साईमत -नशिराबाद – प्रतिनिधी | नशिराबाद नगर परिषद हद्दीतील भवानी नगर परिसरातील अत्यंत गरीब व गरजू नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी विशेष सर्वेक्षण करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप साळी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद नशिराबाद यांना एक सविस्तर निवेदन दिले आहे. पाच वर्षांपासून एकही लाभ नाही; नागरिकांचे हाल निवेदनात नमूद केल्यानुसार, भवानी नगर परिसरात अनेक गरीब कुटुंबे झोपडपट्टीसदृश व जीर्ण घरांमध्ये अत्यंत हालाखीचे जीवन जगत आहेत. पावसाळ्यात या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी गळते, ज्यामुळे अनेक कुटुंबांकडे सुरक्षित निवाऱ्याचा अभाव निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या पाच…
Author: Bharati Bharsake
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | येथील नामांकित श्री महावीर सहकारी बँक लि.च्या उपाध्यक्षपदी स्वरूपकुमार भागचंद लुंकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवी पेठ येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष दलिचंद जैन यांच्यासह सर्व संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती. उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर स्वरूपकुमार लुंकड यांनी संचालक मंडळाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. ते म्हणाले, “बँकेत संचालक म्हणून काम करत असताना मिळालेली ही नवीन जबाबदारी माझ्यासाठी महत्त्वाची आहे. संचालक मंडळाचा हा विश्वास मी सदैव सार्थ ठरवेन. बँकेची अविरत प्रगती, ठेवीदार व सभासदांचे हित जोपासणे आणि संस्थेची गौरवशाली परंपरा पुढे नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली…
साईमत -अमळनेर- प्रतिनिधी | येथील नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष वारंवार संपर्क साधूनही भेटत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नगरपरिषद कार्यालयात एक अनोखे आंदोलन करण्यात आले. नगराध्यक्ष कार्यालयात उपस्थित नसल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीलाच मागण्यांचे निवेदन चिटकवून शांततापूर्ण पद्धतीने आपला निषेध नोंदवला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दुर्गेश (डी.पी.) पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहरातील युवक, महिला आणि प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ”नागरिकांना भेटायला वेळ नाही का?” – आंदोलनकर्त्यांचा सवाल आंदोलनादरम्यान नगराध्यक्षांच्या या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. “लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांना भेटण्यासाठीच…
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश साईमत -जळगाव- प्रतिनिधी | ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) करिश्मा नायर यांनी मंगळवारी, १४ जुलै रोजी एरंडोल तालुक्यातील तळई प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. या औचक भेटीमुळे आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती. या भेटीदरम्यान त्यांनी आरोग्य केंद्रातील मूलभूत सुविधा, औषधसाठा, रुग्णांना मिळणाऱ्या सेवा आणि एकूणच स्वच्छतेची सविस्तर पाहणी करून कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. पाहणी दरम्यान श्रीमती नायर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून कामकाजाची आणि अडचणींची माहिती घेतली. ग्रामीण भागातील…
‘शासनाचा मूळ उद्देश धुळीस मिळतोय’; प्रशासकीय विकेंद्रीकरणासाठी कार्यालय नशिराबाद येथेच सुरू करण्याची मागणी साईमत -जळगाव- प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले नवीन अपर तहसील कार्यालय जळगाव शहरात स्थापन करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेवर आता तीव्र आक्षेप घेतला जात आहे. हे कार्यालय जळगाव शहरात न करता भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती आणि ग्रामीण नागरिकांच्या सोयीचे असलेल्या नशिराबाद येथेच स्थापन करावे, अशी आक्रमक मागणी नशिराबाद नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पंकज शामकांत महाजन यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आज थेट जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर पत्र पाठवून या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात पंकज महाजन यांनी नमूद केले की, “उपविभागीय दंडाधिकारी जळगाव कार्यालयाने १० जुलै २०२६…
मान्सूनच्या दडीमुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रात उकाडा वाढला; बळीराजा चिंतेत बंगालच्या उपसागरात नवीन प्रणाली सक्रिय; हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज मुंबई/जळगाव राज्यात सुरुवातीला दमदार हजेरी लावणाऱ्या मान्सूनने अचानक दडी मारल्यामुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उकाडा प्रचंड वाढला आहे. जुलै महिना अर्धा संपत आला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने आता खरीप हंगामातील पिके कोमेजू लागली आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अशा अत्यंत चिंताजनक परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने (IMD) एक दिलासादायक बातमी दिली आहे. आगामी २० जुलैपासून राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. बळीराजाच्या डोळ्यात पाणी; दुबार पेरणीचे संकट गडद पावसाने प्रदीर्घ विश्रांती…
पतीला जीवे मारण्याची दिली होती धमकी; दारू पाजून शेतात आवळला गळा साईमत -रावेर- प्रतिनिधी | पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याचा राग मनात धरून एका ३० वर्षीय तरुणाची गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या दोन्ही संशयित आरोपींना रावेर पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अत्यंत शिताफीने अवघ्या २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना १७ जुलैपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.शेख कुर्बान शेख शब्बीर (वय ३०, रा. ऐनपूर, ता. रावेर) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा लहान भाऊ शेख सलमान शेख शब्बीर…
७ जुलै रोजी झाला होता विवाह; विद्यापीठासमोरील रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीला उडवले, काका गंभीर जखमी साईमत -जळगाव- प्रतिनिधी | डोळ्यांत नव्या संसाराची स्वप्ने, हातात लग्नाचा सुडा आणि मनात माहेरच्या माणसांना भेटण्याची ओढ… मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. लग्न होऊन अवघे सहा दिवस उलटले नाहीत तोच, एका नवविवाहितेवर काळाने झडप घातली. माहेरी जात असताना भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत २१ वर्षीय नववधूचा जागीच मृत्यू झाला. हा काळीज पिळवटून टाकणारा अपघात सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोरील रस्त्यावर घडला. वैशाली भाऊसाहेब पाटील (वय २१, रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे.…
मनसे केवळ आंदोलक नाही तर रक्षकही; थेट मैदानात उतरून मनसे सैनिकांचे श्रमदान साईमत -जळगाव- प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जळगावातील आकाशवाणी चौकात मनसेतर्फे बोगनवेलींचे वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र, केवळ झाडे लावून न थांबता त्यांचे नियमित संवर्धन, संगोपन आणि देखभालीची जबाबदारी मनसेच्या जळगाव शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली आहे. याच उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून आज या सर्कल परिसरातील अनावश्यक गवतावर तणनाशकाची फवारणी करून मनसैनिकांनी प्रत्यक्ष श्रमदान केले. बोगनवेलींच्या झाडांची योग्य वाढ व्हावी आणि सर्कलचे सौंदर्य अधिक खुलावे, यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून झाडांना नियमित पाणी देणे, खत टाकणे आणि झाडांची निगा राखण्याचे काम सुरू आहे.…
निकृष्ट कामांची बिले काढलीच कशी? मुख्याधिकारी, अभियंत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; चौकशीसाठी टपालाद्वारे पाठवले निवेदन साईमत -नशिराबाद – प्रतिनिधी | नशिराबाद नगर परिषद हद्दीत झालेल्या विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराची सखोल चौकशी करून त्याला तात्काळ ‘ब्लॅकलिस्ट’ (काळ्या यादीत) टाकावे, या मागणीसाठी नशिराबाद येथील सजग नागरिक दीपक भालचंद्र बोंडे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना टपालाद्वारे सविस्तर निवेदन पाठवले असून, दोषी अधिकारी आणि ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. नशिराबाद गावात गेल्या काही महिन्यांत रस्ते काँक्रीटीकरण, गटारी, कंपाऊंड आणि धापे बसवणे यासारखी कोट्यवधींची विकासकामे करण्यात आली. मात्र, ही…