नंदुरबार, नवापूर तालुक्यात पोलीस पाटील भरती प्रक्रिया

0
3

साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी

नंदुरबार, नवापूर तालुक्यातील पोलीस पाटील संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, शासनाच्या धोरणानुसार महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी शुक्रवारी, ८ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात, (प्रशासकीय इमारत टोकरतलाव रोड, नंदुरबार) सोडत काढण्यात येणार असल्याचे, उपविभागीय अधिकारी (नंदुरबार) मंदार पत्की यांनी सांगितले.

नंदुरबार तालुक्यातील ५१ महसूली गावात व नवापूर तालुक्यातील ४४ महसुली गावात अशा ९५ महसूली गावांची पोलीस पाटील संर्वगाची पदे रिक्त आहेत. पोलीस पाटील पदे रिक्त असलेल्या महसूली गावात शासन धोरणानुसार ३० टक्के महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. यावेळी नंदुरबार व नवापूर तालुक्यातील संबंधित गावातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही श्री. पत्की यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here