साईमत / जळगांव महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत पडताळणी प्रक्रियेनंतर तब्बल ६८ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला या योजनेसाठी सुमारे २ कोटी ४३ लाख महिलांनी नोंदणी केली होती. पात्र लाभार्थींना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक सुमारे ४३,७४० कोटी रुपयांचा भार येत होता. आर्थिक ताण लक्षात घेऊन महिला व बालकल्याण विभागाने लाभार्थ्यांची पडताळणी मोहीम राबवली. या तपासणीत काही शासकीय कर्मचारी तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील महिलांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले. सरकारने यानंतर सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी सक्तीचे केले. ३१ मार्च २०२६ पर्यंत दिलेल्या मुदतीत १…
Author: saimat
८३४ कोटीचा निधी पूर्णपणे वापरून जळगाव जिल्ह्याचा विकास उत्कर्षावर साईमत /जळगाव / प्रतिनिधी: जिल्हा वार्षिक योजना (DPDC) निधीच्या काटेकोर नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्ह्याने पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ८३४ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च करून जिल्ह्याने सलग चौथ्या वर्षी हा विक्रम राखला आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती (SCP) आणि आदिवासी घटक (TSP/OTSP) योजनांमधील निधीचा शंभर टक्के वापर करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार आणि…
कचरा साचल्यामुळे दुर्गंधी; महापौरांनी काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश साईमत /जळगाव / प्रतिनिधी: शहरातील स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या घनकचरा डंपिंग ग्राऊंडवरील समस्यांवर अखेर निर्णायक हालचाल सुरू झाली आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत रखडलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. बैठकीत कचरा डेपोच्या कंपाऊंड वॉल, रॅम्प आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासकीय दिरंगाई आणि तांत्रिक अडचणींमुळे ही कामे दीर्घकाळ रखडली होती. नागरिकांकडून वाढलेल्या तक्रारींमुळे दुर्गंधी आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली गेली. श्री श्री इन्फ्रा या मक्तेदारांनी सांगितले की, सुमारे ८५ हजार चौ.फुट क्षेत्रात ६…
साईमत / जळगाव नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील डिजिटल व्यवहारांच्या सुरक्षेत मोठा बदल करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सर्व डिजिटल पेमेंटसाठी आता टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) अनिवार्य करण्यात आले आहे. या बदलानुसार, केवळ ओटीपीच्या आधारे व्यवहार पूर्ण करणे आता शक्य राहणार नाही. प्रत्येक व्यवहारासाठी किमान दोन वेगवेगळ्या पडताळणी पद्धतींचा वापर करणे आवश्यक असेल. यामध्ये पिन, पासवर्ड किंवा गुप्त पासफ्रेज, ओटीपी किंवा हार्डवेअर टोकन, तसेच फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा आयरीस स्कॅन यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे. हे नियम केवळ देशांतर्गत व्यवहारांपुरते मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय व्यवहारांनाही लागू करण्यात येणार आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय कार्ड पेमेंटसाठी या प्रणालीची पूर्ण अंमलबजावणी ऑक्टोबर…
पीडित महिलेची तातडीने पोलीस ठाण्यात फिर्याद; दोषींविरोधात कारवाई साईमत /जामनेर / प्रतिनिधी शेतीसंबंधी जुना वाद चिघळून एका २७ वर्षीय महिलेवर निर्भयतेने हिंसाचार झाला, तर तिच्या कुटुंबातील सदस्यांनाही बेदम मारहाण सहन करावी लागली. जामनेर तालुक्यातील एका गावात मंगळवारी ३१ मार्च रोजी सकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीप्रमाणे, पीडित महिला आपल्या कुटुंबासह गावात वास्तव्यास असून, तिच्या कुटुंबाचे शेजारी राहणारे दोन सख्खे भावंडे – विकी राजेंद्र ठाकूर आणि सचिन राजेंद्र ठाकूर यांच्याशी काही काळापासून शेतीसंबंधी जुना वाद सुरू होता. मंगळवारी सकाळी साधारण ९ वाजेच्या सुमारास पीडित महिला आपल्या घरासमोर उभी असताना या दोघांनी अचानक वाद…
साईमत / मुंबई मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन शाळकरी मुलांमधील वाद इतका चिघळला की त्यांनी थेट रेल्वे रुळांवर उतरून एकमेकांशी मारामारी सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलीवरून सुरू झालेला हा वाद प्लॅटफॉर्मवरून रुळांपर्यंत पोहोचला. वादाच्या भरात एक मुलगा तोल जाऊन रुळांवर पडला, मात्र त्यानंतरही दोघांनी भांडण थांबवले नाही. उलट, त्यांनी एकमेकांवर हल्ला करत गळा आवळण्याचाही प्रयत्न केला. ही सर्व घटना प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर घडली असून, त्याच वेळी समोरून लोकल ट्रेन येत होती. प्रवासी “ट्रेन येत आहे” असे ओरडून सावध करत होते, पण मुलांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी, काही धाडसी…
“ऊर्जा वाचवा, भविष्य घडवा” विद्यार्थ्यांना मार्गदर्शन साईमत /जळगाव / प्रतिनिधी: वाढत्या वीज वापरामुळे निर्माण होत असलेल्या ऊर्जा तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांमध्ये ऊर्जा बचतीचे महत्त्व रुजवण्यासाठी प्रविण पाटील फाउंडेशनतर्फे जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात प्रविण पाटील यांनी विद्यार्थ्यांना ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व सविस्तरपणे पटवून दिले. प्रविण पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात ऊर्जा ही केवळ सुविधा नसून देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असल्याचे अधोरेखित केले. औद्योगिक विकास, शेती, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्षेत्र ऊर्जा वापरावर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, वाढती लोकसंख्या आणि आधुनिक उपकरणांच्या वापरामुळे वीजेची मागणी झपाट्याने वाढत असून, ऊर्जा बचत करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे…
साईमत / अकोला अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आल्याचा आरोप समोर आला आहे. लॉकअपमध्ये असलेल्या महिला आरोपीकडे तिच्या २७ वर्षीय मुलीला पैशांच्या मोबदल्यात “एका रात्रीसाठी” पाठवण्याची मागणी केल्याचा आरोप ड्युटीवरील सहाय्यक पोलिस निरीक्षक (एएसआय) राजेश जाधव यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायबर गुन्ह्याच्या प्रकरणात अटक झालेली महिला मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास लॉकअपमध्ये होती. यावेळी संबंधित अधिकाऱ्याने तिच्या मुलीचे वय विचारले. “२७ वर्षे आहे,” असे उत्तर मिळाल्यानंतर “दहा हजार रुपये देतो, एका रात्रीसाठी पाठव,” असा कथित अश्लील प्रस्ताव दिल्याचा…
कौटुंबिक वादाचे विचित्र रूप; जादूटोण्याचा प्रयत्न? साईमत / अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका जावयाने आपल्या सासऱ्याच्या घरासमोर कथित जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरातील सर्वजण झोपेत असताना रात्री उशिरा काही संशयास्पद हालचालींचा आवाज आल्याने कुटुंबीय जागे झाले. त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता प्रवेशद्वाराजवळ काही विचित्र वस्तू ठेवण्यात आल्याचे दिसून आले. टाचण्या टोचलेले लिंबू, काळी बाहुली, हळद-कुंकू यांसारखे साहित्य आढळल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. याच वेळी घटनास्थळी एक संशयित व्यक्ती आढळून आली. कुटुंबीयांनी तत्काळ त्याला पकडले असता तो स्वतःचा…
साईमत / जळगाव राज्य सरकारने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाडकी बहीण योजनेनंतर आता महिलांच्या बचत गटांना केंद्रस्थानी ठेवून कृषी क्षेत्रात नवी योजना सुरू करण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा)च्या दुसऱ्या टप्प्यात गावपातळीवर कृषी अवजार बँका स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असून महिला बचत गटांसाठी उत्पन्नाचे नवे साधन निर्माण होणार आहे. पात्र महिला बचत गटांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार असून, हे अनुदान कमाल २४ लाख रुपयांपर्यंत असणार आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी मजुरांची कमतरता…