रत्नागिरीहून भोपाळला जाणारा गॅस टँकर महामार्गावर उलटला

0
7

साईमत, धुळे : प्रतिनिधी

एलपीजी गॅस घेऊन भोपाळच्या दिशेने जाणाऱ्या टँकरला मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात ट्रॉलाने धडक दिली. त्यामुळे टँकर महामार्गावर उलटला.

रत्नागिरीहून भोपाळच्या दिशेने जाणाऱ्या टँकरमधून (क्र.एमएच ४०, सीडी ०४९९) एलपीजी गॅसची वाहतूक केली जात होती. मुंबई-आग्रा महामार्गाने लळिंग घाटातून हा टँकर जात होता. त्यावेळी मागून येणाऱ्या ट्रॉलाने (क्र.आरजे १४ जीएस ६३०७) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टँकरला धडक दिली. त्यामुळे टँकर दुभाजकावर धडकून महामार्गावर उलटला. त्यानंतर मागून येणारी इतर तीन लहान वाहने ट्रॉला व टँकरवर धडकली. अपघातात ट्रॉला चालक जखमी झाला. तसेच महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासह जखमी चालकाला हिरे रुग्णालयात दाखल केले. टँकर चालकाने कंपनीशी संपर्क साधला. अपघातात टँकरला गळती लागली नव्हती. त्यानंतर दुपारी मनमाडहून गॅस कंपनीचे पथक आले. पथकाने अन्य एका टँकरमध्ये अपघातग्रस्त टँकरमधील गॅस भरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here