नागरिकांना एकाच छताखाली मिळाल्या १५ पेक्षा अधिक महसुली सेवा साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग तसेच तहसील कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा-१)’ अंतर्गत पिंप्राळा येथे आज, १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. भवानी स्वीट मार्ट शेजारील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. नागरिकांना त्यांच्या दैनंदिन महसुली कामकाजासाठी विविध कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागू नयेत तसेच एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘एक खिडकी योजना’ अंतर्गत तहसीलदार, नायब तहसीलदार,…
Author: saimat
साईमत / जळगांव आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाला तात्पुरता विराम मिळाल्यानंतर त्याचे थेट परिणाम जागतिक तसेच देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहेत. विशेषतः कच्चे तेल आणि सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असून, शुक्रवारी जळगावसह मुंबई, पुणे, दिल्ली आणि चेन्नई या प्रमुख बाजारपेठांमध्ये सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. जळगावच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल एक हजार रुपयांची वाढ झाली असून, सोन्याचा दर एक लाख ५५ हजार १५ रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरातही मोठी उसळी दिसून आली असून, प्रति किलो दरात सुमारे पाच हजार रुपयांची वाढ होऊन तो २ लाख ५२ हजार ३५० रुपयांवर गेला…
पहिल्याच दिवशी सर्व विभागांना भेटी देत कामकाजाचा सखोल आढावा साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शुक्रवार, दि. १० एप्रिल रोजी पदभार स्वीकारताच कामकाजात वेग आणण्याचा स्पष्ट संदेश दिला. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व विभागांना प्रत्यक्ष भेटी देत सखोल आढावा घेतल्याने जिल्हा परिषद प्रशासनात ‘ॲक्शन मोड’ची सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते करिश्मा नायर यांनी पदभार स्वीकारला. यावेळी सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अभियान संचालकपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नायर…
महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानंतर महापालिकेची आक्रमक कारवाई; प्रमुख भागांत कचरा हटवून परिसर चकाचक साईमत जळगाव प्रतिनिधी ‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ हे ब्रीदवाक्य केवळ घोषणांपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्षात उतरवण्याचा ठोस निर्धार जळगाव महानगरपालिकेने केला असून, शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिमेचा धडाका सुरू झाला आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या स्पष्ट आणि कडक निर्देशानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागांत स्वच्छतेची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील विविध भागांतून साचलेला कचरा, अस्वच्छता आणि दुर्गंधी याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत महापौरांनी आरोग्य विभागाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरोग्य विभागाने मेहरूण…
केंद्र व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार, कामगारांसाठी थंडावा, पिण्याचे पाणी आणि विश्रांती क्षेत्रे सुनिश्चित करणे अनिवार्य; ग्रामयात्रा व सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही विशेष खबरदारी. साईमत / जळगांव भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही महिन्यांत तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाचे श्रम व रोजगार मंत्रालय आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) यांनी उष्णतेच्या लाटेपासून कामगार आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. अत्यंत उष्णतेच्या परिस्थितीत बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार, रोजंदारी मजूर तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना उष्माघाताचा धोका जास्त आहे. प्रशासनाने जिल्ह्यातील नियोक्ता, उद्योग, बांधकाम कंपन्या तसेच ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याचे आवाहन…
साईमत / वृत्तसंस्था हल्दिया येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये सध्या चालू असलेल्या टीएमसी सरकारवर जोरदार टीका केली. मोदींनी म्हटले की, “तृणमूल काँग्रेसने फक्त घुसखोरीचं राजकारण केलं आणि तरुणांचा विश्वासघात केला. व्होट बँक खुश व्हावी म्हणून धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्यावर कोर्टानेही निषेध दर्शवला आहे.” मोदींनी टीएमसी सरकारचे ‘लांगुलचालन’ आणि घुसखोरांचा खेळ थांबवण्याची गरज असल्याचा स्पष्ट इशारा दिला. ते म्हणाले, “भाजपाचं सरकार आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला त्याचा हक्क मिळेल; सरकारी नोकऱ्या वेळेनुसार, व्यवहारांमध्ये पारदर्शकता असेल आणि कोणतीही कमिशनखोरी, दलाली राहणार नाही.” पंतप्रधानांनी मत्स्य पालन क्षेत्रावरही लक्ष वेधले. मोदी म्हणाले की, बंगालमध्ये मासे देशातल्या मागणीनुसार तयार…
साईमत / अकोला अकोल्यात गुरुवारी सकाळच्या सुमारास एक भयंकर कौटुंबिक घटना घडली, ज्याने परिसर हादरून सोडला. अनिल निंबोकार या व्यक्तीने आपल्या ८ वर्षीय मुलाला मारहाण करत असताना वृषाली निंबोकारने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, रागाच्या भरात अनिलने हातातील धारदार चाकूने वृषालीच्या पोटात वार केला. घटनास्थळी तातडीने पोहोचलेल्या जखमी वृषालीला रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांच्या तपासणीनंतर तिला मृत घोषित करण्यात आले. घटनेनंतर अनिल निंबोकार स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. सध्या तो अकोला पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेत दोन लहान मुलांचा आईचा जीव गेला आणि वडील पोलीसांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांचे भविष्य अनिश्चित झाले आहे.…
साईमत / बंगळुरू बंगळुरूमध्ये अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये एक तरुण दीर्घकाळ एकाच जागी स्तब्ध उभा असल्याचे दिसते. तो ना पुढे सरकत होता, ना मागे—जणू तो पूर्णपणे भान हरपलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र दिसत होते. या घटनेमुळे पुन्हा एकदा ‘झोम्बी ड्रग’चा मुद्दा चर्चेत आला आहे. यापूर्वीही चंदीगडमधील एका डिलिव्हरी बॉयचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तो तोंडात बीडी धरून काही काळ न हलता उभा असल्याचे दिसले होते. या दोन्ही घटनांमुळे नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा रंगली—हे तरुण ‘झोम्बी ड्रग’च्या प्रभावाखाली आहेत का? झोम्बी ड्रग म्हणजे काय? – ‘झोम्बी ड्रग’ म्हणून ओळखला जाणारा पदार्थ म्हणजे झायलाझिन…
साईमत / नाशिक भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात गुन्हेगारीच्या घटनांवर चर्चा सुरू असताना, नाशिकमधून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि मानसिक छळ होत असल्याचे संतापजनक प्रकार उघड झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत ९ गुन्हे दाखल झाले असून, ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यांची तपशीलवार विभागणी अशी आहे: बलात्कार – १, विनयभंग – ४, विनयभंग व धार्मिक भावना दुखावणे – ३, धार्मिक भावना दुखावणे – १ या प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. तपास सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या…
साईमत / मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा मुंबईने शहरात विशेष मोहिम राबवत विविध ठिकाणी धडक कारवाई केली असून तब्बल 10 आरोपी अटकेसाठी घेण्यात आले आहेत. या कारवाईत 29.292 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 10 कोटी 14 लाख 46 हजार 100 रुपये आहे. पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या कारवाईत 902 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), 20.700 किलो गांजा आणि 7.690 किलो हायड्रोपोनिक गांजा असा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. 1 एप्रिल ते 7 एप्रिल 2026 या कालावधीत वडाळा, अंधेरी, बांद्रा, मालाड, नागपाडा, घाटकोपर, धारावी, माहिम, गोरेगाव यांसारख्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. वडाळा…