साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय, लोहारा येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. विद्यार्थ्यांचे थरावर थर लावून प्रेम दशरथ पाटील या विद्यार्थ्याने दहीहंडी फोडली. हा कार्यक्रम मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले, उपमुख्याध्यापिका यु.डी.शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता.
तसेच लहान मुलांसाठीही विशेष दहीहंडीचे आयोजन केले होते. त्याचवेळी पावसाने जोरदार हजेरी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दहीहंडीच्या उत्सवाचा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आनंद घेतला.