दुखापतींमुळे हा लहानसा जीव दुर्दैवी मृत्यूमुखी गेला. या घटनेनंतर परिसरात संतप्तता आणि खळबळ निर्माण झाली आहे. माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील कोंन्हाळा गावच्या शिवारातील वामन अमृत धाडे यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या काटेरी झुडपात ४ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२ वाजता एक नवजात स्त्री अर्भक मृतावस्थेत आढळले. ही घटना लक्षात येताच शेजारील रहिवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली.…

Read More

‘ॐ’ गोंदलेले मनगट ठरतेय ओळखीचा धागा; अनोळखी मृतदेहाचा तपास सुरू साईमत /भुसावळ / प्रतिनिधी भुसावळ शहरातील नवोदय विद्यालयाच्या पाठीमागील परिसरात असलेल्या श्री. झोपे यांच्या विहिरीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि. ४) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून, भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवोदय विद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत एक मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढण्याची कार्यवाही केली. मृत इसमाचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षांच्या…

Read More

नवीन नियम लागू; नोंदणी, हमीपत्र आणि तपासणी अनिवार्य, नियंत्रण कक्षही सुरू साईमत / मुंबईएलपीजीच्या वाढत्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आणत अधिक कडक नियम लागू केले आहेत. यानुसार, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरकर्त्यांना पीएनजी (पाईपद्वारे नैसर्गिक वायू) कडे वळण्यासाठी ठोस पावले उचलल्याशिवाय एलपीजीचा पुरवठा मिळणार नाही. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील कोणत्याही वितरण सुविधेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना आता पीएनजी जोडणीसाठी अर्ज करणे किंवा त्यांच्या परिसरात सेवा उपलब्ध झाल्यानंतर पीएनजीकडे वळण्याबाबत लेखी हमी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन नियमांनुसार, व्यावसायिक व औद्योगिक वापरकर्त्यांनी संबंधित तेल विपणन कंपन्यांकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ज्या भागांत पीएनजी सुविधा…

Read More