एकलग्न-बोरगाव खुर्दमध्ये २५ लाखांच्या सभामंडपांचे भूमिपूजन जल्लोषात साईमत /पाळधी, ता.धरणगाव / प्रतिनिधी– हनुमान जयंती हा केवळ धार्मिक सण नाही, तर श्रद्धा, शक्ती आणि सेवाभाव जागवणारा दिवस आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. मारुती मंदिर हे गावकऱ्यांचे प्रमुख श्रद्धास्थान असून त्याचा विकास म्हणजे आपल्या संस्कृतीचा सन्मान होतो, असेही ते म्हणाले. हनुमान जयंतीच्या पावन व उत्साहपूर्ण वातावरणात एकलग्न (१० लाख रुपये) आणि बोरगाव खुर्द (१५ लाख रुपये) येथे आमदार निधीतून मारुती मंदिर परिसरात सभा मंडप बांधकामाचे भूमिपूजन जल्लोषात पार पडले. तसेच, बांभोरी बुद्रुक येथील उजाड मारुती मंदिराच्या सुशोभीकरणासाठी १० लाख तर जळगाव तालुक्यातील खिर्डी येथे सभा मंडपासाठी २० लाख रुपये निधी…
Author: saimat
नागरिकांचा वेळ व प्रवास वाचवण्यासाठी लोकशाही दिनात ऑनलाईन सुविधा सुरू साईमत /जळगाव / प्रतिनिधी– दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन यंदा ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात पार पडणार आहे, अशी माहिती रहिवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली. या दिवसाचे मुख्य उद्देश नागरिकांच्या वैयक्तिक हितसंबंधातील तक्रारींचा त्वरित विचार करणे आणि प्रशासनाकडून तत्काळ मार्गदर्शन मिळवून देणे आहे. रहिवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी जर यापूर्वी तालुका स्तरावर लोकशाही दिनात अर्ज केला असेल आणि एका महिन्याच्या आत उत्तर मिळाले नसेल, तर त्या अर्जासंबंधी तक्रारी घेऊन त्यांनी या लोकशाही दिनी उपस्थित रहावे. यामुळे…
दुचाकीस्वारावर दोन वाहनांची धडक तरूणाचा दुर्दैवी मृत्यू साईमत /जळगाव / प्रतिनिधी जळगाव-भुसावळ महामार्गावरील खेडी गावाजवळ बुधवारी दुपारी झालेल्या दुहेरी अपघातात भालगावच्या समाधान बापू भोई (वय ३२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव मालवाहू रिक्षाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर, मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीनेही त्यांना ठार मारल्याने हा गंभीर अपघात घडला. या घटनेने भालगाव परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताची सविस्तर माहिती मिळालेल्या माहितीनुसार, समाधान भोई हे व्यवसायाने फळविक्रेते होते. १ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजता ते भुसावळकडून जळगावकडे जात होते. समोरून येणाऱ्या एका भरधाव मालवाहू रिक्षाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते रस्त्यावर फेकले गेले आणि त्याच वेळी रिक्षाच्या…
सिंधुदुर्ग हादरला; जीवावर उदार होऊन बचावकार्य, परिसरात हळहळ साईमत / सिंधुदुर्ग करूळ घाट येथे सिमेंटने भरलेला ट्रक खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंट वाहतूक करणारा ट्रक घाटातून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने तो सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात विजापूर येथील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, करूळ परिसरातील सह्याद्री जीवरक्षक टीमच्या मदतीने बचावकार्य हाती घेण्यात आले. अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत मोठ्या प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. या बचावकार्यावेळी…
हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक विधींसह रक्तदान शिबिर लोण्याच्या साडेआठ फूट मूर्तीने वेधले लक्ष साईमत /जळगाव / प्रतिनिधी जळगाव शहरापासून सुमारे १५ ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या अवचित हनुमान या जागृत देवस्थानात हनुमान जयंतीनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता. हनुमान जयंतीच्या निमित्ताने दिवसभर मंदिरात अभिषेक, पूजन, आरती आदी धार्मिक विधी पार पडले. विशेष आकर्षण ठरली ती सुमारे साडेआठ फूट उंचीची लोण्यापासून साकारलेली हनुमानाची भव्य मूर्ती. या अद्वितीय मूर्तीमागे स्थानिक श्रद्धा आणि परंपरेचा वारसा दडलेला आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार, परिसरातील शेतकरी आणि भाविक आपल्या जनावरांकडून भरपूर दूध मिळावे तसेच शेतीत…
साईमत / मुंबई देशभरात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असताना मुंबईतही अशाच एका धक्कादायक घटनेचा पर्दाफाश झाला आहे. ताडदेव परिसरात एका न्यायमूर्तीची तब्बल ९३ हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४६ वर्षीय तक्रारदार हे ताडदेव येथे वास्तव्यास असून लघुवाद न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये बिघाड झाल्याने त्यांनी गुगलवर कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक शोधला. त्यानंतर एका व्यक्तीने स्वतःला मोबाईल कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत त्यांचा विश्वास जिंकला. सदर व्यक्तीने तक्रार नोंदवण्याच्या बहाण्याने कस्टमर सपोर्ट अॅप डाउनलोड करण्यास सांगत एपीके फाईल पाठवली. न्यायमूर्तींनी…
इन्स्टाग्रामवरील ‘भाई’ स्टाइल रील ठरली डोकेदुखी; जळगाव पोलिसांची धडक कारवाई साईमत /जळगाव / प्रतिनिधी सोशल मीडियावर ‘भाईगिरी’चे प्रदर्शन करून प्रसिद्धी मिळवण्याचा मोह एका तरुणाला चांगलाच महागात पडल्याची घटना जळगावमध्ये समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर गुंडशाहीची भाषा वापरत रील पोस्ट करणाऱ्या चेतन सोळंके या तरुणाला जळगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई करत चांगलाच धडा शिकवला. या कारवाईनंतर संबंधित तरुणाचा माफीनामा असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या तरुणांमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी वेगवेगळे ट्रेंड फॉलो करण्याची स्पर्धा लागलेली दिसते. यात काही जण ‘भाईगिरी’, शस्त्रांचे प्रदर्शन किंवा गुंडशाहीचे उदात्तीकरण करणाऱ्या रील्स तयार करताना दिसतात. अशाच प्रकारची एक रील चेतन सोळंके या तरुणाने तयार…
धारदार शस्त्राने वार करून अज्ञात हल्लेखोराचा थरकाप; आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना साईमत / पुणे पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकर वस्ती परिसरात एका वृद्ध महिलेची आणि सहा वर्षांच्या चिमुकलीची अज्ञात व्यक्तीकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवाची आळंदी येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मंगला चंद्रकांत शिंदे (वय ७०) आणि धनश्री केदारे (वय ६) या दोघी घरात झोपलेल्या असताना अज्ञात व्यक्तीने घरात घुसून धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या दोघींचा अतिरक्तस्रावामुळे जागीच मृत्यू झाला. धनश्रीची आजी संगीता केदारे (वय ४७) या नेहमीप्रमाणे…
पहाटेपासून भाविकांची गर्दी, पूजन-अर्चना, भजन-कीर्तनांनी संपूर्ण परिसर झाला भक्तीमय साईमत /जळगाव / प्रतिनिधी हनुमान जयंतीच्या पावन निमित्ताने जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. शहरातील पुरातन पंचमुखी हनुमान मंदिरात यंदा भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध धार्मिक कार्यक्रम, आकर्षक सजावट आणि भाविकांची मोठी उपस्थिती यामुळे मंदिर परिसर दिवसभर गजबजलेला होता. पहाटे पाच वाजताच मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आणि त्याच क्षणापासून दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या. श्रीरामभक्त हनुमानाच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विशेष पूजन, महाआरती आणि गदा पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक विधींमध्ये हजारो भाविकांनी श्रद्धेने सहभाग घेतला. दिवसभर मंदिर परिसरात भजन, कीर्तन आणि मंत्रोच्चारांचा अखंड…
साईमत / जळगांव एप्रिल महिन्याची सुरुवात साधारणतः कडक उन्हाने होत असते. मात्र यंदा चित्र पूर्णपणे वेगळे पाहायला मिळत असून जळगावसह राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपीट यामुळे वातावरणात अचानक बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अनियमित पावसाचे सत्र सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच बदलत्या हवामानामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी चिंता अधिक वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून 3 आणि 4 एप्रिलसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात मुसळधार…