न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन

0
4

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

जळगाव येथील महिंद्रा ॲण्ड महिंद्रा फायनानशियल सर्व्हिसेस लि. वाहन कर्ज वसुलीच्या दाव्यामध्ये चाळीसगाव येथील दिवाणी न्यायालयाने कर्जाची परतफेड करण्याचे आदेश केले होते. परंतु आदेशाचे उल्लंघन केल्याचा प्रकार कर्जदार आणि जामीनदाराच्या अंगलट आला आहे. मंगळवारी, २२ ऑगस्ट २०२३ रोजी न्यायालयाने याप्रकरणी जामीनदारास १० दिवस दिवाणी तुरुगांत ठेवण्याचे आदेश केले. कर्जदार प्रशांत दामोदर शेवाळे यांनी महिंद्रा ॲण्ड महिंद्रा फायनानशियल लि. वाहन कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते न भरल्याने महिंद्रा ॲण्ड महिंद्रा फायनानशियल लि. ने कर्जदारास व जामीनदार यास वेळोवेळी नोटीस पाठविल्या होत्या. यावर लवादाने अवार्ड पारित केलेला होता. कर्जदार आणि जामीनदार यांनी आदेशाची पालनही केले नाही. तसेच कर्जही भरले नाही. त्यामुळे महिंद्रा ॲण्ड महिंद्रा फायनानशियल लि. कंपनीन एन. के. वाळके दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, चाळीसगाव यांच्याकडे वसुलीसाठी दावा दाखल केला होता.

या प्रकरणात सुरवातीला कर्जदार व जामीनदार यांना नोटीस बजावण्यात आली. तरीही कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे न्यायालयाने जामीनदार यांच्याविरोधात जंगम मालमत्ता जप्तीचे वारंट काढले होते. पण त्यासही जामीनदाराने दाद दिली नाही. म्हणून न्यायालयाने जामीनदार संतोष वामन लिंगायत यांच्याविरुध्द न्या. एन. के. वाळके यांनी कैद वारंट लागू केले होते. कर्ज भरण्याबाबत पाऊले न उचलली गेल्याने जामीनदार संतोष वामन लिंगायत यांना दिवाणी कैद करुन १० दिवसासाठी दिवाणी तुरुंगात पाठविण्यात आले. महिंद्रा ॲण्ड महिंद्रा फायनानशियल लि.कडून प्रमुख अधिकारी किशोर पळसे, विधी अधिकारी संतोष कोळी, कंपनीचे ॲड. प्रमोद बी. आगोणे यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. इरफान पठाण, ॲड. सुलभा पवार, ॲड. संग्रामसिंग शिंदे, ॲड. समिर तक्ते यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here