गोवंशची तस्करी प्रकरणी दोघांना पकडले

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

गोवंशाच्या जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शेख अनिस शेख गफुर याच्या घराजवळ असलेल्या त्याच्या गोठ्यात गोवंश जातीचे जनावराची कत्तल करण्यासाठी जात असल्याचे माहिती दिली. लागलीच ही माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील, स.पो.नि. सागर ढिकले यांना कळवुन ते हजर होताच दोन पंचासमक्ष ४५ हजार रुपये किमतीची ४ गोवंश जातीचे जनावरे आणि ४८ हजार रुपये किमतीचा गोवंश कत्तल करण्यासाठी लागणारा इतर मुद्देमाल असा ९३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ठिकाणावरुन जप्त करुन चाळीसगाव शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील आरोपीतांना ताब्यात घेवून, ताब्यात घेण्यात आलेली गोवंश जनावरे ही गोशाळेत जमा केली आहेत.

सविस्तर असे की, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना चाळीसगाव शहरातील हुडको कॉलनी व नागदरोड परिसरात मांसासाठी गोवंश जातीच्या जनावरांचा कत्तलीसाठी वापर होतो याबाबत संशय होता. म्हणून परिसरात रात्रीच्या वेळी सतर्कतेने गस्त करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या. शुक्रवारी, ८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पो.उ.नि. योगेश माळी, पो.हे.कॉ. नितीन वाल्हे, पो.ना. महेंद्र पाटील, पो.शि. रवींद्र बच्छे, ज्ञानेश्वर गिते, ज्ञानेश्वर पाटोळे, पवन पाटील, भरत गोराळकर असे शासकीय वाहनाने गस्त करीत होते.

याप्रसंगी चाळीसगाव शहरातील सदानंद हॉटेलजवळ दोन संशयित एका मोटारसायकलवर एका पिशवीत काहीतरी घेवून जातांना दिसल्याने त्यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना पोलिसांनी थांबविण्याचा इशारा केला. तेव्हा ते पळून जात असतांना त्यांचा पोलिसांनी पाठलाग करुन शेख अनिस शेख गफुर कुरेशी ( वय ४८, रा. उर्दु बालवाडीचे पाठीमागे मोहम्मदीया मशिदसमोर, इस्लामपुरा, चाळीसगाव) आणि मुस्ताक खान हारुण खान कसाई ( वय ४०, रा. अमोल बुट हाउसच्या बाजुला, रथगल्ली, कसाईवाडा, चाळीसगाव) यांना छाजेड ऑईल मीलजवळ पकडले. त्यांची अंगझडती घेतल्यावर त्यांच्या ताब्यातील पिशवीत एक लहान लाकडी दांड्याची लोखंडी धारदार कुऱ्हाड, दोन लोखंडी धारदार सुरे व धार लावण्याची गोलाकार लांब कानस मिळून आली. तपास पो.ना. महेंद्र पाटील करीत आहेत.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच स.पो.नि. सागर ढिकले, पो.उप.नि. योगेश माळी, पो.हे.कॉ. नितीन वाल्हे, पो.ना. महेंद्र पाटील, रवींद्र बच्छे, ज्ञानेश्वर गिते, ज्ञानेश्वर पाटोळे, पवन पाटील, भरत गोराळकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here