Author: saimat

 चोरांच्या हालचालींवर पोलिसांची नजर, ४ लाख ३० हजारांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत ,तीन आरोपी अटकेत, चोरीच्या ११ दुचाकी जप्त साईमत /जळगाव /प्रतिनिधी शहरातील दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हापेठ पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी वेगवान तपास, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे दुचाकी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ११ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शहरातील विविध भागांमधून मोटारसायकली चोरीला जाण्याच्या घटना वाढत असल्याने पोलीस प्रशासनाने या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेतली होती. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शहरातील…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – बह्राइच : उत्तर प्रदेशातील बह्राइच जिल्ह्यात घाघरा (सरयू) नदीकाठी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. हात-पाय धुण्यासाठी नदीच्या काठावर गेलेल्या 12 वर्षीय मुलावर मगरीने अचानक हल्ला करून त्याला खोल पाण्यात खेचून नेले. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी बौंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरौवा गावाजवळ घडली. सुनील सिंह हा आपल्या काकांसोबत शेतातील लागवडीचे काम करण्यासाठी गेला होता. काम संपल्यानंतर दोघेही घाघरा नदीच्या काठावर हात-पाय धुत असताना नदीतून अचानक एक मगर बाहेर आली आणि तिने सुनीलवर झडप घातली. क्षणाचाही विलंब…

Read More

‘ॲनिमल बर्थ कंट्रोल’ केंद्राची मागणी नगरसेविका यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन साईमत /यावल  /प्रतिनिधी यावल शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर समस्या बनत असून या प्रश्नावर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नगरपरिषद सदस्या कल्पना वाणी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देत शहरात तातडीने ‘ॲनिमल बर्थ कंट्रोल (एबीसी) सेंटर’ सुरू करण्याची मागणी केली आहे. मुख्याधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. रस्त्यांवर कुत्र्यांचे कळप मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांना दैनंदिन हालचाली करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – बहारामपूर : पश्चिम बंगालमधील बहारामपूर येथे शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या व्हॅनला पॅसेंजर रेल्वेने जोरदार धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून आठ जण किरकोळ जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास बहारामपूर परिसरातील कर्णसुबर्णा रेल्वे फाटकाजवळ घडली. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन रेल्वे रुळ ओलांडत असताना निमटिता–कटवा पॅसेंजर ट्रेनने तिला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की व्हॅनचा अक्षरशः चुराडा झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी कर्णसुबर्णा रेल्वे फाटक खुले होते. त्यामुळे…

Read More

खेळता-खेळता काळाचा घाला सात वर्षीय अविनाशच्या मृत्यूने सावखेडा हादरले साईमत /भुसावळ /प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील सावखेडा गावात शुक्रवारी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला. सुकी नदीपात्रातील खोल पाण्याच्या खड्ड्यात पडून सात वर्षीय अविनाश राजू जवरे याचा मृत्यू झाला. खेळण्याच्या वयातच काळाने घाला घातल्याने जवरे कुटुंबासह गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे नदीपात्रातील वाळू उपशानंतर निर्माण झालेल्या धोकादायक खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अविनाश हा सावखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दुसरीत शिकत होता. सायंकाळच्या सुमारास तो नदीकाठ परिसरात खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्याचा तोल गेला आणि तो थेट पाण्यात पडला.…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – पुणे : शहरातील डायस प्लॉट परिसरात एका कंत्राटदाराचा राहत्या घरी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा मृत्यू आत्महत्येचा असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, आर्थिक व्यवहारांशी संबंधित वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. मात्र, मृत्यूमागील नेमके कारण पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मृत व्यक्तीची ओळख खलील शेख अशी झाली आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. तसेच काही व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यामध्ये काही व्यक्तींविरोधात आरोप केल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओंची आणि इतर पुराव्यांची पोलिसांकडून पडताळणी सुरू असून, त्यातील आरोपांची सत्यता तपासली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण व पर्यावरण विषयांवरील अभ्यासक सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण आज 18 व्या दिवशीही सुरू असून, प्रकृती खालावत असतानाही त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओद्वारे त्यांनी देशभरातील नागरिकांना 20 जुलै रोजी संसदेकडे निघणाऱ्या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. व्हिडिओ संदेशात वांगचुक म्हणाले, “माझी प्रकृती पूर्णपणे ठीक नसली तरी मी ठाम आहे. मला उपोषण सोडण्याची विनंती करण्यापेक्षा 20 जुलैच्या संसद मोर्चात सहभागी होऊन आंदोलनाला बळ द्या.” दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात वांगचुक सहभागी झाले…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – जळगाव : जळगाव सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण नोंदवली गेली आहे. बाजार सुरू होताच १ तोळा सोन्याच्या किमतीत ३०० रुपयांची घट झाली, तर चांदीचे दर सलग चौथ्या दिवशी स्थिर राहिले. सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असून खरेदीसाठी बाजारात चांगली गर्दी दिसून आली. मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उताराचा परिणाम स्थानिक सराफा बाजारावरही होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याच्या दरात तब्बल १,००० रुपयांची, तर चांदीच्या दरात २,००० रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर दोन दिवस दरात किरकोळ बदल होत असतानाच आज पुन्हा सोन्याचे भाव किंचित कमी झाले. बुधवारी विनाजीएसटी १ तोळा सोन्याचा…

Read More

कुऱ्हा गावाजवळ काळाचा घाला कारच्या धडकेत २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू साईमत /भुसावळ /प्रतिनिधी तालुक्यातील कुऱ्हा गावाजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात वरणगाव येथील २८ वर्षीय रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे वरणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, दि. १४ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कुऱ्हा गावाजवळील पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. खेडी बुद्रुक (ता. जळगाव) येथील मनिष आदिनाथ संघवे (वय ४३) हा महिंद्रा कंपनीची कार…

Read More

रस्ता दुरुस्तीसाठी नगरसेविकेचा इशारा; मागणी न मानल्यास १५ ऑगस्टला उपोषण साईमत /मुक्ताईनगर /प्रतिनिधी मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रवेशद्वार ते हनुमान मंदिर मार्गे तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नगरसेविका अनुसयाबाई सुपडा चिंचोले यांनी केली आहे. यासंदर्भात नगरसेविका चिंचोले यांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. हा मार्ग शहरातील अत्यंत महत्त्वाचा असून तहसील कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती तसेच विविध शासकीय…

Read More