Author: saimat

चोपडा शहरातील गौतम नगरातील घटना साईमत/चोपडा/विशेष प्रतिनिधी शहरातील गजबजलेल्या गौतमनगर भागात बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पायी फिरणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत धूम स्टाइलने समोरून पल्सर मोटारसायकलने येत दोन तरुणांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. आशा प्रल्हाद बिऱ्हाडे (वय ५४) या बुधवारी, १६ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहरातील गौतमनगर भागातील रस्त्यावरून फिरण्यास जात असताना समोरून अचानक वेगात विना नंबर प्लेटची दुचाकी आली.त्यावर तोंड बांधून बसलेल्या युवकांनी बिऱ्हाडे यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत तोडून धूम स्टाइलने पोबारा केला. दोघेही चोरटे तरुण हे २५ ते ३० वयोगटातील असावेत, असा अंदाज आहे.…

Read More

चांदसर गावात पसरली शोककळा साईमत/धरणगाव/विशेष प्रतिनिधी ट्रॅक्टरला रोटाव्हेटर जोडत असतांना अचानक रोटाव्हेटर सुरू झाल्याने ५९ वर्षीय शेतकऱ्याचा पाय अडकल्याने ते गंभीर जखमी झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी नातेवाईकांनी एकाच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. रमेश सुखा कोळी (वय ५९, रा. चांदसर, ता.धरणगाव) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे रमेश कोळी हे आपल्या पत्नी, दोन मुले आणि सुना यांच्यासोबत वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात.…

Read More

विचखेडा गावाच्या अलीकडे कारवरील चालकाचा ताबा सुटला साईमत/पारोळा/विशेष प्रतिनिधी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील विचखेडे गावाच्या अलीकडे धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला सुमारे पाचशे फूट फेकली जाऊन चार वेळा उलटली. त्यात कारमधील दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. राहुल भाऊसाहेब अहिरे (वय २८) आणि निलेश सुरेश पाटील (वय २३, रा. तरवाडे, जि. धुळे) असे मृतांची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सविस्तर असे की, पारोळाकडून धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कारमध्ये निलेश पाटील, गोविंद भास्कर राडोड (वय २४, रा. तरवाडे), राहुल अहिरे असे तिघे आणि महेश…

Read More

धानोऱ्यातील बैठकीत प.पू.जनार्दन हरीजी महाराज यांचे प्रतिपादन साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी येथे गेल्या रविवारी रात्री ९ वाजता दुर्गोत्सव मिरवणुकीत दोन गटात किरकोळ कारणावरून हाणामारीसह दगडफेक करण्यात आली होती.त्यात दोन्ही गटातील काही लोक जखमी झाले होते. याप्रकरणी परस्परांनी अडावद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरुन काहींना अटकही केली आहे. सर्व घटनेनंतर मंगळवारी, दुपारी १ वाजता धानोऱ्यातील संत देवा महाराज भक्त निवासात फैजपुरचे महामंडलेश्वर प. पू. जनार्दन हरीजी महाराज यांनी दोन्ही गटातील लोकांना एकत्रित बोलावून घडलेली घटना दुदैवी आहे. त्यामुळे गावात शांतता राखण्यासाठी सामाजिक एकोपा महत्त्वाचा आहे. तसेच समाजातील टवाळखोर मुलांना सुधारण्याची गरज आहे. अशा घटनांमुळे समाजाची हानी होते. आम्ही संत मंडळींनी हिंदू धर्मासाठी जीवन…

Read More

गणपूर शाळेत महावाचन प्रकल्पाअंतर्गत लेखक राजेंद्र पारे यांचे प्रतिपादन साईमत/चोपडा/प्रतिनिधी स्वतःला परिस्थितीशी झगडत यशस्वी शिखर गाठणाऱ्या बालकाची गोष्ट म्हणजेच ‘धावपट्टीवरचा अनोखा प्रवास’ ही कादंबरी होय. हरलेल्या परिस्थितीत तो बालक पुढे इतरांसाठी आदर्शवत ठरला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हार न मानता झगडत राहिले पाहिजे. त्यामुळे यश हमखास मिळते. वाचनाने माणसात प्रगल्भता वाढते. मन समृद्ध होते. त्याची विचार करण्याची क्षमता वाढते. वाचन संस्कृतीचा विकास झाला पाहिजे. म्हणून विद्यार्थी दशेतून अवांतर वाचनाची गोडी लावली पाहिजे, असे प्रतिपादन लेखक राजेंद्र पारे यांनी केले. चोपडा तालुक्यातील गणपूर येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळा येथे वाचन संस्कृतीचा विकास व्हावा, या उद्देशाने महावाचन प्रकल्पाअंतर्गत राजेंद्र पारे लिखित ‘धावपट्टीवरचा…

Read More

घोडगावच्या सुनबाई गायत्री बाविस्कर यांची मुद्रा, जलसंधारण विभागात निवड साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील रहिवासी तथा सध्या नाशिक येथे स्थायिक झालेले सुनील बारकू पाटील यांची सुन तसेच अमोल सुनील पाटील (बाविस्कर) यांच्या पत्नी गायत्री अमोल पाटील (बाविस्कर) यांनी महाराष्ट्र शासनाच्या २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या सरळ सेवा पदभरती अंतर्गत मृदा व जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ‘ब’ (अराजपत्रित अधिकारी) या पदासाठी घवघवीत यश संपादन केले असून त्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यांनी घोडगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गायत्री पाटील यांच्या यशाबद्दल प्रकाश रजाळे, संचालक संजय पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, सोसायटीचे संचालक सुनील पाटील, रवींद्र पाटील, किशोर…

Read More

मुक्ताईनगरला संबोधी नगरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी धम्मचक्र प्रवर्तन दिनी सम्यक संबोधी बुद्धिस्ट चॅरिटेबल ट्रस्टतर्फे संबोधी बुद्ध विहाराचे नियोजित जागेला संरक्षणासाठी तार कंपाऊंड तयार झालेले अाहे. महिलावर्ग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने कार्यक्रम आयोजित केला होता. सुरुवातीला पंचशील ध्वजाला बौद्ध उपासक व उपासिका यांच्या समवेत डिव्हिजनल ऑफिसर समता सैनिक दल अरुण वानखेडे यांनी सलामी दिली. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे होते. उद्घाटक राज्य संघटक के.वाय.सुरवाडे होते. प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून वंदन करण्यात आले. यावेळी भारताचे संविधान प्रस्तावना तालुक्यातील ‘हर घर घर’ पोहचविण्याचा संकल्प तालुकाध्यक्ष रवींद्र…

Read More

धनाजी नाना महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा साईमत/फैजपूर/प्रतिनिधी धनाजी नाना महाविद्यालयातील ग्रंथालयात मंगळवारी, १५ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांच्या हस्ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.डॉ. शरद बिऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यांना डॉ. कलाम यांच्या जीवनातील कार्य तत्परता व देशसेवा जाणून घेण्याचे आवाहन केले. “विद्यार्थ्यांनी कलाम यांचे अनेक ग्रंथ वाचून त्यांचे विचार आत्मसात करावेत,” असे त्यांनी सांगितले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी विद्यार्थ्यांना “विद्यार्थी दशेत ग्रंथाला आपले मित्र…

Read More

खर्डी शिवारात वीज कोसळून शेतमजूर जागीच ठार साईमत/चोपडा/विशेष प्रतिनिधी तालुक्यातील अडावद येथून जवळील लोणी येथील ३५ वर्षीय शेतमजूर खर्डी शिवारातील एका शेतात केळी लागवड करत असताना मंगळवारी, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास वीज कोसळून जागीच ठार झाल्याची घटना घडली. दरम्यान, घरातील कर्ता पुरुष नैसर्गिक आपत्तीने ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सविस्तर असे की, अडावद येथून जवळील लोणी येथील शिवाजी चैत्राम कोळी (वय ३५) हा मंगळवारी खर्डी शेत शिवारातील इच्छापूर शिवारातील शेतात केळी खोडाची लागवड करण्यासाठी गेलेला होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक वादळ वाऱ्यासह विजेचा गडगडाट सुरू झाला. त्यात शिवाजी…

Read More

मान्यवरांच्या हस्ते मालकी हक्काचे सिटीसर्व्हेचे उताऱ्यांचे वाटप साईमत/धरणगाव/प्रतिनिधी शहरात गेल्या तीस वर्षांपासून नेहरूनगर, रामदेवजी बाबा नगर, हमाल वाडा, संजय नगर, मरीआई परिसर, गौतम नगर, बालाजी मंदिराचा मागील भाग हनुमान नगरचा काही भाग, पारोळा रोड, चोपडा रोड लगतचा भाग आदी नगरमध्ये बेघर लोकांची अनेक दिवसांपासून मागणी होती की, मालकी हक्काचा उतारा मिळावा. यासाठी धरणगाव बेघर अतिक्रमण संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. व्ही.एस. भोलाणे, सचिव रवींद्र कंखरे यांनी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. नेहरूनगर भागातील राहणाऱ्या १८० बेघर लोकांना मालकी हक्काचे उतारे वाटण्याचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रथम दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत…

Read More