Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»gold medal : आशियाई योगासन स्पर्धेत डॉ. शरयू विसपुतेंना सुवर्णपदक
    क्रीडा

    gold medal : आशियाई योगासन स्पर्धेत डॉ. शरयू विसपुतेंना सुवर्णपदक

    Vikas PatilBy Vikas PatilApril 28, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आशियाई योगासन स्पर्धेत डॉ. शरयू विसपुतेंना सुवर्णपदक

    जळगाव (प्रतिनिधी )

    दुसऱ्या आशियाई योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या डॉ. शरयू विसपुते यांनी उत्कृष्ट योग कौशल्याचे प्रदर्शन करत सुवर्णपदक जिंकले आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत त्यांनी ‘सिनियर बी’ गटात पारंपरिक फॉरवर्ड बेंडिंग योगासनांच्या प्रकारात २१ आशियाई देशांतील स्पर्धकांना पराभूत करत हे यश मिळवले.

    भारताचे प्रतिनिधित्व करताना डॉ. शरयू यांनी अचूक योगासन शैली आणि लयबद्ध हालचालींनी जजेसना प्रभावित केले. पारंपरिक फॉरवर्ड बेंडिंग योगासनांवरील त्यांचे प्रभुत्व आणि प्रत्येक मुद्रेतील सफाई यामुळे त्यांना प्रतिस्पर्धकांवर मात करणे शक्य झाले. आशिया खंडातील २१ देशांच्या योग साधकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता, ज्यात डॉ. शरयू यांनी आपल्या वयोगटात अव्वल स्थान पटकावले.

    डॉ. शरयू यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय योगासनांची श्रेष्ठता पुन्हा सिद्ध केली आहे. कठोर परिश्रम, योगासनांप्रति समर्पण आणि निष्ठा यांमुळेच त्यांना हे यश प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे.
    डॉ. शरयू विस्पुते यांनी यापूर्वीही अनेक योगासन स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांनी राज्यातील योग स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही भूमिका बजावली आहे. सध्या त्या महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष असून, वैद्यकीय व्यवसाय सांभाळून त्या योगासनांचा प्रसार करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon : मतमोजणी केंद्रावर पत्रकारांवर पोलिसी दंडुकेशाही

    January 19, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026

    “जळगावमध्ये वाहतुकीला नवसंजीवनी! गिरणा नदीवर ७९ कोटींच्या नवीन बांभोरी पुलाला मंजुरी”- खा स्मिता वाघ

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.