जामनेरात लुटमार करुन पळ काढणारी टोळी ताब्यात

0
2

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

शहरानजीकच्या एका ठिकाणावरून लुटमार करून पळ काढत असलेल्या टोळक्याला मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बोदवड पोलिसांनी मुक्ताईनगरच्या पोलिसांना तात्काळ याबाबतची माहिती दिली. त्यांनी सापळा रचून सहा जणांचा टोळीला अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त केली आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सविस्तर असे की, जामनेर शहरातील एका ठिकाणी सहा जणाच्या टोळीने गावठी कट्ट्यासह अन्य शस्त्रांचा धाक दाखवून लुट केली. त्यानंतर ही टोळी बोदवडच्या दिशेने पळाली. लुट झालेला संबंधित व्यक्ती हा जामनेरातील एका प्रभावशाली व्यक्तीचा असल्याने त्याने तात्काळ याबाबतची माहिती बोदवड पोलिसांनी दिली. त्यांनी अडथळा निर्माण करून त्यांना अटकाव करण्याची तयारी केली. मात्र, याआधीच चोरटे बोदवडवरून मुक्ताईनगरकडे पळाले होते. यासंदर्भात पोलीस प्रशासनाला विचारणा केल्यावर त्यांनी टोळीला अटक केल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. या टोळीने नेमकी कुठे चोरी केली? या प्रकरणातील व्यक्तीचे राजकीय संबंध याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here