Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»Bhusawal : भुसावळ पोलिस उपअधीक्षकपदी केदार बारबोले
    भुसावळ

    Bhusawal : भुसावळ पोलिस उपअधीक्षकपदी केदार बारबोले

    saimatBy saimatDecember 23, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kedar Barbole appointed as Bhusawal Deputy Superintendent of Police
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ पोलिस उपअधीक्षकपदी नागपूर शहराचे सहाय्यक पोलिस आयुक्त केदार प्रकाश बारबोले यांची नियुक्ती करण्यात आली.

    साईमत/भुसावळ /प्रतिनिधी : 

    भुसावळ पोलिस उपअधीक्षकपदी नागपूर शहराचे सहाय्यक पोलिस आयुक्त केदार प्रकाश बारबोले यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य शासनाच्या गृह विभागाचे कार्यासन अधिकारी मृणाल कृष्णा सावंत यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.केदार बारबोले यांनी यापूर्वी सन २०२४ मध्ये जळगाव येथे प्रोबेशनरी अधिकारी म्हणून काम केले असून जिल्ह्याची त्यांना इत्यंभूत माहिती आहे. शांत, संयमी व शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ओळख असून त्यांच्या नियुक्तीमुळे भुसावळ पोलिस दलाला अनुभवी नेतृत्व मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भुसावळचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांची पदोन्नतीवर बदली होणार आहे.

    यापूर्वी भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची बढतीवर पुणे टास्क फोर्समध्ये बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी जळगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांची ३१ जुलै रोजी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, अवघ्या पाच महिन्यांतच गावीत यांची पुन्हा बदली होत असून त्यांना उच्च पदावर बढती मिळणार आहे.या प्रशासकीय बदलांमुळे भुसावळ पोलिस यंत्रणेत नव्या पर्वाची सुरुवात होत असून आगामी काळात कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षमपणे हाताळली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Bhusawal : भुसावळहून सांगलीसाठी निरंकारी संत समागम स्पेशल रेल्वेला हिरवा झेंडा

    January 23, 2026

    Jalgaon (Nashirabad) : टोलनाक्याजवळ मृत्यूचा थरार; भरधाव इनोव्हा दुभाजक तोडून कंटेनरवर आदळली

    January 23, 2026

    Bhusawal : भुसावळमध्ये गंभीर गुन्ह्याचा कट उधळला

    January 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.