प्रा.जितेंद्र माळी, ग्रंथपाल प्रा.विजय पाटील पुरस्काराने सन्मानित

0
2

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील कै. न्हानाभाऊ म. तु. पाटील कला महाविद्यालयातील संरक्षणशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जितेंद्र आनंदा माळी आणि ग्रंथपाल प्रा. विजय पाटील यांना नुकतेच धुळे येथील रायबा बहुउद्देशीय संस्थेमार्फत ‘राज्य स्तरीय आदर्श शिक्षक रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी धुळ्याचे मा. आमदार प्रा. शरद पाटील, गोरख देवरे, (राष्ट्रीय अध्यक्ष – नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम), रविकिरण पाटकरी (प्रकाश अकॅडमी, संचालक, धुळे), गेंदिलाल साळुंखे (माजी शिक्षणाधिकारी धुळे) आदी मान्यवर तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲड. राकेश पाटील, सचिव प्रा. प्रमोद पाटील, प्रिया पाटील (नॉर्थ महाराष्ट्र डायरेक्टर- नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम), प्रा. डॉ. उमेश गांगुर्डे आदी उपस्थित होते.

डॉ. माळी आणि प्रा. पाटील यांना ‘राज्य स्तरीय आदर्श शिक्षक रत्न’ पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवडचे संस्थाध्यक्ष जयवंतराव पाटील, उपाध्यक्ष देविदास साळुंखे, सचिव देविदास पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले, सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी सत्कार करुन कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here