साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव येथील महिंद्रा ॲण्ड महिंद्रा फायनानशियल सर्व्हिसेस लि. वाहन कर्ज वसुलीच्या दाव्यामध्ये चाळीसगाव येथील दिवाणी न्यायालयाने कर्जाची परतफेड करण्याचे आदेश केले होते. परंतु आदेशाचे उल्लंघन केल्याचा प्रकार कर्जदार आणि जामीनदाराच्या अंगलट आला आहे. मंगळवारी, २२ ऑगस्ट २०२३ रोजी न्यायालयाने याप्रकरणी जामीनदारास १० दिवस दिवाणी तुरुगांत ठेवण्याचे आदेश केले. कर्जदार प्रशांत दामोदर शेवाळे यांनी महिंद्रा ॲण्ड महिंद्रा फायनानशियल लि. वाहन कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते न भरल्याने महिंद्रा ॲण्ड महिंद्रा फायनानशियल लि. ने कर्जदारास व जामीनदार यास वेळोवेळी नोटीस पाठविल्या होत्या. यावर लवादाने अवार्ड पारित केलेला होता. कर्जदार आणि जामीनदार यांनी आदेशाची पालनही केले नाही. तसेच कर्जही…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरविणारा भारत हा विश्वातील एकमेव देश ठरला आहे. बुधवारी ‘चांद्रयान-३’ मोहीम फत्ते झाल्यानंतर प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली आहे. गुरुवारी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या व्ही. एच. पटेल प्राथ. विद्यालयात विद्यार्थ्यांनी जल्लोष करतांना मानवी साखळीने भारताचा नकाशा साकारुन जल्लोष केला. यावेळी चिमुरड्यांनी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत परिसर दणाणून टाकला. मोहीम यशस्वी झाल्याने विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला. मुख्याध्यापिका मंजुषा नानकर, ज्येष्ठ शिक्षक जिजाबराव वाघ यांनी मोहिमेची विद्यार्थ्यांना माहिती दिली. यशस्वीतेसाठी त्रिशला निकम, अनिल महाजन, राजश्री शेलार, मनिषा सैंदाणे, शर्वरी देशमुख अजयराव सोमवंशी, सचिन चव्हाण, प्रशांत महाजन, स्मिता अमृतकार, दीपाली चौधरी, ज्योती कुमावत,…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीकडून चोपडा तालुक्यातील लासूर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. चोपडा तालुक्यातील लासूर गावात अमळनेर कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूत अंतिम वर्षातील विद्यार्थिनी आरती नवनाथ लांडगे, नम्रता चंद्रकांत कोळी, गायत्री मोतीलाल परदेशी, ऋतिका संजय चव्हाण यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी कार्यानुभव कार्यक्रमातंर्गत सर्वेक्षण केले. यावेळी लासूरचे सरपंच श्रीमती जनाबाई सुखदेव माळी, माजी सरपंच निंबाजी राजाराम वाघ, उपसरपंच अनिल जिजाबराव पाटील, ग्रामसेवक विश्वनाथ काशिनाथ चौधरी, प्रवीण इंधा, लीलाधर पाटील, गुणवंत महाजन, तुषार पाटील यांनी कृषीदुतांचे स्वागत केले. कार्यक्रमात अमळनेर येथील नवलभाऊ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शुभांगी चव्हाण, रावे प्रोग्राम ऑफिसर प्रा. गिरीश पाटील, उपप्राचार्य प्रा. संदीप…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगावसह ३६ जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील सर्व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशा आशयाची तक्रार ॲड. दीपक सपकाळे यांनी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे(बार्टी) महासंचालक, यांच्याकडे केली आहे. अशा तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही न केल्यास अर्जदार हे न्यायालयीन मार्गाचा अवलंब करतील, त्यामुळे तक्रार अर्जाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यातील (जळगाव सह) जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील सर्व बाह्यस्त्रोत कर्मचारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील ३६…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी नांदगावकडून धुळेकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने वयोवृद्धाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो ठार झाल्याची घटना खडकी बायपासला घडली. याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील देवळी येथील अशोक शांताराम मराठे (वय ६५, रा.देवळी, ता.चाळीसगाव) हे चाळीसगावला एका हॉटेलात वेटर म्हणून कामाला आहे. ते सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडताना त्यांना अचानक टाटा कंपनीच्या भरधाव ट्रकने (क्र. एम.एच. आर.जे ११ जीसी ०५१३) जोरदार धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले. त्यानंतर ट्रक चालक…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र विभागामार्फत ‘चांद्रयान-३’ मोहिमेचे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी आयसीटी हॉलमध्ये सुविधा उपलब्ध केली होती. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. एल. चौधरी, प्रा. एन. एस. कोल्हे, महाविद्यालयाचे समन्वयक व भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शैलेश वाघ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, सर्व कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सुरुवातीला भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शैलेश वाघ यांनी मोहिमेची पार्श्वभूमी व यापूर्वीच्या भारत व इतर राष्ट्रांच्या मोहिमांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर मोहिमेच्या सॉफ्ट लँडिंगच्या लाईव्ह प्रक्षेपणाचा सर्वांनी त्या ठिकाणी आनंद घेतला. जगाच्या व भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील घाट रस्त्यावरील एका कृषी केंद्राच्या दुकानातून अज्ञाताने ३५ हजारांचा रोकड लंपास केल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्याची नोंद होताच शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यानंतर सीसीटीव्हीच्या साहाय्याने आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीतास अटक केल्यामुळे मार्केट परिसरातील सर्व व्यापारी तसेच दुकान मालक प्रदीप देशमुख यांनी समाधान व्यक्त करुन पोलिसांना चांगल्या कामाबद्दल आभार मानले आहेत. संशयित आरोपीला न्यायालयात हजर केल्यावर त्याला २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील घाटरस्त्यावरील फकीराव रामराव कंपनी खते व बियाण्या’च्या दुकानात १९ ऑगस्ट रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास कोणी नसल्याचा गैरफायदा घेवून अज्ञात चोरट्याने दुकानाच्या ड्रावरमधुन ३५ हजार…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी शहरानजीकच्या एका ठिकाणावरून लुटमार करून पळ काढत असलेल्या टोळक्याला मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बोदवड पोलिसांनी मुक्ताईनगरच्या पोलिसांना तात्काळ याबाबतची माहिती दिली. त्यांनी सापळा रचून सहा जणांचा टोळीला अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त केली आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सविस्तर असे की, जामनेर शहरातील एका ठिकाणी सहा जणाच्या टोळीने गावठी कट्ट्यासह अन्य शस्त्रांचा धाक दाखवून लुट केली. त्यानंतर ही टोळी बोदवडच्या दिशेने पळाली. लुट झालेला संबंधित व्यक्ती हा जामनेरातील एका प्रभावशाली व्यक्तीचा असल्याने त्याने तात्काळ याबाबतची माहिती बोदवड पोलिसांनी दिली. त्यांनी अडथळा निर्माण करून त्यांना अटकाव करण्याची तयारी केली. मात्र, याआधीच…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी नगरदेवळा येथील श्रीमंत सरदार जहागीरदार पवार परिवारातील ज्येष्ठ सुपुत्र तथा पुणे येथील युवा उद्योजक अर्जुन दिग्विजयराव पवार यास महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते “उद्योग भूषण” म्हणून नुकतेच गौरविण्यात आले. कोल्हापूरच्या एका हॉटेलमध्ये आयोजित विशेष समारंभात सन्मानचिन्हासह प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना गौरविण्यात आले. अर्जुन पवार हे नगरदेवळा येथील श्रीमंत सरदार जहागीरदार तथा जळगाव जि.प. चे माजी उपाध्यक्ष कै.बाळासाहेब के. एस. पवार यांचे नातू आणि माजी जि. प सदस्या वंदना दिग्विजय पवार यांचे सुपुत्र आहे. उद्योग क्षेत्रात अर्जुन पवार यांनी आपली नवी ओळख निर्माण केली आहे. ते सध्या पुणे येथे वास्तव्यास असून निकोल ई.व्ही. कंपनीचे…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय तथा भडगाव तालुका क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने सौ.रजनीताई देशमुख, कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथील क्रीडांगणावर तालुकास्तरीय मुलांच्या खो-खो स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलांच्या गटात भडगावच्या लाडकुबाई विद्यामंदिर संघाने जवाहर हायस्कूल, गिरड विरुध्द विजय मिळविला. गिरड संघ उपविजयी ठरला. १७ वर्षाआतील मुलांच्या गटात गोंडगावच्या माध्यमिक विद्यालय संघाने चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात अँग्लो उर्दू हायस्कूल, भडगाव संघाचा पराभव करत जेतेपद प्राप्त केले. अँग्लो उर्दू हायस्कूलच्या संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. याच गटात माध्यमिक विद्यामंदिर, पळासखेडे हा संघ तृतीय स्थानी राहिला. स्पर्धेतील विजयी-उपविजयी संघाचे…