lure of a job : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक; दोघांना बेड्या

0
17

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक; दोघांना बेड्या

जळगाव (प्रतिनिधी)-

रेल्वेत हेड क्लर्कची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ९ लाख ६४ हजारांत फसवणूक गुन्ह्यात प्रशांत अग्रवाल (रा.गडकरी नगर, भुसावळ) याला अटक झाली होती. तपासात आणखी चार संशयित निष्पन्न झाले.त्यापैकी दोघांना अटक झाली दोघे पसार झाले.

आरोपींच्या विरोधात अन्य ८ तक्रारदार पुढे आल्यानंतर फसवणुकीचा आकडा २५ लाखांवर पोहोचल्याचे तपासाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशांत अग्रवाल यास अटक करण्यात आली. त्याला सुरूवातीला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. २५ रोजी मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा २९ पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

हर्षांनी मेहता (गोलाणी कॉम्प्लेक्स, भुसावळ), प्रशांत अग्रवालचा शालक राजवीर परदेशी (भुसावळ), मेघराज पाटील (साकरी, ता. भुसावळ), योगेश तिवारी (सरस्वती नगर, भुसावळ) यांनाही सहआरोपी करण्यात आले. मेघराज पाटील व योगेश तिवारी यांना अटक करण्यात आली. पाटील याला २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी, तर तिवारी याला न्यायालयीन कोठडी मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here