भडगावला तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा रंगल्या

0
3

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय तथा भडगाव तालुका क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने सौ.रजनीताई देशमुख, कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथील क्रीडांगणावर तालुकास्तरीय मुलांच्या खो-खो स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलांच्या गटात भडगावच्या लाडकुबाई विद्यामंदिर संघाने जवाहर हायस्कूल, गिरड विरुध्द विजय मिळविला. गिरड संघ उपविजयी ठरला. १७ वर्षाआतील मुलांच्या गटात गोंडगावच्या माध्यमिक विद्यालय संघाने चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात अँग्लो उर्दू हायस्कूल, भडगाव संघाचा पराभव करत जेतेपद प्राप्त केले. अँग्लो उर्दू हायस्कूलच्या संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. याच गटात माध्यमिक विद्यामंदिर, पळासखेडे हा संघ तृतीय स्थानी राहिला.

स्पर्धेतील विजयी-उपविजयी संघाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.दिनेश तांदळे, प्रा.डॉ.दिनेश मराठे, प्रा.डॉ.अतुल देशमुख, स्वप्निल परदेशी, ललीत अहिरे, रवींद्र वाडेकर यांनी कौतुक केले. यशस्वीतेसाठी क्रीडा समन्वयक प्रा.डॉ.सचिन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक प्रा.सतीश पाटील, डी.एस.पाटील, अमीत पाटील, रहिम बागवान, सुभाष चौधरी, एन.एस.पाटील, प्रशांत सोळुंखे, अजहर शेख तसेच खेळाडू शुभम निकुंभ, हर्षल पाटील, तेजस पाटील, रवी काळे, जगदीश पाटील, ज्योती पाटील, विद्या महाले आदींनी परिश्रम घेतले. पंच म्हणून राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here