Author: saimat

 ‘श्रीं’चे हत्ती वहन आहे साईमत/ पारोळा/प्रतिनिधी :  येथे आज सोमवारी ‘श्रीं’चे हत्ती वहन आहे. हे वहन रात्री ८ वाजता श्री बालाजी महाराजांचा मंदिरापासून निघून पूर्वेस नीट वाणी मंगल कार्यालयमार्गे आझाद चौक ते झपाटभवानी मंदिरात देवी प‌द्मावतींची आरती, मंदिरातून समोरुन पश्चिमेस नीट भोई गल्लीने श्री राम मंदिरात येईल.तेथून कासार गल्लीने टोळकर गल्ली,भाटे वाडी मार्गे कुंभार वाडा, ओतार गल्ली गांवहोळी चौकापर्यंत येऊन बाजारपेठेतून रथ चौक मार्गे पहाटे ३ वाजता मंदिरात येईल. आज सकाळी ८ वाजता मंदिरातून बालाजी महाराजांची पालखी निघेल. पालखी रथ चौकातून दक्षिणेस बाजारपेठ गांवहोळी चौक, नगरपालीका चौकातून जुने पोष्ट ऑफीस मार्गे दक्षिणेस डॉ.मोहरीर यांचे दवाखान्याजवळून हायवेने मालक कै.गिरधरशेठ शिंपी यांचे स्मारक…

Read More

नवरात्रीत रणरागिणींकडून ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे आग्रहाची मागणी साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी :  ‘लव्ह जिहाद’ हा केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतरण, लैंगिक शोषण, वेश्या-व्यवसाय, निर्घृण हत्या, मान‍वतस्करी आणि विक्री, मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवायांत सहभाग इथपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होत. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ‘लव्ह जिहाद’ला असंख्य हिंदू युवती, महिला बळी पडलेल्या आहेत. त्यामुळे हे रोखण्यासाठी राज्यात येत्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा पारित करण्यात यावा, अशी मागणी रणरागिणींनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनाव्दारे केलेल्या मागण्या उत्तर प्रदेश आणि राजस्थान…

Read More

पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. साईमत/जामनेर/प्रतिनिधी :  शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गेल्या ३ दिवसात ३ मोटार सायकली चोरीला गेल्या आहेत.गेल्या दोन दिवसापूर्वी माजी नगरसेवक उल्हास पाटील वाकी रोड यांची मोटार सायकल दिवसा ढवळ्या स्मशान भूमी जवळील ईदगाह मैदान येथून चोरीला गेली आहे.तर रात्री शहरातील साईनाथ नगर भागातून चोरट्यांनी एकाच रात्री दोन दुचाकी वाहने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. रोजी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी दोन्ही शेजारी राहणाऱ्या साईनाथ नगरमधील रहिवासी…

Read More

पर्यटकांसह सामान्य नागरिकांना प्रवेश बंद, पोलिस बंदोबस्त साईमत/धानोरा, ता. चोपडा/ प्रतिनिधी :  यावल तालुक्यातील सावखेडासीम, चुंचाळे, नायगाव येथून जवळच असलेले निंबादेवी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मंगळवारी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. मात्र, सांडव्याच्या भिंतीला तडा गेल्याने ती कोसळण्याची भिती प्रशासनाने व्यक्त केली. ही स्थिती पाहता दुर्घटना रोखण्यासाठी तहसीलदारांनी निंबादेवी धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले. वनविभाग व पोलिसांनी बंदोबस्तदेखील लावला आहे. यावल तालुक्यातील पश्चिम भागात सावखेडासीम या गावापासून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी निंबादेवी धरण आहे. दरवर्षी पावसाळ्यात ऑगस्टमध्ये धरण भरून सांडवा ओसंडतो. भुशी डॅमसारखे चित्र तयार होते. सांडवास्थळी पायऱ्यांवरून वाहणारे पाणी जिल्हाभरातील पर्यटकांना आकर्षित करून घेते. मात्र, यंदा सातपुड्यात…

Read More

शहरातील बोरावल गेट परिसरात अवैध देशी बनावटीचे गावठी पिस्तूल साईमत/ यावल/प्रतिनिधी :  यावल शहरातील बोरावल गेट परिसरात अवैध देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस घेऊन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना यावल न्यायालयात हजर केले असता दि.२८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार युवराज उर्फ युवा राजू भास्कर (वय ३४, रा.बोरावल गेट,यावल) हा आपल्या ओळखीचा भूषण कैलास सपकाळे (वय ३१ रा. वराडसिम, डॉ. आंबेडकरनगर, ता. भुसावळ) याला विक्रीसाठी गावठी पिस्तूल आणला होता. पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. त्यांच्या अंगझडतीत गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस व दोन मोबाईल हॅण्डसेट असा एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. चौकशीत…

Read More

खाजगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले साईमत/पारोळा /प्रतिनिधी :  तालुक्यातील मुंदाणे प्र.अ.येथे एका ४८ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीवरील पाण्याची इलेक्ट्रिक मोटर सुरू करताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.अर्जुन नारायण माळी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी अर्जुन माळी हे आपल्या मुंदाणे शिवारातील शेतात गाईंना चारापाणी करून त्यांच्यासाठी पाण्याचे कुंड भरण्यासाठी विहिरीवरील पाण्याची इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेले असता शॉक लागून बेशुद्ध पडले. यावेळी त्यांना भाऊ नामदेव माळी यांनी खाजगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत नामदेव माळी यांनी पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात…

Read More

सेवानिवृत्त चालकासह वाहकांचा सत्कार साईमत/जामनेर /प्रतिनिधी :  श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र भगवानगड मार्गावर नवीन बस सेवा सुरू केली आहे. यासाठी ‘भगवान सेने’च्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. जामनेर येथे बस आल्यावर माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करुन श्रीफळ प्रदान केले. याप्रसंगी माजी नगरसेवक दीपक तायडे यांनी बस सुरु करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सेवानिवृत्त महारू नाईक यांचा तर मुक्ताईनगर डेपोचे चालक दराडे यांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर तर न.पा.चे गटनेते डॉ. प्रशांत भोंडे यांनी वाहक घुगे यांचा सत्कार केला. ही गाडी मुक्ताईनगरहुन नियमित ७.३० ला निघणार असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी भगवान सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील,…

Read More

वहनाची मिरवणूक सायंकाळी ६ वाजता श्री बालाजी महाराजांच्या मंदिरापासून साईमत/पारोळा/प्रतिनिधी :  येथे आज शुक्रवारी ‘श्रीं’चे वाघ वहन आहे. या वहनाची मिरवणूक सायंकाळी ६ वाजता श्री बालाजी महाराजांच्या मंदिरापासून निघून पूर्वेस भावसार यांच्या चक्की जवळून दक्षिणेस मोरफळ गल्लीने मडक्या मारुती मंदिरा जवळून आझाद चौक ते झपाट भवानी मंदिरात देवी पद्मावतींची आरती, मंदिरातून पुढे शेवडी गल्लीतून बारी गल्ली, नास्कर गल्लीने पंचमुखी हनुमान मंदिरा जवळून भोसले गल्ली, जैन मंदिराजवळून पश्चिमेस जडे गल्ली, बागवान गल्ली, शिंदे गल्ली, राम मंदिर चौक राम मंदिर जवळून लष्कर गल्लीतून हिंगलाज माता मंदिराजवळून दक्षिणेस दशरथ पाटील यांच्या घराजवळून अमळनेर रोड शनी मंदिर जवळून बहादरपूर रस्त्याने लालबाग,बालाजी पार्क, व्यंकटेश नगर,…

Read More

मनमाड रेल्वे स्थानकाची कार्यपद्धतीसह सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :  मध्य रेल्वे भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी दि.२४ सप्टेंबर रोजी मनमाड-भुसावळ रेल्वे मार्गाची विंडो ट्रेलिंग तपासणी केली. ही तपासणी विशेषत: ओएमएस (ऑसिलेशन मॉनिटरिंग सिस्टम) कोच मधून करण्यात आली. ज्यामध्ये रेल्वे मार्गावरील ट्रॅकची चालण्याची गुणवत्ता तपासण्यात आली. तपासणीचा उद्देश म्हणजे गाड्यांची सुरक्षित आणि गुळगुळीत धाव सुनिश्चित करणे, जेणे करून प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक बळकटी मिळेल. ट्रॅकवरील धक्के, कंपनांची तीव्रता, वक्र आणि सिग्नल यंत्रणांची स्थिती तसेच रेल्वे गाड्यांच्या गतीदरम्यान ट्रॅकच्या क्षमतेचा सखोल अभ्यास यामध्ये करण्यात आला. ओएमएस कोचद्वारे या तपासणीतून मिळणारे डेटा रेल्वेच्या देखभाल कार्याला वैज्ञानिक आणि कार्यक्षम बनवण्यास मदत करतो. याच…

Read More

तात्काळ मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याच्या खासदारांनी दिल्या सूचना साईमत/भडगाव/प्रतिनिधी : भडगाव शहरात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खा. स्मिताताई वाघ यांनी शहरातील विविध भागांमध्ये भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. सदर भेटीत मुख्याधिकारी रवींद्र लांडे, शेतकरी संघ संचालिका व नगरसेविका योजना पाटील, अध्यक्ष सोमनाथ पाटील, भडगांव मंडळ अध्यक्ष विनोद नेरकर, कजगांव मंडळ अध्यक्ष अनिल पाटील, तालुका चिटणीस भगवान पाटील तसेच शैलेश पाटील, डॉ.पंकज जाधव, शेखर पाटील, कार्यकारी सदस्य नूतन पाटील, प्रमोद पाटील, मनिषा पाटील, रेखा शिरसाठ, जिजाबाई चव्हाण, सुरेखा वाघ, कुणाल पाटील, प्रदीप पाटील, किरण शिंपी, विशाल पाटील, विशाल…

Read More