विविध मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याचे आवाहन साईमत/चोपडा/प्रतिनिधी येथील शिक्षण मंडळ संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी विद्यार्थी पालक मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेच्यासचिव माधुरी मयूर, प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ. जयेश गुजराथी, आयक्यूएसी समितीचे सभासद गोविंद गुजराथी, डी.टी.महाजन, प्रा.एम. पी.पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. रजनी सोनवणे आदी उपस्थित होते. मेळाव्यात द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी मनीषा आणि त्यांच्या समूहाने ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालय नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. त्या दृष्टिकोनातून पालक व विद्यार्थ्यांना गुणवत्ता विषयक मार्गदर्शन डॉ. जयेश गुजराथी यांनी केले. गुणवत्ता व्यवस्थापनात विद्यार्थी व पालकांचा सहभाग महत्त्वाचा…
Author: saimat
सुरेशदादा जैन बी फार्मसी कॉलेजचा भूषण मगरे तायक्वांदो स्पर्धेत चमकला साईमत/जामनेर/प्रतिनिधी जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ व जळगाव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रावेर येथील व्ही.एस.नाईक महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन केले होते. आंतर महाविद्यालयीन जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत जामनेर येथील सुरेशदादा जैन बी फार्मसी कॉलेजच्या तीन वर्षाला शिक्षण घेत असणारा खेळाडू भूषण मगरे याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्याची रावेर येथे होणाऱ्या आंतर महाविद्यालयीन विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. भूषण मगरे यास प्रा.पियूष महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुरेश धारिवाल, सर्व संचालक मंडळ, सुरेशदादा जैन बी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. शशिकांत बऱ्हाटे, सर्व…
चाळीसगावातील सकल मराठा समाजातर्फे मुख्यमंत्र्यांकडे मागणी साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील नारायण गडावर दसऱ्यानिमित्त महाराष्ट्रातील मराठा समाजाचा मेळावा दसऱ्याच्या निमित्ताने घेतला होता. त्या मेळाव्याच्या संदर्भात भाजपाचे व आरएसएसच्या सीमा मनोहर यांनी खालच्या स्तरावर जाऊन मराठा समाजाचे बांधव मेळाव्यात चेंगरून मेले पाहिजे होते, असे अवमानजनक वक्तव्य केल्याने सीमा मनोहर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशा आशयाची मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने चाळीसगाव तहसिलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंगळवारी, १५ रोजी केली आहे.संपूर्ण महाराष्ट्राची त्यांनी माफी न मागितल्यास महाराष्ट्रातील मराठा समाज रस्त्यावर उतरून त्यांना त्यांची जागा दाखवेल. महाराष्ट्रातील मराठा समाज न्यायासाठी लढतो आहे, असे असताना वारंवार मराठा समाजावर खालच्या…
चाळीसगाव महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात उपप्राचार्य डी.एल.वसईकर यांचे प्रतिपादन साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी प्रत्येक घरात ज्याप्रमाणे देवघर असते, त्याप्रमाणे प्रत्येक घरात एक ग्रंथ घर असावे. वाचनाने व्यक्ती सुसंस्कृत आणि प्रगल्भ होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची उदाहरणे देवून डॉ. एस. आर. रंगनाथान यांच्या पंचसुत्रीचे स्पष्टीकरण करून ग्रंथालय आणि वाचनाचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविली गेली पाहिजे, असे प्रतिपादन उपप्राचार्य डी.एल. वसईकर यांनी केले. येथील बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयात भारतरत्न, मिसाइल मॅन, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी…
तालुक्यात प्रत्येक तलाठ्यांचे यूजर आयडी तयार साईमत/यावल/प्रतिनिधी नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आता ‘ई-पंचनामा ॲप’ माध्यमातून जलद गतीने पारदर्शक, वस्तुनिष्ठ भरपाई मिळणार असल्याची माहिती यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी दिली. MRSAC आणि महाराष्ट्र राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीत शेतपिक, जमिन, जनावर, घर, गोठांचे झालेले नुकसानीचे जलद, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी खास शासनाने ई-पंचनामा अत्यंत उपयोगी ‘ॲप’ विकसित केले. यासंदर्भात नाशिक विभागात ५ सप्टेंबर २०२४ रोजी विभागीय कार्यालय, नाशिक याठिकाणी नाशिक विभागातील महसूल, ग्रामविकास, कृषी विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर जळगाव येथे गेल्या २० सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.…
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची माहिती साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार २०२३-२४ मधील फळ पिकाच्या अनुषंगाने, महावेध माहिती (डेटा) नुसार ऑक्टोबर ते मार्च कालावधीमध्ये जळगाव जिल्ह्यातील ८४ महसूल मंडळात सलग पाच दिवस तापमान ४५ डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने केळी पिकाला जास्त तापमानाचा फटका बसून बहुतांश शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना निकषाप्रमाणे नुकसान भरपाई मंजूर होणार आहे. तसेच यापूर्वी जानेवारी महिन्यात सलग तीन दिवस कमी तापमानामुळे विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. असे कमी व जास्त तापमानामुळे झालेल्या नुकसान भरपाईची ३२७ कोटी ५५ लाख एवढी एकत्रित रक्कम लाभ काही दिवसात जळगाव जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांच्या…
‘पंटरला’ अभय देणारा एक अधिकारीही अडचणीत येणार साईमत/यावल/प्रतिनिधी तालुक्यातील ‘अधिकाऱ्यांना काही पदाधिकाऱ्यांकडून दिला जातोय हेतू पुरस्कार त्रास शांतता समितीच्या बैठकीतील चर्चेतून उमटला सूर; अधिकाऱ्यांतर्फे चौकशी करून पक्षांतर्गत कारवाईची गरज’ असे वस्तुस्थितीजन्य वृत्त दैनिक ‘साईमत’मध्ये प्रसिद्ध होताच एका अधिकाऱ्याच्या पंटरने, दलालाने आणि व त्याच्या अन्य ॲडमिन साथीदारांनी व्हाॅट्सॲप ग्रुपमधून ज्ञानाची सूचना केली. हे ज्ञान लक्षात घेता तो ॲडमिनही घरात घुसतांना ज्ञानाचा वापर करतो का…? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे ‘त्या’ ॲडमिनच्या मुळावर आघात झाल्याने तसेच एका व्यवसायातून माजी नगराध्यक्षांनी हकालपट्टी केल्याने तसेच शांतता समितीच्या बैठकीत सर्वांसमक्ष दोन सदस्यांनी दलालाचा पान उतारा केल्याने ‘त्या’ ॲडमिनचा संताप अनावर झाला आहे.…
‘मशाल’ चिन्हाची रांगोळी काढून दिला संदेश साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवारावर असलेली निष्ठा, श्रद्धा हीच आहे की, ठाकरे परिवार हाच आपला पक्ष…ठाकरे परिवार हीच आपली निशाणी…. हाच संदेश ‘मशाल’ चिन्हाची रांगोळी काढून दिला आहे. आज अन् उद्याही शेवटपर्यंत आम्ही ठाकरे परिवारासोबत आहोत, असे रांगोळीतून दर्शविण्याचे काम चाळीसगाव शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सविताताई किशोर कुमावत यांनी केले आहे. त्यांच्या माध्यमातून हा संदेश सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना दसऱ्यानिमित्त रांगोळीतून ‘मशाल’ चिन्ह सर्व मतदारांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचविण्याचे काम आणि संदेश चिन्ह काढून दर्शविला आहे. ‘मशाल’ चिन्ह कॉलनीतील सर्व मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम सविताताईंनी केले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत…
उपमुख्यमंत्र्यांकडे माजी आ.चैनसुख संचेती यांची पत्राद्वारे मागणी साईमत/मलकापूर/विशेष प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोताळा तालुक्यातील नळगंगा धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. मात्र, नदीला प्रचंड पूर येऊन नदीकाठच्या गावातील घरांसह शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त लोकांच्या घरांचा व शेतीचा तात्काळ सर्व्हे करून त्यांना शासनाकडून सानुग्रह मदत देण्यात यावी, बाधितांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशा आशयाची मागणी माजी आमदार चैनसुख संचेती यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. गेल्या ११ ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री जिल्ह्यात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे मोताळा तालुक्यातील धरण ओव्हरफलो झाले.त्यामुळे नळगंगा धरणाचे दरवाजे २ ते ३…
समाजातर्फे फटाके फोडून एकमेकांना पेढे देऊन आनंद साजरा साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी लाडशाखीय वाणी समाजासाठी राज्य सरकारने ‘लाडशाखीय वाणी समाज सोळा कुलस्वामिनी महामंडळ’ ह्या नावाने राज्य सरकारच्या गुरुवारी मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याबद्दल येथील समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाणी मंगल कार्यालयासमोर फटाके फोडून एकमेकांना पेढे देऊन आनंद साजरा केला. चाळीसगाव येथे गेल्या महिन्यात अल्प कालावधीत आयोजित केलेल्या “लाडशाखीय वाणी समाजाचा महामेळाव्याचे” हे यश आहे. तसेच समाजाची एकजूट काय असते, हे सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींच्या लक्षात आले असे मेळाव्याचे आयोजक पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश पाटे, वाणी समाजाचे सचिव सी. सी. वाणी, पत्रकार भिकन वाणी, युवा कार्यकर्ते अमोल नानकर यांनी सांगितले. याप्रसंगी मेहुणबारे येथील माजी सरपंच…