Author: saimat

२२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत साईमत/रावेर/प्रतिनिधी : रावेर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी एका गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्तुलसह दोन मॅगझिन २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी त्यांच्या कॅबीनमध्ये पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील, पो.हे.कॉ.विष्णु बिऱ्हाळे, विनोद पाटील, ईश्वर देशमुख, राहुल महाजन, रवींद्र पंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे यांना बोलावून कळविले. मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाल दुरक्षेत्र अंतर्गत कुसुंबा ते लालमाती रस्त्यावरील जल्लार शहाबाबाच्या दर्ग्याजवळ समोर एक जण गावठी देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याठिकाणी…

Read More

संशयित आरोपीला अटक, हल्ल्यात एक किरकोळ जखमी साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : येथून जवळच असलेल्या साकेगाव येथे एका तरुणाने चाकूने भोसकून महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे. यावेळी एक जण किरकोळ जख्मी झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे . सविस्तर असे की, सोनाली महेंद्र कोळी हिला २५ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सागर रमेश कोळी हा जोरजोरात शिविगाळ व आरोळ्या मारत सोनाली कोळीच्या पाठीवर व पोटाच्या बाजूला चाकुने वार करीत होता. यावेळी विनोद सुभाष कुंभार (रा . साकेगाव) हा वाचविण्यासाठी गेला होता. ‘तू आमच्यामध्ये पडू नको’ असे म्हणत सागरने विनोद कुंभारच्या उजव्या हाताच्या…

Read More

सेवानगर येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जल्लोषात प्रवेश साईमत/चाळीसगाव /प्रतिनिधी : तालुक्यातील बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार आणि खासदार असताना सतत प्रयत्नशिल होतो. आजही समाजातील प्रत्येक व्यक्तींशी संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्पर आहे. समाजाने विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी माझी धडपड सुरू आहे.समाजाने मला दिलेले प्रेम आशिर्वाद याचे भान सदैव राहील, अशी भावना शिवसेना नेते माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. सेवानगर, ता. चाळीसगाव येथे भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. सुरुवातीला संत सेवालाल महाराज, श्री संत बाळूमामा व हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते…

Read More

महाविद्यालयाचा परिसर स्वच्छता घोषणांनी दणाणला साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : येथील बी.पी.आर्ट्स,एस.एम.ए.सायन्स,के.के.सी.कॉमर्स कॉलेज तसेच चाळीसगाव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त ‘स्वच्छता हीच सेवा’ हा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छता साखळी तयार केली. उपप्राचार्य प्रा. डी.एल.वसईकर यांनी स्वच्छतेची शपथ सर्व उपस्थितांना दिली. संपूर्ण महाविद्यालय परिसर स्वच्छता घोषणांनी दणाणून गेले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. व्ही.बिल्दिकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत राष्ट्रीय सेवा योजना दिवस आणि स्वच्छतेचे महत्त्व विषद केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.ए. व्ही.काटे, उपप्राचार्य डॉ.खापर्डे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. आर. बोरसे, एनसीसी विभाग प्रमुख डॉ.चंदनशिव, विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा.प्रभाकर पगार तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर…

Read More

विद्यालयाच्यावतीने मान्यवरांचा सत्कार साईमत/भडगाव/प्रतिनिधी : येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित आमडदे येथील सौ.साधनाताई प्रतापराव पाटील प्राथमिक माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, शाळेत संस्थेचे संस्थापक कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या २३व्या पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव हरी पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका डॉ. पूनम पाटील, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी मानद सचिव तथा कै. दीनानाथ दूध उत्पादक सोसायटी आमडदे येथील चेअरमन जगदीश पाटील, पाचोरा येथील व्याख्याते रवी पाटील, स्थानिक स्कूल कमिटीचे…

Read More

बेघर अतिक्रमण संघर्ष समितीच्या संघर्षाला मिळाले यश साईमत/धरणगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्हा नियोजन भवनात नामदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सचिव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि विविध विभागातील अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत धरणगाव शहरातील नेहरूनगर, रामदेवजी बाबानगर, हमाल वाडा, गौतम नगर, संजय नगर, दादाजी नगर, हनुमान नगर, चोपडा रोड, पारोळा नाका लगतच्या परिसर भागातील तसेच विविध भागात राहणाऱ्या अतिक्रमणधारकांना आपले हक्काचे घर मिळणार आहे. यासाठी गेल्या एक वर्षापासून बेघर अतिक्रमण संघर्ष समितीने लढा सुरू केला होता. त्या लढ्याला आज यश प्राप्त झालेले आहे. संघर्ष समितीला शहरातील अतिक्रमण धारकांसाठी त्यांनी धरणगाव शहरात पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे.…

Read More

दीपनगरच्या सीएसआर निधीसाठी वरणगावकरांचेही आंदोलन, दोन कोटी रुपयांची मागणी साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राखेच्या प्रदूषणामुळे भुसावळ व रावेर तालुक्यातील किमान १९ गावे बाधीत झाली असुन याचा परिसरातील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. मात्र, अशा बाधीत गावांना दिपनगरच्या माध्यमातून दिला जाणाऱ्या सीएसआर निधीत दुजाभाव होत असल्याच्या कारणावरून परिसरातील त्रस्त ग्रामस्थांनी दिपनगरच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले . तर या आंदोलनाला आ . एकनाथराव खडसे यांनी पाठींबा दर्शवित अधिकाऱ्यांना तुम्ही निविदा कुणाच्या सांगण्यावरून रद्द केली असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे आ. संजय सावकारे व आ. एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच सीएसआरचा निधी वरणगावलाही मिळावा,…

Read More

शेतकरी भूमिपुत्र, नागरिकांच्या कल्याणासाठी शेळगाव बॅरेजचे प्रथमच जलपूजन : डॉ.कुंदन फेगडे साईमत/यावल/प्रतिनिधी : तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत जळगाव, भुसावळ, यावल, चोपडा, तालुक्यातील शेतकरी भूमिपुत्र तसेच नागरिकांच्या कल्याणासाठी असलेल्या शेळगाव बॅरेजचे शेतकऱ्यांसह बुधवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जलपूजन केले. बॅरेजमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला. या कल्याणकारी, अमृतमय जलसाठ्याचे सर्वात प्रथम शास्त्रोक्त पद्धतीने पूजन रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत समाजसेवक डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांनी केले. यावल, रावेर, चोपड्यास फायदा शेळगाव बॅरेज सिंचन योजनेंतर्गत यावल व चोपडा तालुक्यातील साकळी, नावरे, विरावली, मेहेलखेडी, कोरपावली, दहिगाव, वाघोदा, चुंचाळे, गिरडगाव, वढोदे, दगडी, बोराडे, शिरसाठ यातील चार हजार ६९९.१३…

Read More

मुक्ताईनगर मतदार संघाचे आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्याकडे मुक्ताईनगर मतदार संघातील आपत्ती व्यवस्थापन करिता विविध गावातील प्रस्तावित कामांना मंजुरी मिळावी यासाठी आ.चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने मतदार संघातील ६.९५ कोटी रुपयांच्या आपत्ती सौम्यीकरण कामांना, महाराष्ट्र शासन ,महसूल व वन ,(आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) शासन निर्णय २३ सप्टेंबर २०२४ अन्वये प्रशासकीय मान्यता मिळाली असून गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पूर प्रतिबंधक कामांना गती मिळणार आहे, अशी माहिती आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली. मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील गेल्या अनेक वर्षांपासून २५० च्या वरील घरांना पावसाळ्यात अचानक उद्भवलेल्या आपत्तीतून प्रभाव…

Read More

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांचा पत्रकार परिषदेत आरोप साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : जिल्ह्यात २०२३ मध्ये खरीप पिकांसाठी एक रुपयात पिक विमा योजनेतील ३ लाख ८७ हजार पात्र लाभार्थी शेतकरी व हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेतील विम्यास पात्र ५२ हजार केळी उत्पादक शेतकरी महाराष्ट्र शासनाने त्यांच्या हिश्याची रक्कम पिक विमा कंपनीकडे जमा न केल्यामुळे खरीप व केळीचे जवळपास साडेचार लाख शेतकरी पिक विमाच्या लाभांपासून वंचित असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. एक रुपयात पिक विमा ही योजना २०२३ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून फार मोठ्या प्रमाणात गाजावाजा करत राबविण्यात आली. योजनेअंतर्गत जवळपास साडेचार…

Read More