Author: saimat

गेट उघडण्यास नकार दिल्याने कर्मचाऱ्याला मारहाण करून शर्ट फाडला साईमत /जळगाव /प्रतिनिधी रेल्वेच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आलेले गेट तातडीने उघडण्याच्या मागणीवरून म्हसावद येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियमांचे पालन करत गेट न उघडल्याचा राग अनावर झालेल्या एका वाहनचालकाने रेल्वे गेटमनला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी घडली. या प्रकारामुळे रेल्वे गेट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. म्हसावद येथील रेल्वे गेटवर प्रवीण रामलाल महे हे कर्तव्य बजावत असताना हा प्रकार घडला. रेल्वे येण्याच्या वेळेत सुरक्षेच्या कारणास्तव गेट बंद ठेवण्यात आले होते. यावेळी एका वाहनचालकाने गेट उघडण्याची मागणी केली. मात्र, रेल्वे नियमांनुसार गेट उघडणे शक्य नसल्याचे महे…

Read More

चार महिन्यांच्या वादाचा घेतला बदला कटरने हल्ला करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात साईमत /चाळीसगाव /प्रतिनिधी शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक ११ जवळ जुन्या वादाच्या कारणातून एका २६ वर्षीय तरुणावर लोखंडी कटरने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, चाळीसगाव शहर पोलिसांनी तत्परता दाखवत काही तासांतच दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजून ३७ मिनिटांच्या सुमारास चाळीसगाव शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक ११ जवळील रस्त्यावर घडली. या हल्ल्यात पवारवाडी, कलाल गल्ली, स्टेशन रोड येथील प्रतिक शाम…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – रविवारी सकाळी मेटाच्या फेसबुक, फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सेवांमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरातील हजारो वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. विशेषतः फेसबुकच्या डेस्कटॉप आवृत्तीवर लॉग-इन करताना अनेकांना ‘Account Temporarily Unavailable’ असा त्रुटी संदेश दिसू लागला. या संदेशात, “तांत्रिक अडचणीमुळे तुमचे खाते सध्या उपलब्ध नाही. समस्या लवकरच दूर होण्याची अपेक्षा असून काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा,” असे नमूद करण्यात आले आहे. वेबसाइट्सच्या सेवांची स्थिती दर्शवणाऱ्या DownDetector नुसार, रविवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास फेसबुक, फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्रामबाबतच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली. ही समस्या जगभरातील अनेक वापरकर्त्यांना जाणवत असली, तरी सर्वच वापरकर्ते या…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत सफदरजंग रुग्णालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे. गेल्या 21 दिवसांपासून बेमुदत उपोषण करत असलेल्या वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते पूर्णपणे शुद्धीवर आहेत. मात्र, दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली असून काही वैद्यकीय चाचण्यांमध्ये इलेक्ट्रोलाइटची पातळी कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चारू बांबा यांनी सांगितले की, वांगचुक यांचा रक्तदाब, नाडीचा वेग आणि ऑक्सिजनची पातळी सध्या सामान्य आहे. तरीही डिहायड्रेशनमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याने त्यांच्यावर 24 तास वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने उपचार करता यावेत, यासाठी विशेष…

Read More

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणांनी दणाणले शहर साईमत /मलकापूर /प्रतिनिधी लडाखचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या विविध मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी रविवारी मलकापूर शहरात भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. ‘सोनम वांगचूक सपोर्ट समिती’च्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी, वकील, डॉक्टर, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर मोर्चा विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी सहभागी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. ‘केंद्र सरकार मुर्दाबाद’, ‘भाजपा मुर्दाबाद’, ‘भारत…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमजवळ रविवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आनंदपुरम परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 वर भरधाव कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंटूर जिल्ह्यातील नरसारावपेटा येथील पाच जण कारमधून श्रीकाकुलमच्या दिशेने प्रवास करत होते. आनंदपुरमजवळील सत्तरवू जंक्शन परिसरात त्यांच्या कारने पुढे जात असलेल्या ट्रकला वेगात जाऊन मागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या अपघातात कारमधील…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूर आणि भूस्खलनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी रात्रीपासून रविवारीपर्यंत झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका राजौरी आणि पुंछ जिल्ह्यांना बसला असून, विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सततच्या पावसामुळे दरहाली नदीसह खंडली सूक्तोह आणि जमोल नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. दरहाली नदीची पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या सखल भागांत पाणी शिरले. राजौरीतील बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये पाणी घुसल्याने तेथे उभ्या असलेल्या अनेक गाड्या पुराच्या प्रवाहात वाहून गेल्या. याशिवाय अनेक घरांचेही मोठे नुकसान…

Read More

आभाळ भरून येणार जळगाव जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी अपेक्षित, बळीराजाला दिलासा साईमत /जळगाव /प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील खरीप हंगामावर चिंतेचे सावट निर्माण झाले होते. पेरणीनंतर आवश्यक वेळी पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. मात्र आता हवामान विभागाच्या अंदाजामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगाव जिल्ह्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे असून, १९ ते २४ जुलैदरम्यान जिल्ह्यात विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे रखडलेल्या पावसाची प्रतीक्षा आता संपण्याची आशा निर्माण झाली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, १९ जुलैपासून जिल्ह्यात पावसाच्या…

Read More

शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या जतनासाठी सुरू केलेल्या जनआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी  जळगावची साथ साईमत /जळगाव /प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या जतनासाठी सुरू केलेल्या जनआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगावात सोमवारी (दि. २०) शांततापूर्ण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगावकर जागृत नागरिकांच्या पुढाकारातून दुपारी १२ वाजता शिवतीर्थ (छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर) येथे हे आंदोलन होणार असून, सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. देशाच्या विविध भागांतून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मिळणाऱ्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील नागरिकही लोकशाही पद्धतीने आपला पाठिंबा व्यक्त करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांकडे शासनाने संवेदनशीलतेने पाहावे, पर्यावरण…

Read More

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांना पडल महागात जळगाव जिल्ह्यात १०७ जणांवर कारवाई साईमत /जळगाव /प्रतिनिधी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांविरोधात जळगाव पोलिसांनी कठोर भूमिका घेत विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत जिल्ह्यातील विविध भागांत कारवाई करत तब्बल १०७ जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाकडून सातत्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १७ जुलै २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध पोलीस पथकांनी शहरासह जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवून मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत…

Read More