नशिराबाद, बेळीच्या शेतकऱ्यांचे ‘पैनगंगा’ने ५० लाख थकवले जळगाव (प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा साखर कारखान्याने जळगाव तालुक्यातील नशिराबाद आणि बेळी परिसरातील शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला. मात्र पाच महिने उलटूनही मोबदला न दिल्याने शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. थकलेल्या ५० लाख रुपयांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची याचना केली आहे. शेतकऱ्यांनी अनेकवेळा पैनगंगा कारखान्याच्या प्रशासनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला, प्रत्यक्ष भेटी घेऊनही पैशांची मागणी केली. मात्र, त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. टाळाटाळ आणि दुर्लक्षामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले आहे. पेमेंट न मिळाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 8 जानेवारीपासून पैनगंगा साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने…
Author: Vikas Patil
उष्णतेची लाट ; काळजी घ्या – जिल्हाधिकारी जळगाव ( प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात सध्या तापमानात वाढ झाली आहे. दुपारी तापमान अधिक असल्याने नागरिकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट आहे. नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हात शक्यतोवर घराबाहेर पडणे टाळावे. कामासाठी बाहेर जाणे गरजेचे असेल, तर डोक्यावर टोपी किंवा रुमाल बांधावा. हलक्या रंगाचे आणि सैलसर कपडे परिधान करावे. त्यांनी सांगितले की, उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता असते. दिवसभर पुरेसे पाणी प्यावे. लिंबू सरबत, ताक, नारळ पाणी यां पेयांचे सेवन…
रायसोनी महाविद्यालयाने एकाच दिवशी नोंदविले २५१ कॉपीराईट जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील स्वायत्त जी. एच. रायसोनी इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात जागतिक बौद्धिक संपदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी २५१ कॉपीराईट विद्यार्थी व प्राध्यापकांनी दाखल करत नवीन विक्रम नोंदविला. चार वर्षापासून असे विक्रम करणारे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय म्हणून लौकिक असलेल्या जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने २०२२ ला १५४ , २०२३ ला १०८, २०२४ ला १९४ कॉपीराईट व १८ पेटंट व यावर्षी बौद्धिक संपदा दिनाच्या औचित्याने २५१ कॉपीराईट नोंदवले . इस्टीट्युटच्या इंडस्ट्री प्रॅक्टीसेस, अॅकडमिक, शैक्षणिक साहित्य तसेच इंडस्ट्रीमध्ये कुठकुठल्या बेस्ट प्रॅक्टीसेस आहेत यासह स्टुडंट्स प्रोजेक्टवरील पोस्टर, लॅब मॅन्युअल, कोर्स नोट्स, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन,…
धुळ्याच्या विचार पुष्प वाचक मंचकडून कवितांचे अभिवाचन जळगाव (प्रतिनिधी)- मनुष्याच अस्तित्व झाडांमध्ये आहे असं सांगत मराठी कवींच्या झाडांच्या कविता सादर करत झाड व माणूस यांचा अनोन्यसंबंध दाखवणारा “झाडांच्या मनात जाऊ” हा कार्यक्रम जळगाव येथे सादर झाला. परिवर्तन जळगाव नेहमीच जे उत्तम आहे. त्याचा शोध घेऊन ते जळगावकर रसिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असत. याच उपक्रमांतर्गत धुळे येथील विचार पुष्प वाचक मंच निर्मित व अपूर्वा पाटील दिग्दर्शित झाडांच्या मनात जाऊ हे कवितांचा अभिवाचन आयोजित करण्यात आल होतं. सुरूवातीला पुलवामा येथील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “झाडांच्या मनात जाऊ” कार्यक्रमात कवी ना. धो. महानोर, भालचंद्र नेमाडे, नरेश…
मंथन परीक्षेत रायसोनीच्या 20 विद्यार्थ्यांचे यश जळगाव (प्रतिनिधी)- बी. यू. एन. रायसोनी स्कूल (सीबीएसई पॅटर्न) प्रेमनगर येथील विद्यार्थ्यांनी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पार पडलेल्या राज्यस्तरीय ‘मंथन परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या १०० टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदविला होता. परीक्षेमध्ये २० विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले आहे. त्यात पहिलीतून गौरांग जाधव (प्रथम), नियती पाटील (द्वितीय), सिद्धेश मेढे (तृतीय), दुसरीतून आचल जाखेटे (प्रथम), रिया भोईटे (द्वितीय), सान्वी साळुंखे (तृतीय), तिसरीतून तेजस कोटकर (प्रथम), पारस डोडे (द्वितीय), लक्ष शिंपी (तृतीय), चौथीतून, वैष्णवी पोतदार (प्रथम), रितेश पेटकर (द्वितीय), आर्या मुक्कावर (तृतीय), पाचवी- उर्जीत रायसोनी (प्रथम), यासीर मन्यार…
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागातर्फे प्रश्नमंजूषा स्पर्धा जळगाव (प्रतिनिधी)- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील शरीरशास्त्र विभागातर्फे आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडली. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. केतकी पाटील सभागृहात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अमृत महाजन, प्रा. डॉ. शुभांगी घुले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत तीन टिम सहभागी झाल्या होत्या. भावेश जाधव आणि निर्झरा टाटीया ग्रे टीम, पुष्पक गभाने आणि पल्लवी मोरे यांची बीडीसी टीम, देवर्षी शर्मा आणि प्रतिमा अंबेश यांची एएम टीम यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत एएम टीम…
घरकुल योजनेत खरा लाभार्थी वंचित, दुसऱ्याने लाटले अनुदान रावेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील निरूळ येथे आवास योजनेत कागदोपत्री लाभार्थी असलेल्या गणेश शिंदे यांच्या घरी ग्रामपंचायतीचा शिपाई घरकुल पूर्ण झाल्याची पाटी लावून फोटो काढण्यासाठी पोहोचला, तेव्हा हा खरा लाभार्थी वंचित व दुसऱ्याने अनुदान हडपल्याचा घोटाळा समोर आला. प्रत्यक्षात गणेश शिंदे यांना या योजनेचा कोणताही लाभ मिळालेला नाही, गावातील दुसऱ्याच व्यक्तीने त्यांच्या नावावर घरकुल अनुदानाचे पैसे उचलले आहे. गणेश शिंदे यांचे पुतणे समाधान शिंदे यांनी केलेल्या तपासामुळे हा प्रकार प्रकाशात आला. केंद्र शासनाच्या आवास योजनेअंतर्गत गरजूंना स्वतःचे घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पंचायत समितीमध्ये असाच घोटाळा उघडकीस आला होता आता…
जैन हिल्सवर आजपासून फालीचे अकरावे अधिवेशन सुरु जळगाव (प्रतिनिधी)- भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (फाली)चे अकराव्या अधिवेशनची आज जैन हिल्सला सुरूवात झाली. शेतीविषयी समाजात उदासिनेतवर जास्त चर्चा केली जाते, परंतु सकारात्मक बाबींवर चर्चा केली पाहीजे ती फाली उपक्रमात ते दिसते. शेती परवडत नाही असे म्हटले जाते. ही नकारात्मकता दूर झाली पाहिजे. नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न शेतीतुन मिळते फक्त नियोजन करून तंत्रज्ञानासोबत शेतीपूरक व्यवसाय करावा. जेणे करून शेती परवडेल, लहानपणापासूनच आवड असेल तर शेतीत यशस्वी होता येते. मजुरांची टंचाईसह अन्य समस्या निर्माण होतात, मात्र त्यावर शाश्वत सोल्यूशन काढावे लागते त्यासाठी जैन इरिगेशन प्रयत्न करते असे मनोगत…
आशियाई योगासन स्पर्धेत डॉ. शरयू विसपुतेंना सुवर्णपदक जळगाव (प्रतिनिधी ) दुसऱ्या आशियाई योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या डॉ. शरयू विसपुते यांनी उत्कृष्ट योग कौशल्याचे प्रदर्शन करत सुवर्णपदक जिंकले आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत त्यांनी ‘सिनियर बी’ गटात पारंपरिक फॉरवर्ड बेंडिंग योगासनांच्या प्रकारात २१ आशियाई देशांतील स्पर्धकांना पराभूत करत हे यश मिळवले. भारताचे प्रतिनिधित्व करताना डॉ. शरयू यांनी अचूक योगासन शैली आणि लयबद्ध हालचालींनी जजेसना प्रभावित केले. पारंपरिक फॉरवर्ड बेंडिंग योगासनांवरील त्यांचे प्रभुत्व आणि प्रत्येक मुद्रेतील सफाई यामुळे त्यांना प्रतिस्पर्धकांवर मात करणे शक्य झाले. आशिया खंडातील २१ देशांच्या योग साधकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता, ज्यात डॉ. शरयू यांनी आपल्या वयोगटात…
रेल्वेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक; दोघांना बेड्या जळगाव (प्रतिनिधी)- रेल्वेत हेड क्लर्कची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ९ लाख ६४ हजारांत फसवणूक गुन्ह्यात प्रशांत अग्रवाल (रा.गडकरी नगर, भुसावळ) याला अटक झाली होती. तपासात आणखी चार संशयित निष्पन्न झाले.त्यापैकी दोघांना अटक झाली दोघे पसार झाले. आरोपींच्या विरोधात अन्य ८ तक्रारदार पुढे आल्यानंतर फसवणुकीचा आकडा २५ लाखांवर पोहोचल्याचे तपासाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशांत अग्रवाल यास अटक करण्यात आली. त्याला सुरूवातीला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. २५ रोजी मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा २९ पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. हर्षांनी मेहता (गोलाणी कॉम्प्लेक्स, भुसावळ), प्रशांत अग्रवालचा शालक राजवीर परदेशी (भुसावळ), मेघराज पाटील (साकरी, ता.…