साईमत, धुळे : प्रतिनिधी विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांविषयी वेगवेगळ्या माध्यमातून कृतज्ञताही व्यक्त करतात. शहरातील न्यू सिटी शाळेतील माजी विद्यार्थी गजानन जोशी यानेही शिक्षक व्यंकटेश यशवंत दाबके यांच्याविषयी आगळीवेगळी कृतज्ञता व्यक्त केली. त्याने शिक्षक दाबके यांचे नाव चक्क नभांगणातील एका ताऱ्याला देण्याचा प्रस्ताव इंग्लंडमधील इंटरनॅशनल स्टार रजिष्ट्री संस्थेला पाठविला होता. या संस्थेने प्रस्ताव मान्य केला. त्यामुळे शिक्षक यशवंत दाबके यांचे नाव आता एका ताऱ्याला देण्यात आले आहे. माजी विद्यार्थ्याने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकाला अशी अनोखी भेट दिल आहे. शहरातील न्यू सिटी हायस्कूलमध्ये असताना व्यंकटेश यशवंत दाबके विज्ञान व गणित विषय शिकवत होते. त्यांच्या हाताखाली हजारो विद्यार्थी घडले. २००५…
Author: Sharad Bhalerao
साईमत, धुळे : प्रतिनिधी एलपीजी गॅस घेऊन भोपाळच्या दिशेने जाणाऱ्या टँकरला मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात ट्रॉलाने धडक दिली. त्यामुळे टँकर महामार्गावर उलटला. रत्नागिरीहून भोपाळच्या दिशेने जाणाऱ्या टँकरमधून (क्र.एमएच ४०, सीडी ०४९९) एलपीजी गॅसची वाहतूक केली जात होती. मुंबई-आग्रा महामार्गाने लळिंग घाटातून हा टँकर जात होता. त्यावेळी मागून येणाऱ्या ट्रॉलाने (क्र.आरजे १४ जीएस ६३०७) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टँकरला धडक दिली. त्यामुळे टँकर दुभाजकावर धडकून महामार्गावर उलटला. त्यानंतर मागून येणारी इतर तीन लहान वाहने ट्रॉला व टँकरवर धडकली. अपघातात ट्रॉला चालक जखमी झाला. तसेच महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासह जखमी…
साईमत, धुळे : प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. उन्हाचा प्रकोप वाढल्याने पीक करपत आहे. त्यानंतरही शासन, प्रशासन लक्ष देत नसल्याने व्यथित झालेल्या होळ येथील शेतकऱ्याने सहा एकर कपाशीच्या शेतात म्हशी सोडल्या. तसेच रोटाव्हेटर फिरविला. शिंदखेडा तालुक्यात गेल्यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला होता. यंदाही अपेक्षित पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात झालेल्या पावसाच्या भरवशावर पेरण्या केल्या होत्या. पण ऑगस्ट महिन्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. पाणीपुरवठ्यासाठी तालुक्यातील २५ गावात विहिरींचे अधिग्रहण झाले आहे. तसेच धावडे गावात टँकर सुरू आहे. शेतकऱ्यांना मदत करत शासनाने दिलासा द्यावा दुसरीकडे शासनाने शेतकऱ्यांना अद्यापही मदत केलेली नाही.…
साईमत, धुळे : प्रतिनिधी पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने धुळे तालुक्यासह जिल्ह्यात पिकांची अवस्था बिकट आहे. खरिपाचे उत्पादन ३० टक्केही येणार नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काँग्रेसने शहरात शेतकरी आक्रोश आंदोलन केले. तसेच प्रदेश कार्याध्यक्ष तथा आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम दोन दिवसात न मिळाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनांतर्गत जेल रस्त्यावर सकाळी दीड तास धरणे आंदोलन झाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष डॉ. अनिल भामरे, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, माजी सभापती गुलाबराव कोतेकर, पंचायत समितीची माजी सभापती भगवान गर्दे, लहू पाटील, बाजार समितीचे संचालक साहेबराव…
साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी नंदुरबार, नवापूर तालुक्यातील पोलीस पाटील संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, शासनाच्या धोरणानुसार महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी शुक्रवारी, ८ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात, (प्रशासकीय इमारत टोकरतलाव रोड, नंदुरबार) सोडत काढण्यात येणार असल्याचे, उपविभागीय अधिकारी (नंदुरबार) मंदार पत्की यांनी सांगितले. नंदुरबार तालुक्यातील ५१ महसूली गावात व नवापूर तालुक्यातील ४४ महसुली गावात अशा ९५ महसूली गावांची पोलीस पाटील संर्वगाची पदे रिक्त आहेत. पोलीस पाटील पदे रिक्त असलेल्या महसूली गावात शासन धोरणानुसार ३० टक्के महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. यावेळी नंदुरबार व नवापूर तालुक्यातील संबंधित गावातील नागरिकांनी…
साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिकांसह त्यांचे वारस असलेल्या वीरपत्नी, विधवा, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळात पुरस्कार प्राप्त खेळाडू, संगीत, गायन, वादन, नृत्य या क्षेत्रात पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, देशात राज्यात प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे, आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस, अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक, विधवा यांचे पाल्य, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये १०…
साईमत, नवापूर : प्रतिनिधी येथील श्री शिवाजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवस अर्थात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावून अध्यापन केले. यावेळी विद्यार्थी-शिक्षकांसह मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक तर कोणी क्लार्क, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक, शिपाई बनले होते. वर्गावर प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापन केले. समारोप कार्यक्रमाप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित विद्यार्थी शिक्षकांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय पावरा होते. शिक्षकदिनी उपमुख्याध्यापक वैष्णव देवकते, पर्यवेक्षक रविना वसावे, मित्तल वसावे, रोनक पाटील, लिपिक यश सोनवणे, जयेश सोनवणे, वेदांत सोनवणे, जय पवार, प्रयोगशाळा परिचर देवांग मोरे, ग्रंथपाल अंशु सोनवणे, शिपाई म्हणून…
साईमत, नवापूर : प्रतिनिधी तालुक्यात शेती पंपासाठी वीज पुरवठा नियमित व सुरळीत करण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य आदिवासी काँग्रेसतर्फे १ सप्टेंबर २०२३ पूर्वी तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आले होते. वीज महावितरण कंपनीने नवापूर तालुक्यात नियमित वीज पुरवठा करावा, अन्यथा वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन जवाबदार राहील, असे निवेदनात म्हटले होते. मागील एक महिन्यापासून नवापूर तालुक्यात शेती पंपासाठी केला जाणारा वीज पुरवठा हा अनियमित करण्यात येत आहे. त्यामुळे नवापूर तालुक्यातील शेतकरी हैराण झालेला आहे. मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारलेली असतांना विजेचा लपंडाव शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यात पाऊस नाही आणि अनियमित वीज…
साईमत, नवापूर : प्रतिनिधी शहरात गोकुळाष्टमीनिमित्त जुनी महादेव मंदिर गल्लीतील जगन्नाथ महादेव मंदिराच्या प्रांगणात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन जय श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी उत्सव समितीतर्फे केले आहे. समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर चौधरी, उपाध्यक्षपदी सचिन ब्रम्हे यांची निवड केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीकृष्ण जन्माष्टमी, भजन कीर्तन, रास गरबा, दहीहंडी गोविंदा पथक मिरवणुकीसह सजीव देखावा साकारण्यात येणार आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यंदाच्या उत्सवासाठी श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी उत्सव समितीच्या उर्वरित कार्यकारिणीत सचिव राहुल सेन, सहसचिव जयेश पाटील, खजिनदार डॉ.सुनील पवार, सदस्यांमध्ये दर्शन पाटील, भाविन पाटील, तुषार पाटील, प्रदीप मावची, मुकेश धोडिया यांचा समावेश आहे. तसेच सल्लागार मंडळीची सर्वानुमते निवड…
साईमत, तळोदा : प्रतिनिधी प्राचार्य भाईसाहेब गो.हु.महाजन न्यू हायस्कूल आणि शि.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथे ५ सप्टेंबर रोजी माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती राष्ट्रीय शिक्षक दिन आणि अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संस्थेचा ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा मंगला महाजन होत्या. याप्रसंगी तळोदा कॉलेज ट्रस्टचे संचालक अरुणकुमार महाजन, संस्थेचे सचिव आर.व्ही.सूर्यवंशी, संचालक एन.डी.माळी, संचालक प्रा.पी.बी.महाजन, तसेच विस्तार अधिकारी जाधव, केंद्र प्रमुख कांतीलाल पाडवी, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.शर्मा, संस्थेचे प्रमुख देणगीदात भगवान माळी, सुधाकर टवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून तळोदा पंचक्रोशीतील डॉ.सुभाष पाटील होते. त्यांनी…