शिक्षकांच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी केले शालेय कामकाज

0
7

साईमत, नवापूर : प्रतिनिधी

येथील श्री शिवाजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवस अर्थात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावून अध्यापन केले. यावेळी विद्यार्थी-शिक्षकांसह मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक तर कोणी क्लार्क, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक, शिपाई बनले होते. वर्गावर प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापन केले. समारोप कार्यक्रमाप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित विद्यार्थी शिक्षकांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय पावरा होते.

शिक्षकदिनी उपमुख्याध्यापक वैष्णव देवकते, पर्यवेक्षक रविना वसावे, मित्तल वसावे, रोनक पाटील, लिपिक यश सोनवणे, जयेश सोनवणे, वेदांत सोनवणे, जय पवार, प्रयोगशाळा परिचर देवांग मोरे, ग्रंथपाल अंशु सोनवणे, शिपाई म्हणून विर पवार, दीप गावित, निहाल खाटीक, किसन पाडवी, आदित्य जाधव यांनी काम पाहिले. यावेळी किंजल पाटील, डॉली पाटील, वैष्णवी देवकते, नियती बंजारा, कनिष्का पाटील आदी विद्यार्थी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला समिती प्रमुख सुभाष पाटील, अल्पोहार समिती प्रमुख संजय पाटील, कार्यक्रम समिती प्रमुख शोभा गिरासे, ए.एन.सोनवणे, अशोक रजाळे यांनी मार्गदर्शन केले. परीक्षक समिती म्हणून वैशाली पाटील यांनी काम पाहिले. शिक्षक बंधु भगिनींनी परीक्षकाचे काम पाहिले. प्रास्ताविक तथा सुत्रसंचलन कृपा पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here