साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय, लोहारा येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. विद्यार्थ्यांचे थरावर थर लावून प्रेम दशरथ पाटील या विद्यार्थ्याने दहीहंडी फोडली. हा कार्यक्रम मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले, उपमुख्याध्यापिका यु.डी.शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. तसेच लहान मुलांसाठीही विशेष दहीहंडीचे आयोजन केले होते. त्याचवेळी पावसाने जोरदार हजेरी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दहीहंडीच्या उत्सवाचा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आनंद घेतला.
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील कै. न्हानाभाऊ म. तु. पाटील कला महाविद्यालयातील संरक्षणशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जितेंद्र आनंदा माळी आणि ग्रंथपाल प्रा. विजय पाटील यांना नुकतेच धुळे येथील रायबा बहुउद्देशीय संस्थेमार्फत ‘राज्य स्तरीय आदर्श शिक्षक रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी धुळ्याचे मा. आमदार प्रा. शरद पाटील, गोरख देवरे, (राष्ट्रीय अध्यक्ष – नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम), रविकिरण पाटकरी (प्रकाश अकॅडमी, संचालक, धुळे), गेंदिलाल साळुंखे (माजी शिक्षणाधिकारी धुळे) आदी मान्यवर तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲड. राकेश पाटील, सचिव प्रा. प्रमोद पाटील, प्रिया पाटील (नॉर्थ महाराष्ट्र डायरेक्टर- नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम), प्रा. डॉ. उमेश गांगुर्डे आदी उपस्थित होते. डॉ. माळी…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर शाळा व्यवस्थापन समिती आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसास यांच्यातर्फे म्हसास शाळेचे आदर्श माजी मुख्याध्यापक रत्नाकर पाटील आणि उपशिक्षक प्रवीण भालेराव यांची ऑनलाईन संगणकीय बदली झाल्याने त्यांना शाळेतर्फे निरोप देण्यात आला. कार्यक्रमासाठी म्हसास, रामेश्वर गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच दोन्ही गावातील शिक्षण प्रेमी, लोहारा केंद्र अंतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रम यशस्वी झाला. अध्यक्षस्थानी म्हसासचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील होते. याप्रसंगी प्राजक्ता जळतकर, महेश रोकडे, शिवाजी बोरसे या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केली. विद्यार्थी व गावातील शिक्षणप्रेमी यांनीही मनोगत व्यक्त केले. शाळेतर्फे रत्नाकर पाटील, प्रवीण…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील भगिनी मंडळ चित्रकला महाविद्यालयात नुकताच शिक्षक दिन साजरा झाला. विद्यार्थी शिक्षकांनी दिवसभर महाविद्यालयाची ‘धुरा’ सांभाळली. विद्यार्थी प्राचार्य विनल गुजर, शिक्षक कोमल पाटील, जागृती पवार, सागर नाथबुवा, लिपीक जीत भदाणे, शिपाई विवेक पाटील यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडत सर्व प्राचार्य, शिक्षक, लिपीक, शिपाई यांना आराम दिला. विद्यार्थी प्राचार्यांनी पूर्ण दिवसाचे नियोजन करत सगळ्या अडचणी पार पाडल्या. शिक्षक व विद्यार्थी शिक्षक यांच्या हस्ते श्री सरस्वती देवी व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. दुपारी ए.टी.डी. द्वितीय वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले ‘स्पंदन भित्तिपत्रका’चे ज्येष्ठ कलाशिक्षक विजय पाटील महिला मंडळ माध्य.विद्यालय, चोपडा यांच्या हस्ते अनावरण झाले.…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित माधवराव चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजकपदी निवड केली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील रांजणगावचे येथील ते मूळ रहिवासी आहेत. तसेच ते जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माध्यम प्रभारी आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीचे पत्र देऊन कौतुक केले आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते माधव भंडारी, सरचिटणीस विजय चौधरी, सरचिटणीस माधवी नाईक, वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजित गोपछडे उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल ना.गिरीश महाजन, खा.उन्मेष पाटील, खा.रक्षा खडसे, आ.सुरेश भोळे (राजु मामा), आ.संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी अवकाळी पाऊस व प्रतिकुल परिस्थितीमुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. त्यात भर म्हणजे शेतीमालाला योग्य भाव नसेल तर शेतकरी फार मेटाकुटीला येतो. यासाठी पर्यायी उपाययोजना म्हणून बाजार समितीच्या संचालकांनी शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेची सध्या प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. शेतमाल तारण कर्ज योजना प्रकर्षाने राबविण्याचा निर्णय घेतला असताना शेतकरी प्रमोद पाटील यांना शेतमाल तारण कर्ज योजनेतून ४५ हजार रुपयाचा धनादेश बाजार समितीचे सभापती कपिल पाटील, बाजार समितीचे सचिव जगदीश लोधे, सहसचिव सतिश पाटील, सूर्यकांत कदम तसेच शरद महाले यांच्या समवेत देण्यात आला. यावेळी बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे कृषी विभाग व राशी सीड्स यांच्या संयुक्त विद्यमाने कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रण कामगंध सापळे तसेच राज्य पुरस्कृत कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी प्रकल्प अंतर्गत नुकतीच शेतीशाळा घेण्यात आली. यासंदर्भात कृषी सहाय्यक एम.एस.देवरे, राशी सीड्स प्रतिनिधी दीपक जाधव यांनी सविस्तर माहिती माहिती दिली. याप्रसंगी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रण, व्यवस्थापन, कामगंध सापळे, उपयोग तसेच निमार्कबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला गावातील सर्व शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेऊन चांगला प्रतिसाद दिला.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी ग्रामीण भागातील शेवटच्या वंचित घटकाला शासकीय योजनांचा लाभ त्याच्या दारी जाऊन देण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी, शासकीय योजना पोहोचतील घरोघरी’ अभियानाची सुरुवात केली आहे. यामाध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे आ.मंगेश चव्हाण यांनी केले. ते तिरपोळे येथे आयोजित “आमदार आपल्या दारी” अभियान प्रारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी चाळीसगावचे प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, वीज महावितरण कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे, अप्पर तहसीलदार भारकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, बाजार समिती सभापती कपिल पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य पियुष साळुंखे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.भारती पंडित, तालुका कृषी अधिकारी किशोर…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चंदनाची चोरी करून वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांवर शहर पोलीस स्टेशनने कारवाई केली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे शेख अमीन शेख हजिज (वय ५२) आणि अशोक लक्ष्मण आव्हाड (वय ४५, दोन्ही रा. हस्ता, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून चंदनाचे लाकूड, एक मोटारसायकल, दोन मोबाईल, चंदन चोरीकामी लागणारे साहित्य असा ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, तस्करी करणाऱ्यांवर वचक बसण्याकामी उपाययोजना होणे गरजेचे आहे. सविस्तर असे की, रात्री गस्तीचे अधिकारी स.पो. निरीक्षक दीपक बिरारी आणि गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांची ६ रोजी सकाळी ९.३०…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी गोवंशाच्या जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शेख अनिस शेख गफुर याच्या घराजवळ असलेल्या त्याच्या गोठ्यात गोवंश जातीचे जनावराची कत्तल करण्यासाठी जात असल्याचे माहिती दिली. लागलीच ही माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील, स.पो.नि. सागर ढिकले यांना कळवुन ते हजर होताच दोन पंचासमक्ष ४५ हजार रुपये किमतीची ४ गोवंश जातीचे जनावरे आणि ४८ हजार रुपये किमतीचा गोवंश कत्तल करण्यासाठी लागणारा इतर मुद्देमाल असा ९३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ठिकाणावरुन जप्त करुन चाळीसगाव शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील आरोपीतांना ताब्यात घेवून, ताब्यात घेण्यात आलेली गोवंश जनावरे ही गोशाळेत जमा केली आहेत. सविस्तर असे…