डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली साईमत /जामनेर /प्रतिनिधी वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडविण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका होतकरू विद्यार्थ्याचा अखेर दुर्दैवी अंत झाला. नीट परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून जामनेर तालुक्यातील नागनचौकी येथील २० वर्षीय समर्थ ज्ञानेश्वर पाटील याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समर्थ पाटील हा अभ्यासू आणि मेहनती विद्यार्थी म्हणून परिचित होता. डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो नीट परीक्षेची तयारी करत होता. पहिल्या प्रयत्नात अपेक्षित गुण मिळाले नसतानाही त्याने खचून न जाता पुन्हा…
Author: saimat
साईमत न्यूज नेटवर्क – देशात कोविड-१९चा संसर्ग पुन्हा वाढताना दिसत असून काही राज्यांमध्ये नव्या रुग्णांची नोंद होत आहे. आंध्र प्रदेशात गेल्या काही आठवड्यांत कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर महाराष्ट्रातही यंदा कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सध्या बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळत असल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात यंदा ४८ रुग्णांची नोंद राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २०२६ या वर्षात आतापर्यंत महाराष्ट्रात कोविड-१९चे एकूण ४८ रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या काळात कोविडमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जानेवारीमध्ये ३, फेब्रुवारीमध्ये १, जूनमध्ये ११ आणि जुलै महिन्यात आतापर्यंत…
साईमत न्यूज नेटवर्क – आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील एका धक्कादायक हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. देवदर्शनासाठी जात असल्याचा बहाणा करून एका १९ वर्षीय महिलेने आपल्या प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पत्नी, तिचा प्रियकर आणि अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मृत तरुणाचे नाव रमेश असून तो तामिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यातील सुलगिरी परिसरातील रहिवासी होता. दोन वर्षांपूर्वी त्याचा विवाह शांतीपुरम येथील हसिनी हिच्याशी झाला होता. दाम्पत्याला एक लहान मुलगी असून रमेश होसूर येथील खासगी कंपनीत नोकरी करत होता. प्राथमिक तपासात हसिनीचे तिच्या बालपणीच्या मित्र युगांधरसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर…
साईमत न्यूज नेटवर्क – केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जाहीर पाठिंबा दिला आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी जंतर-मंतर येथे भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेवर अमित ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या व्यक्तीशी अशा प्रकारची वागणूक देणे अयोग्य असल्याचे म्हटले. अमित ठाकरे हे सोनम वांगचुक यांची भेट घेण्यासाठी आंदोलनस्थळी पोहोचले होते. मात्र, प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत दिल्ली पोलिसांनी सकाळीच त्यांना रुग्णालयात…
पांढरी शिवारातील अवैध हातभट्टी उद्ध्वस्त दीड लाखांचा मुद्देमाल जप्त साईमत /अडावद /प्रतिनिधी अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीविरोधात अडावद पोलिसांनी धडक कारवाई करत पांढरी शिवारातील नाल्यालगत सुरू असलेला हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पंचांसमक्ष तो जागेवरच नष्ट करण्यात आला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांना पांढरी शिवारातील नाल्याच्या काठी अवैध गावठी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाड टाकली.…
मित्रावर संशय; घटनास्थळावरून चाकू जप्त, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची नाकाबंदी साईमत /नाशिक /प्रतिनिधी नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने नाशिकसह जळगाव जिल्हाही हादरला आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी असलेल्या २० वर्षीय तरुणीची भररस्त्यात चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. वैष्णवी अनिल आवारे (वय २०, रा. अमळनेर, जि. जळगाव) असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणात तिच्या परिचयातील एका तरुणावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैष्णवी आवारे ही शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने नाशिकमध्ये पेइंग गेस्ट (पीजी) म्हणून वास्तव्यास होती. शुक्रवारी…
पहाटेच्या सापळ्यात गुटखा तस्कर जाळ्यात; आर्टिका कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा साईमत /मुक्ताईनगर /प्रतिनिधी मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या हद्दीत चोरट्या मार्गाने आणला जात असलेला प्रतिबंधित गुटख्याचा साठा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटेच्या कारवाईत उघडकीस आणला. मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी गुटख्यासह चारचाकी वाहन व मोबाईल असा एकूण १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्री व वाहतूक करण्यास बंदी असतानाही परराज्यातून मोठ्या प्रमाणावर हा प्रतिबंधित माल आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. त्याच पार्श्वभूमीवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या…
नागरिकांच्या त्रासाची दखल महामार्गावरील जलकोंडी हटवण्यासाठी गटारीचे काम सुरू साईमत /जळगाव /प्रतिनिधी शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर आता कायमस्वरूपी उपाययोजना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अग्रवाल हॉस्पिटल चौफुली परिसरात दरवर्षी पावसाचे पाणी साचून वाहतूक विस्कळीत होत होती. या त्रासातून नागरिक आणि वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अखेर निचरा व्यवस्थेचे काम हाती घेतले असून, गटार बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या भागात पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते. परिणामी वाहन चालवताना अडथळे निर्माण होत होते, तर पादचाऱ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या…
परंपरा आणि भक्तीचा संगम; ‘जय मुक्ताई माऊली’च्या जयघोषात वारीचा पंढरपूरकडे प्रवास सुरू साईमत /मुक्ताईनगर /प्रतिनिधी आषाढी वारीच्या भक्तिमय प्रवासात संत मुक्ताई पालखी सोहळ्याने धाराशिव जिल्ह्यातील भूम नगरीत प्रवेश करताच एक वेगळे आणि आकर्षक दृश्य अनुभवायला मिळाले. संत मुक्ताई माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेंढ्यांच्या गोल रिंगणाने उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले. वारकरी परंपरेतील या अनोख्या सोहळ्याने भूम येथील वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळ्याचा प्रवास आता अंतिम टप्प्याकडे जात असून, शुक्रवारी या वारीचा २४ वा दिवस होता. दुपारच्या वेळी पालखीचे भूम येथे आगमन झाले. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेतले.…
साईमत न्यूज नेटवर्क – छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरहून इचलकरंजीकडे निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि मागून येणाऱ्या कारचालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्व ३८ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बस पूर्णपणे जळून खाक झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता पांढरी पिंपळगाव परिसरात घडली. इचलकरंजी आगाराची (एमएच ०९ एफएल ८१३४) बस सकाळी ७.३० वाजता संभाजीनगरहून इचलकरंजीकडे रवाना झाली होती. प्रवासादरम्यान बसच्या मागील भागातून धूर निघत असल्याचे मागून येणाऱ्या एका कारचालकाच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने बसचालकाला याची माहिती दिली. धोका ओळखत चालकाने बस तात्काळ…