तळोदात शिक्षक दिनासह अध्यापक शिक्षण मंडळाचा वर्धापनदिन साजरा

0
10

साईमत, तळोदा : प्रतिनिधी

प्राचार्य भाईसाहेब गो.हु.महाजन न्यू हायस्कूल आणि शि.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथे ५ सप्टेंबर रोजी माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती राष्ट्रीय शिक्षक दिन आणि अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संस्थेचा ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा मंगला महाजन होत्या. याप्रसंगी तळोदा कॉलेज ट्रस्टचे संचालक अरुणकुमार महाजन, संस्थेचे सचिव आर.व्ही.सूर्यवंशी, संचालक एन.डी.माळी, संचालक प्रा.पी.बी.महाजन, तसेच विस्तार अधिकारी जाधव, केंद्र प्रमुख कांतीलाल पाडवी, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.शर्मा, संस्थेचे प्रमुख देणगीदात भगवान माळी, सुधाकर टवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून तळोदा पंचक्रोशीतील डॉ.सुभाष पाटील होते. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील परिवर्तनाबाबत चर्चा करताना सर्व शिक्षकांनी हा बदल स्विकारून लवचिकतेनुसार विद्यार्थी केंद्रीत ठेवावा. त्यांच्या कौशल्यानुसार विकास घडवून आणावा, असे विचार ह्या ठिकाणी मांडले.

अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या अध्यक्षांनी शिक्षकांनी नवनवीन उपक्रमांचा आधार घेत विद्यार्थ्यांचा आयुष्याला आकार द्यावा, त्यांना न्याय देणे, हे प्रत्येकांनी आपले कर्तव्य समजून संस्थेची प्रगती करत रहावी, म्हणून आवाहन केले. यावेळी संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थेचे प्रमुख देणगीदाते यांनी दिलेल्या आपल्या योगदानाचा सन्मानपूर्वक सत्कार येथे केला. यावेळी विद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

यांची लाभली उपस्थिती

इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या शितल महाजन, प्राथमिक मराठी विभागाचे प्रमुख वंदना माळी, उपप्राचार्य प्रा.बी.जी.माळी, कार्यालयीन अधीक्षक डी.पी.महाले, पर्यवेक्षक प्रा.ए.एल.महाजन, पर्यवेक्षक ए.आर.सूर्यवंशी यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते. सूत्रसंचलन एस.व्ही.पाडवी तर प्रास्ताविक तथा आभार प्राचार्य प्रा.अमरदीप महाजन यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here