Author: saimat

साईमत / मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा मुंबईने शहरात विशेष मोहिम राबवत विविध ठिकाणी धडक कारवाई केली असून तब्बल 10 आरोपी अटकेसाठी घेण्यात आले आहेत. या कारवाईत 29.292 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 10 कोटी 14 लाख 46 हजार 100 रुपये आहे. पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या कारवाईत 902 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), 20.700 किलो गांजा आणि 7.690 किलो हायड्रोपोनिक गांजा असा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. 1 एप्रिल ते 7 एप्रिल 2026 या कालावधीत वडाळा, अंधेरी, बांद्रा, मालाड, नागपाडा, घाटकोपर, धारावी, माहिम, गोरेगाव यांसारख्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. वडाळा…

Read More

साईमत / मुंबई उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने प्रवाशांसाठी भाडेवाढ जाहीर केली आहे. साध्या एसटी बसगाड्यांच्या तिकिटांवर १० टक्के हंगामी वाढ करण्यात आली असून, प्रत्येक तिकिटामागे दोन रुपयांचा स्वच्छता अधिभारही आकारला जाणार आहे. ही नवी दररचना १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू होणार असून, हंगामी भाडेवाढ १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीपुरती मर्यादित असेल. मात्र, स्वच्छता अधिभार कायमस्वरूपी लागू राहणार आहे. उदाहरणार्थ, सध्या मुंबई-पुणे मार्गावर साध्या एसटीसाठी २८१ रुपये भाडे आहे. भाडेवाढीनंतर हे भाडे ३१२ रुपये होईल आणि त्यावर दोन रुपये अधिभार जोडल्यास एकूण ३१४ रुपये मोजावे लागतील. राज्य परिवहन प्राधिकरणाने (एसटीए) सुट्ट्या, यात्रा आणि सणासुदीच्या काळात ३० टक्क्यांपर्यंत…

Read More

साईमत / जळगाव अहमदाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमधील एका प्रवाशाला जेवणात कीडा आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित प्रवाशाने हा अनुभव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर फोटो आणि व्हिडिओसह शेअर करत तीव्र नाराजी व्यक्त केली. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये डाळ-भाताच्या डब्यात झुरळासारखा कीडा दिसून आला. विशेष म्हणजे, त्याच डब्यात अशा दोन घटना घडल्याचेही प्रवाशाने नमूद केले असून, यामुळे इतर प्रवाशांनी जेवण करणे थांबवल्याची माहिती दिली. हे जेवण ‘RK ग्रुप’अंतर्गत येणाऱ्या ‘M/S वृंदावन फूड प्रॉडक्ट्स’ या विक्रेत्याकडून पुरवले गेले होते. प्रवाशाने संबंधित अधिकाऱ्यांना टॅग करत या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि विक्रेत्याच्या युनिटवर छापा टाकण्याची मागणी केली. तसेच, अन्न FSSAI च्या…

Read More

जळगावात भाजपचा वर्धापन दिन उत्साहात; चंद्रकांत भापसे यांचा जाहीर पक्षप्रवेश साईमत /जळगाव / प्रतिनिधी जळगाव शहरात आज भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला. शहरभर तिरंग्यांचे झेंडू, फुलांच्या सजावटी आणि कार्यकर्त्यांच्या उमेदवाटेने वातावरण गजबजले होते. या सुवर्णक्षणी विशेष आकर्षण ठरले, चंद्रकांत भापसे यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला जळगाव शहराचे कार्यसम्राट आमदार राजूमामा भोळे आणि भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दिपकजी सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय, विशालजी त्रिपाठी, कार्यालय मंत्री उदयजी भालेराव, नगरसेवक अजितभाऊ राणे, राहुलभाऊ पाटील, नीलूआबा तायडे, मंडळ अध्यक्ष आनंदभाऊ सपकाळे, राजूभाऊ मराठे, अरुण श्रीखंडे यांसह भाजप महानगराचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजप महानगर जिल्हा…

Read More

राजर्षी शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये आरोग्य जागरूकता कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग साईमत /जळगाव / प्रतिनिधी “आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने आपली दिनचर्या योग्य ठेवली पाहिजे. तसेच वेळेवर लसीकरण करणे गरजेचे आहे. शेवटी आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे,” असे प्रतिपादन जळगाव महापौर दीपमाला काळे यांनी केले. जळगाव शहर महानगरपालिकेच्या दवाखाना विभागाच्या वतीने मंगळवार, ७ एप्रिल रोजी ‘जागतिक आरोग्य दिन’ साजरा करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहरातील नागरिकांबरोबरच विविध पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. व्यासपीठावर उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधु कोल्हे, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे,…

Read More

साईमत / जळगाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. या निर्णयांमुळे माहिती तंत्रज्ञान, नियोजन, ऊर्जा व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून येणार आहेत. नियोजन व माहिती तंत्रज्ञान: महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर आता कंपनी अधिनियम, 2013 अंतर्गत कलम 8 अंतर्गत कंपनी म्हणून स्थापन होणार आहे. या निर्णयामुळे रस्ते माहिती प्रणाली, नगररचना, जलयुक्त शिवार – पाणलोट विकास, डोंगरी विकास योजना, ई-पंचनामा, महा अग्री टेक, कांदळवन अभ्यास, भूजल व्यवस्थापन आणि खाणींचा अभ्यास या सर्व क्षेत्रांना गती मिळणार आहे. यासोबतच महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन सेंटर (महाजिओटेक) कंपनी स्थापन होणार आहे. भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर…

Read More

लग्नाची हळद आटोपलेल्या तरुणाचे दुर्दैवी निधन साईमत /अमळनेर / प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील कळमसरे-शहापूर दरम्यान सुरू असलेल्या पुलकामाच्या खड्ड्यात एका बुलेट मोटारसायकलच्या अपघातात २७ वर्षीय सुनील सीताराम शिंदे याचा मृत्यू झाला. हा अपघात सुनील शिंदेच्या लग्नाची हळद आटोपून घरी परतण्याच्या मार्गावर घडला. घटनास्थळी मिळालेल्या माहितीप्रमाणे, मोटारसायकल पुलाच्या खड्ड्यातील सिमेंट पाईपच्या मधोमध अडकल्यामुळे तो संतुलन गमावून कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांनी ठेकेदारावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा दावा आहे की अपघातानंतरही कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना घेतल्या गेल्या नाहीत, फक्त काही सुरक्षा फलक घालून काम सुरू ठेवले गेले. मारवड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली…

Read More

मुक्ताईनगरमधील ४१३ घरांचा आणि तिसऱ्या टप्प्यातील २२ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला साईमत /मुक्ताईनगर / प्रतिनिधी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुक्ताईनगरच्या पुनर्वसनासाठी तब्बल ३८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून हा परिसरासाठी विकासातील मोठा टप्पा मानला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुक्ताईनगर येथील पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबीत होता. या कामासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले, ज्याला अखेर आता यश आले आहे. या निधीमुळे मुक्ताईनगरमधील ४१३ घरांचा आणि तिसऱ्या टप्प्यातील २२ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आज मुंबई येथे झालेल्या संयुक्त बैठकीत जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन आणि मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील…

Read More

साईमत / वृत्तसंस्था 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर युक्तपणे मोठा हल्ला केला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात गंभीर तणाव निर्माण झाला आहे. हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणला 48 तासांचा अल्टीमेटम दिला असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिक घातक होत आहे. जागतिक स्तरावर युद्ध थांबवण्याची मागणी जोर धरत आहे, तरीही युद्धाची भीषण छाया सध्या स्पष्टपणे दिसत आहे. युद्धामुळे अनेक देश होरपळण्याची शक्यता असून, ऊर्जा क्षेत्रावर मोठा फटका बसण्याची भीती आहे. अमेरिकेच्या इशाऱ्यानुसार इराणमधील ऊर्जा प्रकल्प आणि महत्त्वाच्या ब्रिजवर हल्ले होणार आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले की, मंगळवारी रात्री ८ वाजता हल्ला होईल. भारतीय वेळेनुसार हा हल्ला बुधवारी…

Read More

जिल्ह्यात १,१६८ ग्रामपंचायतींवर पोहोचले राज्य शासनाचे पाऊल साईमत /जळगाव / प्रतिनिधी जिल्ह्यातील ग्रामीण प्रशासनात मोठा बदल घडवून आणत, राज्य शासनाने आठ नवीन ग्रामपंचायतींच्या स्थापनेस मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या आता ११६० वरून ११६८ वर पोहोचली आहे. ग्रामीण भागातील स्वतंत्र ग्रामपंचायतींवर वाढत्या मागणीमुळे आणि १५व्या वित्त आयोगाच्या थेट निधी व अधिकारांच्या वाढीमुळे हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. यापूर्वी किमान १ हजार लोकसंख्येचा निकष होता, परंतु आता तो ७०० पर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच, मूळ गाव आणि तांड्यांमधील ३ किमी अंतराची अट रद्द केल्यामुळे अनेक लहान वस्त्या व तांड्यांना स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.…

Read More