जळगाव : सुरेश उज्जैनवाल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच यावेळी मुस्लिम व बहुजन समाज अत्यंत तडफदाररित्या मतदानाला बाहेर पडल्याचे चित्र समोर आले. लोकशाही टिकवणे आणि ‘संविधान बचाव’ या मुद्द्यावर भाजपाविरोधी ही निवडणूक गाजली असली तरी मुस्लिम- अल्पसंख्यांक समाजात पसरलेल्या भीतीवर उत्तर म्हणून त्यांच्या उत्स्फूर्त मतदानाने एकगठ्ठा मतदानाची ताकद दिसून आली.मतदानाच्या आकडेवारीवर विवेचन करत येत्या विधानसभा निवडणुकीत सामाजिक समीकरणाच्या जोरावर जिथे स्वतःच्या समाजाची ‘वोट बँक’ आहे तिथे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या इच्छुकांची चर्चा व मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. ——————————————————————————————————- लोकसभेत गायब असलेल्या कथित पुढाऱ्यांना सुद्धा आमदारकीचे वेध जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपा विरुद्ध उबाठा उमेदवारांमध्ये प्रचारात दिसलेल्या अत्यंत चूरशीच्या…
Author: saimat
भुसावळ : येथील जळगाव नाक्यावरील मरीमाता मंदिरासमोर काही अज्ञात हल्लेखोरांनी दोन जणांवर गोळीबार केल्याची घटना बुधवारी २९ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे भुसावळ शहर हादरले असून शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे घटनास्थळी शहर पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, खूनी हल्ला चढविण्याचा अगोदर भारत नगर परिसरात झाला गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला. यामुळे हल्लेखोरांचा तपास करण्याचे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. या हल्ल्यात माजी नगरसेवक तथा मेहतर समाजाचे नेते संतोष बारसे आणि त्यांचा मित्र सामाजिक कार्यकर्ते दिनेश राखुंडे या दोघांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. हे दोघे त्यांच्या चारचाकी वाहनाने (क्र.एम.एच. १९,…
डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते. त्या पाठोपाठ आदित्य ठाकरे यांच्या नावाची देखील चर्चा झाली. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाच्या बहुतांश महत्वाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी साथ दिली आहे. ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित ‘आविष्कार-२०२४’ च्या अंतीम फेरीसाठी विविध संंवर्गातील एकूण १८० प्रकल्पांचे परिक्षकांसमोर सादरीकरण करण्यात आले आहे. ‘आविष्कार-२०२४’ संशोधन आंतरविद्यापीठ राज्यसतरीय संशोधन महोत्सवामध्ये १. मानव्यविद्या, भाषा व ललीतकला, २. वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, ३.विज्ञान, ४. शेती आणि पशुसंवर्धन, ५. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, ६. वैद्यक व औषध निर्माणशास्त्र या सहा संवर्गातील प्रत्येकी दहा प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणासाठी प्रत्येक संवर्गातील पदवीपूर्व (युजी), पदव्युत्तर (पीजी), निष्णात (पोस्ट पीजी, एम.फिल. /पीएच.डी.) अश्या तीन स्तरावर विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संवर्गातील प्रत्येकी दहा याप्रमाणे तीन स्तरातील एकूण १८० सहभागी स्पर्धकांनी संबंधित विषयातील तज्ज्ञ परिक्षकांसमोर प्रकल्पांचे प्रभावीरित्या सादरीकरण केले. आविष्कार-२०२४…
पिंपरी- चिंचवड : पैसे कसे ढापायचे हे शरद पवार कुटुंब जगाला शिकवू शकते. कोविड काळात त्यांचा वसुलीचा धंदा सुरू होता. पवार कुटुंबातील प्रतापराव पवार यांच्या ‘न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा बारा वर्षांत एका दमडीचाही व्यवसाय झालेला नाही.अचानक मार्च २०२१ मध्ये ‘सिरम इन्स्टिट्यूट’च्या बंँक खात्यातून ४३५ कोटी शरद पवार परिवारातील प्रतापराव पवार यांच्या या कंपनीत आले आहेत. हे सिरम कडून आलेले कमिशन तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित करत दिल्लीला जाऊन याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे भाजपाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, पैसे कसे ढापायचे…
हिंगोली : जिल्ह्यातील डिग्रस वाणी शिवारात झालेल्या अपघातातील तीन जणांच्या मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. सख्ख्या मुलानेच आई, वडील आणि भावाचा खून केला असल्याने या घटनेला नवीन वाचा फुटली आहे. मृत आई-वडील आणि भाऊ हे सतत बदनामी करत आहेत, हा राग मनात धरून त्याने तिघांचा खून केला असल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले. बासंबा पोलिसांनी आरोपी मुलगा महेंद्र जाधव याला अटक केली आहे. डिग्रसवाणी शिवारात गुरुवारी (११ जानेवारी) सकाळी आई-वडील आणि मुलगा अशा तिघांचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये आढळून आला होता. कुंडलिक श्रीपती जाधव (६५), कलावती कुंडलिक…
लातूर : लातूरमध्ये एका शेतकऱ्याला लिफ्ट घेणे जीवावर बेतलं आहे. भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने एकजण ठार व तीन जखमी झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील लामजना पाटी जवळील पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. लातूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याला लिफ्ट घेणे जीवावर बेतले आहे. शेताकडून घरी परतण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट घेऊन निघालेल्या तरुणाचे अपघाती निधन झाले आहे. निलंगा – औसा रोडवरील लामजना पाटीजवळ हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीला पाठीमागून कारने जोरदार धडक दिली. त्या धडकेत दुचाकी ४० ते ५० फुट लांब फरपटत गेली.…
भागलपूर : एखाद्याचा द्व्ेष कुठल्या थराला जाऊ शकतो याचे एक अत्यंत भयंकर उदाहरण भागलपूरमध्ये पाहायला मिळाले. जिथे मुलीने प्रेमविवाह केल्याने तिच्या घरच्यांनी दिड वर्षांच्या चिमुकलीसह जोडप्याला संपवले. ही घटना नवगचिया पोलिसांच्या हद्दीतील गोपालपूरच्या नवतोलिया गावातील आहे. नवतोलिया येथील रहिवासी चंदन कुमार (४०), त्यांची पत्नी चांदनी कुमारी उर्फ चंदा कुमारी आणि त्यांची दीड वर्षांची मुलगी रोशनी कुमारी यांची हत्या करण्यात आली आहे. या तिघांची हत्या दुसरं कोणी नाही तर त्यांच्याच नातेवाईकांनी केली. प्रेमविवाह केल्याच्या रागातून पिता-पुत्राने मिळून ही हत्या केल्याची माहिती आहे. चंदा कुमारीचे वडील प्रमोद सिंग उर्फ पप्पू सिंग आणि त्यांचा मुलगा धीरज सिंग यांनी या तिघांचा अत्यंत निर्दयीपणे खून…
ठाणे : ज्या इंग्रजांनी आपल्यावर २०० वर्षे राज्य केले. त्या इंग्रजांना रामभक्तांमुळे मागे टाकून भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. येत्या पाच वर्षांत ही अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येईल. त्यावेळी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान असतील, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. ठाण्यातील सरस्वती विद्यालयाच्या प्रागंणात ३८ वी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला मंगळवारपासून सुरू झाली आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. यावेळी ते बोलत होते. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘ श्रीराम पूजा ते राष्ट्र पूजा ‘ या विषयावर व्याखान दिले. २०१४ मध्ये भारत दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती परंतु ज्या…
मुंबई ः निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेतील फुटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला असला तरी विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन होणार असल्याने शिंदे यांच्यासमोरील आव्हान अद्यापही कायम आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ेोकर यांनी शिंदे यांच्यासह सर्वच आमदारांना पात्र ठरविले तसेच निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निर्वाळा दिला.निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालांमुळे मुख्यमंत्री शिंदे यांना बळ मिळाले आहे. शिवसेना शिंदे यांचीच या निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्वाळ्यामुळे भाजपही अधिक आनंदी आहे. कारण उद्धव ठाकरे यांचे खच्चीकरण करून शिवसेनेची सूत्रे शिंदे यांच्याकडे आहेत हे बिंबविण्याचा सातत्याने प्रयत्न भाजपकडून होत आहे.…