Author: saimat

साईमत /नवी दिल्ली पश्चिम आशियामध्ये युद्धाची स्थिती पेटलेली असतानाच भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या भडकाऊ वक्तव्यांनंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इस्लामाबादला गंभीर इशारा दिला आहे. राजनाथ सिंह म्हणाले, “जर पाकिस्तानाने बंगालकडे नजर टाकली, तर त्याचे किती तुकडे होतील हे फक्त देवच जाणे.” सिंह यांनी पाकिस्तानला ऐतिहासिक विभाजनाचा संदर्भ देत, भविष्यात अशा तणाव वाढवणाऱ्या वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताला धमकी देताना सांगितले होते की, भविष्यात भारताने काही कारवाई केली, तर कोलकात्यात हल्ला करून प्रत्युत्तर दिले जाईल. या वक्तव्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र…

Read More

साईमत / विशाखापट्टणम शहरातील क्रिकेट स्पर्धेत घडलेली हिंसक घटना शहरभर खळबळ उडवून टाकणारी आहे. रन आऊटच्या निर्णयावरून सामन्यात झालेल्या वादातून संतप्त झालेल्या खेळाडूने आणि प्रेक्षकांनी अंपायरवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत अंपायर डोला अजिब बाबू यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा अंपायर बुदुमुरी चिरंजीवी गंभीर जखमी झाला. माहितीप्रमाणे, सामन्यादरम्यान दोन्ही अंपायर परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मैदानातील काही प्रेक्षक आणि खेळाडूंचा राग तणावात बदलला. कांता किशोर नावाच्या २६ वर्षीय प्रेक्षकाने अंपायरांना शिवीगाळ करत वातावरण आणखी चिघळवले. सामन्यानंतर अजित बाबू चिंरंजीवी आणि त्यांचे मित्र परस्पर वादात अडकले. त्या वादात किशोरने अचानक अंपायर बाबूच्या छातीत चाकू खुपसला. या हल्ल्यात अंपायर…

Read More

पाळधी ते तरसोद बायपासवर ट्रकखाली झोकून मृत्यू साईमत /जळगाव / प्रतिनिधी पाळधी ते तरसोद हायवे बायपासवर एका ३० वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत स्वतःला ट्रकखाली झोकून दिल्याने धक्कादायक घटना घडली आहे. मृतक तरुणाचे नाव विशाल राजेंद्र बाविस्कर (रा. लिंगा, ता. नेपानगर, ह.मु. आसोदा) असे आहे. घटनेनुसार, विशाल बाविस्कर हा पाळधी ते तरसोद बायपास रस्त्यावर ट्रॅक्टर घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या टाटा पंच कारशी त्याचा अपघात झाला. या अपघातानंतर, दारूच्या नशेत असलेल्या विशालभोवती नातेवाईक आणि टाटा पंचमधील व्यक्ती जमा झाले होते. सर्वजण त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना, अचानक विशालने समोरून येणाऱ्या ट्रक कंटेनरखाली स्वतःला झोकून दिले. या भीषण घटनेत त्याला गंभीर…

Read More

साईमत / जळगाव जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने काही दिवस उसंत घेतली असून आता वातावरण पुन्हा उष्णतेकडे वळू लागले आहे. मिळालेला गारव्याचा दिलासा कमी होत असून नागरिकांना पुन्हा उन्हाची तीव्रता आणि वाढता उकाडा जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांतील पावसामुळे तापमानात घट झाली होती, त्यामुळे उन्हापासून काहीसा आराम मिळाला होता. मात्र, हा आराम तात्पुरता ठरला असून आकाश स्वच्छ होताच तापमानात पुन्हा वाढ होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ७ ते १० एप्रिलदरम्यान वातावरण प्रामुख्याने कोरडे आणि निरभ्र राहणार आहे. या काळात दिवसाचे तापमान सुरुवातीला सुमारे ३६ अंश सेल्सिअस राहून हळूहळू वाढत ४० अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, रात्रीचे तापमान…

Read More

जेसीबीसमोर आदिवासींचा ठिय्या; महापालिकेला माघार घ्यावी लागली साईमत /जळगाव / प्रतिनिधी शहरालगतच्या मोहाडी शिवारातील एकलव्य नगर परिसरात मंगळवार, ७ एप्रिल रोजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. गेल्या वीस वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांनी अचानक सुरू झालेल्या कारवाईला तीव्र विरोध करत रस्त्यावर उतरल्याने परिसर काही काळ रणांगणात परिवर्तित झाला होता. प्रशासन आणि नागरिकांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे वातावरण चिघळले होते. महापालिकेच्या मालकीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या एकलव्य नगर झोपडपट्टी हटवण्यासाठी प्रशासनाने तीन जेसीबींसह पथक पाठवले होते. मात्र, कारवाईची माहिती मिळताच महिलांसह शेकडो आदिवासी बांधव घटनास्थळी एकत्र जमले. “आम्ही दोन दशकांपासून येथे राहत आहोत, आमच्या डोक्यावर छप्पर आहे तेही हिरावून घेणार…

Read More

साईमत / जळगाव घरापासून दूर शहरात शिक्षण किंवा रोजगारासाठी राहणाऱ्या विद्यार्थ्यां व स्थलांतरित कामगारांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इराण-अमेरिका तणावामुळे इंधन पुरवठ्यावर निर्माण झालेल्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने ५ किलोच्या एलपीजी (LPG) सिलिंडरचा पुरवठा दुप्पट करण्याचे आदेश दिले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थितीमुळे इंधन वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन, शहरांमध्ये राहणाऱ्या कामगारांना गॅसची कमतरता भासू नये यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी गॅस मिळवण्यासाठी होणारी धावपळ तसेच काळाबाजारातील महागडे दर टाळण्यास मदत होणार आहे. ६ एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार, ५ किलो फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलिंडरचा पुरवठा वाढवण्यात येणार…

Read More

साईमत / जळगाव लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी सरकारने महत्त्वाचा दिलासा दिला आहे. ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आता ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांचे केवायसी अपूर्ण किंवा चुकीचे आहे, त्यांना सुधारणा करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. योजनेअंतर्गत यापूर्वी डिसेंबरपर्यंत केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, अनेक महिलांकडून माहिती भरताना चुका झाल्यामुळे त्यांचा लाभ अडकला. त्यामुळे सरकारने या महिलांना अंतिम संधी देत मुदत वाढवली आहे. केवायसीतील त्रुटींमुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले होते. डिसेंबरपासून मिळणारी रक्कम त्यांना मिळाली नव्हती. आता केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या महिलांना चार महिन्यांचे थकित पैसे एकाच वेळी मिळण्याची शक्यता…

Read More

महापौरांचा इशारा; उघड्या विहिरी त्वरित बंद करा, अन्यथा कारवाई साईमत /जळगाव / प्रतिनिधी शहरातील विविध भागांत असलेल्या उघड्या आणि असुरक्षित विहिरींमुळे संभाव्य अपघाताचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला मनोज काळे यांनी कठोर भूमिका घेत प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी मनपा आयुक्तांना लेखी पत्राद्वारे स्पष्ट सूचना दिल्या आहेत. जळगाव शहरात पाणीपुरवठ्यासाठी अनेक सार्वजनिक विहिरींचा वापर केला जात असला, तरी सध्या अनेक विहिरी उघड्या अवस्थेत असून त्यांची कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी गंभीर चिंता महापौरांनी व्यक्त केली आहे. महापौर काळे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, महानगरपालिकेच्या मालकीच्या…

Read More

 जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये मिळवले तिसरे बक्षीस साईमत /जळगाव / प्रतिनिधी जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात नानाश्री फाऊंडेशन संघाने आपल्या अफलातून सांघिक कामगिरीने क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध केले. किरण पाटील युवा मंच सतखेडा संघ विजेतेपदावर उभा राहिला तरीही नानाश्री फाऊंडेशनने आपल्या दमदार कामगिरीने तिसरे बक्षीस जिंकत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमठवला. जळगाव ग्रामीण स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या आयोजनाखाली १ ते ५ एप्रिल दरम्यान शिवतीर्थ मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल २२ संघांनी भाग घेतला. नानाश्री फाऊंडेशन संघाचे नेतृत्व जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे संचालक शांताराम सोनवणे आणि युवासेनेचे स्वप्निल सोनवणे यांनी केले. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नानाश्री फाऊंडेशनने चंद्रावर्षा इंटरप्रायजेस संघाला ९ बळीवर रोखत एकतर्फी विजय मिळवून…

Read More

शेतकऱ्याचे ५० क्विंटल मका नष्ट ५० हजारांचे नुकसान ग्रामस्थांची तातडीने भरपाई मिळावी अशी मागणी साईमत /जामनेर/फत्तेपूर / प्रतिनिधी जळोद्री शिवारात वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या भीषण आगीत एका शेतकऱ्याचे सुमारे २ एकर मका शेत जळून खाक झाले आहे. या घटनेत भारत सुपडू सुरवाडे (वय ५५) यांच्या कुटुंबाचे अंदाजे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे. तालुक्यातील जळोद्री येथील गट क्रमांक १४ मधील शेतात रविवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास मका कापणीचे काम सुरू होते. या वेळी शेतावरून गेलेल्या महावितरणच्या वीज वाहक तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन घर्षण झाले आणि त्यातून निघालेली आगीची ठिणगी सुक्या मका पिकावर…

Read More